Skip to main content

आकाशकंदिल!!!

लेखक उदय के'सागर यांनी सोमवार, 24/10/2011 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार! आकाशकंदिल बनवणे हा एक अवघड प्रकार असतो असं नेहमीच वाटत असल्यामुळे मी आकाशकंदिल बनवण्याच्या भानगडीत कधीच पडलो नाही. पण काही दिवसांपुर्वीच मिपावर प्रिया-ताईंचा "पारंपारीक आकाशकंदिल" हा धागा वाचला (http://www.misalpav.com/node/19394) आणि वाटलं "अरे! हे तर भारीच सोप्प प्रकरण आहे :) त्यात मनासारखं साहित्यंहि मिळालं मग अजुनच हुरुप आला अणि बनवला आकाशकंदिल :) धन्यवाद प्रियाताई :) सर्व मिपाकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!! :) (मराठी टंकलेखनात काहि चुका झाल्या असल्यास (चुकिचा काना, मात्रा, वेलांटी इ.) माफ करावे. मोकळेपणाने निदर्शनास अणाव्यात, त्याची मनापासुन दखल घेतली जाईल व चुका सुधारल्या जातील :) )
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4285
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

सुरेखच बनवला आहे आकाशकंदिल त्या खालच्या झिरमुळ्या थोड्या लांब हव्या होत्या अजून.

In reply to by प्रचेतस

धन्यवाद वल्ली :) अहो, त्या झिरमळ्याचा पेपर ऐनवेळेस कमी पडला (माझ्या अगाऊपणा मुळे) म्हणुन आहे त्यात भागवावं लागलं :( :)

आकाशकंदील छानच झालाय. नक्षिदार कागद भारी मिळालाय. आम्हाला ग्रेट कागद नाही मिळाले. घरी होते त्यात असाच बनवलाय. प्रिया ब तैंनी यावर्षी अनेक मिपाकरांना कंदील करायला भाग पाडल्याबद्दल धन्यवाद!

वल्ली, गणेशा, पियुशा, रेवती आणि प्रिया तुम्हा सर्वांना मनापसुन धन्यवाद :)