भेट घ्यायची ओढ लागली
भेट घ्यायची ओढ लागली
नकोच आता दुर जराही
भेट घ्यायची ओढ लागली ||१||
हिरव्या वाटा उंच तरूवर
प्रकाशाचे किरण त्यावर ||२||
ओळखीच्या त्या झाडे वेली
नेहमीची त्यांनी जादू केली ||३||
वायू परिचीत पानांस लागला
थरथर त्यांना देवूनी गेला ||४||
नजरेच्या टापूत आले समोर
शांत नितळ शितल सरोवर ||५||
हृदयाच्या कप्यात हुरहुर झाली
जुन्या स्मृतींची आठवण आली ||६||
विरह कसला असला नसता
नकोच ते दुर असणे आता ||७||
श्रम पुरले वेळही सरली
भेट घ्यायची ओढ लागली ||८||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
२०/०४/२०११
वर्गीकरण
मस्त झालीये कविता पाभे. - खूप शुभेच्छा!
वंटास ! नजरेच्या टापूत आले
पाषाणभेदा -छान जमलीय. उत्तम
...!!
मस्तच