Skip to main content

जगज्जेता विशी!

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 05/06/2012 22:22 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या १२ वर्षात तो पाच वेळा जागतिक अजिंक्यपदाचा मुकुट डोक्यावरती चढवून आहे (ही 'तपःश्चर्याच' म्हणायला हवी! :)) , जगातले अनेक प्रतिस्पर्धी बुद्धीबळपटू त्याच्या खेळाला वचकून असतात, गॅरी कास्पारोवसारखा त्याचा एकेकाळचा कट्टर प्रतिस्पर्धी आणि नंतरचा सहकारी देखील त्याच्याबद्दल अनुदार उद्गार काढतो तेव्हा तो एका अढळपदाला पोचलाय याची खात्रीच होते! ३१ मे २०१२ ला मॉस्कोतल्या त्रेत्याकोव आर्ट गॅलरीमध्ये 'जन गण मन' वाजलं, आनंदने विजेतेपदाचा चषक उंचावला आणि माझे डोळे भरुन आले!

कविता - चौकशी

लेखक शुचि यांनी मंगळवार, 05/06/2012 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
लॉर्ड आल्फ्रेड ड्ग्लस यांची एक सुंदर कविता वाचनात आली. जे न देखे रवी ते देखे कवी या म्हणीची सार्थकता पटवणारी ही कविता प्रामाणीकपणे किंबव्हना उघड उघड "शेम" अर्थात लज्जा या भावनेचे समर्थीकरण करते. नेहमीच्या आयुष्यातील अनुभव असा की लज्जास्पद वागणूक ही गिल्ट (गुन्हगारी ) भावनेची जन्मदात्री असते.

नियती ? नाय नाय टेंपोवरती!

लेखक संजय क्षीरसागर यांनी मंगळवार, 05/06/2012 17:23 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : नियती ( http://www.misalpav.com/node/21857) रक्ताळलेल्या प्रार्थना या अत्यंत प्रभावी कवितेतून इथे पदार्पण करणार्‍या हजाक या कविश्रेष्ठांची ही दुसरी कविता नक्की कोणत्या त्रासामुळे अशी निर्मिती होते?

"गांधीजींनंतरचा महान नेता"

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 05/06/2012 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
IBN Group ने महान भारतीयाची निवड शोध सुरु केला आहे. या शोधाचा मथळा "गांधीजींनंतरचा महान नेता" असा आहे मुळात नेहरू असो वा राजाजी..डॉक्टर साहेब असो वा पटेल प्रत्येक जण महानच आहेत.. प्रत्येकाने आपापल्या परीने देशाची सेवा व कार्य केलेल आहे. समस व झापडबंद पॅनेल याच्या वर कोण नेता गांधी नंतर महान असे ठरणार आहे. असो बघू यात नेमके काय होते ते.. स्वा.वीर सावरकरांचे नाव जजेस पॅनेल ने जाणीवपूर्वक वगळले आहे हे सहज लक्षात येते.

बुधाच्या माचीच्या शोधात एक दिवस

लेखक रमताराम यांनी मंगळवार, 05/06/2012 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
म्हाराजांच्या टायमाला घोड्यावरून गडकोटांवर येणे-जाणे असायचे हे शाळेत गेलेल्या नि त्यातील इतिहासाचे पुस्तक किमान एकदा उघडलेल्या व्यक्तीला ठाऊक असतेच. आता आजच्या काळात घोड्यावरून चढाई होत नसली तर आमचा चढाईचा बेत मात्र घोड्यावरून निघाल्यासारखाच ठरला. शनिवारी सकाळी आमच्या कराडच्या मित्रवर्यांनी - अविनाशनी - फोनवरून आदेश दिला की आपण बुधाच्या माचीला भेट देण्यासाठी रविवारी प्रस्थान करणार आहोत, भिडू जमवा.

अंत्यक्रिया अथवा दहनसंस्कार

लेखक कलंत्री यांनी मंगळवार, 05/06/2012 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
Muslim boy designs green crematorium for Hindus http://timesofindia.indiatimes.com/home/environment/developmental-issue… माणसांची जी काही अनेक धर्म / पंथ आहेत त्यात माणसाच्या उत्तर्क्रियेसाठी वेगवेगळी प्रथा आणि परंपरा सांगितली आहेत. उदा हिंदुमध्ये सर्वसाधारण पणे दहन केले हाते तर मुस्लिमबांधवामध्ये दफन ( मातीत पुरण्याचा विधी) तर पारसी समाजात प्रेत पक्षांसाठी ठेवले जाते असे ऐकिवात आहे.

नियती

लेखक हरवलेल्या जहाजाचा कप्तान यांनी मंगळवार, 05/06/2012 13:55 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी, सैरभैर, प्रश्नांकित होऊन, शरिर स्वतःला हरवुन बसतं गर्दीत लहान मुलासारखं आणि कधी आपण मनाला हरवु देतो कधीकधी वेगळं जगता यावं म्हणुनसुद्धा.... पण नियती कधीच हरवुन बसत नाही स्वतःला ती आंधळ्या डोळ्यांनी नी बांधलेल्या हाताने धापा टाकत, मूकपणे चालत रहाते. तिच्यात सापळ्याआड धडधडणारं असं काहीच नसतं. कुण्याच्याही स्पर्शाने उभे रहाणारे किंवा सुटणारे प्रश्न नसतात. भंगणारी आकांक्षा, फाटलेलं ह्र्दय शोकाचे सुर पश्चातापाचे निश्वास जखमा आणि सारं काही असतं शवपेटीत बंद. आणि चालताना सोबत असते फक्त एक न संपणारी शवयात्रा

लेमन राईस

लेखक सानिकास्वप्निल यांनी मंगळवार, 05/06/2012 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः २ वाट्या शिजवलेला भात (शिळा भात वापरला तरी चालेल) १/४ वाटी लिंबाचा रस २ हिरव्या मिरच्या चिरून १-२ लाल सुक्या मिरच्या तोडून कढीपत्ता १ टेस्पून शेंगदाणे १ टीस्पून मोहरी १/४ टीस्पून मेथीदाणे १ टीस्पून चणा-डाळ १ टीस्पून उडदाची डाळ १/४ टीस्पून हींग १/२ टीस्पून हळद मीठ चवीनुसार तेल . पाकृ: पॅनमध्ये तेल गरम करून मोहरी, मेथीदाणे, उडदाची डाळ व चण्याची डाळीची