युगलगीतः आज पाहणार आहे
युगलगीतः आज पाहणार आहे
(सदर युगलगीत एकाच व्यक्तीने गायले आहे अशीही कल्पना करता येवू शकते.)
तो: आज पाहणार आहे, उद्या पाहणार नाही; आज राहणार आहे, उद्या राहणार नाही ||धृ||
ती: आज पाहणार आहे, उद्या पाहणार नाही; आज राहणार आहे, उद्या राहणार नाही ||धृ||
तो: दोन दिवसांची भेट आपली; ह्रदयात खोलवर रूतून राहीली
ती: वरवर भासे शांत सागर; आतील त्सुनामी दिसणार नाही ||१||
ती: आनंदाचे गवत पसरले; दु:खाचे डोंगर झाकले
तो: खडकातला विटला पाझर; पाणी आता वाहणार नाही ||२||
तो: आलो, भेटलो, बोल बोललो; रमलो, हसलो, कधीतरी रडलो
ती:
काव्यरस
मिसळपाव