नमस्कार्स मंडळी,
मागील वर्षी माझ्या मुलीला मी ठाण्यातील एका प्रतिथयश शाळेत के.जी त प्रवेश घेवून दिला. नुकतेच सिनीयर के.जी. चे वर्ग सुरु झाले. या शाळेत मुलांना रोजच्या डब्यात काय द्यायचे याचे नियम आहेत ( आजकाल हा प्रकार सगळी कडेच असतो म्हणे, असो. त्याला काही हरकत नाही.) त्यानुसार प्रत्येक दिवसासाठी काही पदार्थ ठरवलेले आहेत. त्यात, सोमवारसाठी "इडली/डोसा" असा मेन्यु आहे.
काल माझ्या बायकोनी सकाळी ६:३० ला उठून, खपून तिच्यासाठी मसाला इडली केली आणि डब्यात दिली. संध्याकाळी तिने विचारले मुलीला "बाळा, इडली आवडली कां?" तर तिचे उत्तर ऐकून मी तीन ताड उडालोच.