पापण्यांचे सोस माझ्या पंजरी बिलगून हे
अंतरी ओल्या खळ्याचे श्वास अजुनी नागवे
अंकुरे खडकातही; ध्यासातले आलेख हे
खोल रुतलेले; कळे ना कोण संधी जागवे
ओतणे निर्व्याज पाणी आणि अगणित जोगवे
थेंब थेंबाचा उसासा शार माती जोजवे
गुदमराला एक रेषेचे उताविळ घर नवे
दूर-आशा गात येई कोंब घेउनिया सवे
.................................अज्ञात
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1158
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
क्या बात है! नेहमी
क्या बात है!
नेहमी प्रमाणे,अ.कु. ब्रँड ... :-)
+१
In reply to क्या बात है! नेहमी by अत्रुप्त आत्मा
+१
सायबा नमस्कार
दूर-आशा गात येई कोंब घेउनिया सवे
शेवटच्या ओळीपासून ते पहिल्या ओळी पर्यंत प्रत्येक शब्द न शब्द आवडला
रघू