मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अंत्यक्रिया अथवा दहनसंस्कार

कलंत्री · · काथ्याकूट
Muslim boy designs green crematorium for Hindus http://timesofindia.indiatimes.com/home/environment/developmental-issues/Muslim-boy-designs-green-crematorium-for-Hindus/articleshow/13829955.cms माणसांची जी काही अनेक धर्म / पंथ आहेत त्यात माणसाच्या उत्तर्क्रियेसाठी वेगवेगळी प्रथा आणि परंपरा सांगितली आहेत. उदा हिंदुमध्ये सर्वसाधारण पणे दहन केले हाते तर मुस्लिमबांधवामध्ये दफन ( मातीत पुरण्याचा विधी) तर पारसी समाजात प्रेत पक्षांसाठी ठेवले जाते असे ऐकिवात आहे. चुक भुल देणे घेणे. सर्वात महत्वाचे म्हणजे हिंदुसमाजातील दहनक्रियेसाठी लाकंडाचा साठा लागतोच लागतो. काही ठिकाणी विद्युत भट्ट्या आहेत असे ऐकतो परंन्तु त्यास आपल्या बांधवांचा प्रतिसाद कसा असेल याबद्दल शंकाच वाटते. वरील लेखात दिल्याप्रमाणे गोबरगॅसवर जर दहन होत असेल तर स्वागतच करावयाला हवे. वाढती लोकसंख्या आणि दहन्/दफन / समाधी इत्यादी साठी काही अनूभव / शिफारस असेल तर कृपया सांगणे.

वाचन 10575 प्रतिक्रिया 0