का असे हे घडले ?
आज पुन्हा मी रडले,
का असे हे घडले ?
खरंच का ती इच्छा होती,
का मनाची भीती ?
का नाही मज उमगली,
ही नात्यातील प्रीती
कसे समजवू मी मनाला ?
का मुकले मी आनंदाला ?
खरेच का सर्व दोष
फक्त माझा होता ?
यास्तव प्याला का
माझाच रिता होता ?
वाटे एकदाच परत जावे
कुशीत शिरून पुन्हा रडावे
का नाही ही ओढ त्याला ?
का न उमगे मजला ?
काळही सरला, ना वेळही उरला
संयम माझा पुन्हा ढळला
काव्यरस
मिसळपाव
निरखुन पाहता लक्षात आले की सूक्ष्म दवबिंदुंनी जाळ्याचे धागे पूर्णतः आच्छादले गेले आहेत. प्रत्येक थेंब सुबक गोलाकार पैलु न पाडलेल्या पण उपजतच गोलाकार असलेया हिर्यासारखा आणि जाळ्याचा प्रत्येक धागा हिर्याच्या हाराच्या एकेका पदरासारखा. जसजसा प्रकाश त्या जाळ्यावर खेळु लागला.