झुलले मार्दव झरल्या अगणित; झुळझुळल्या पागोळ्या
एकांती निश्वासांचे झाले अवचित स्वर गोळा
ओठात कुणी पोटात कुणी हृदयात सजविल्या कुणी गंधमय रांगोळ्या
अपघातच हे सुखस्वप्नांचे गतकाळाची ही शाळा
रे कुणी बांधले झोके विसरुन वास्तवातले धोके,..
वडवानळ झाली पाणी जाळित अंतरातली ज्वाळा
पुंकरले बावरले आठवल्या निखार्यातल्या वेळा
पावलांत घुटमळले भिजलेले मन कातर वय सोळा
..........................अज्ञात
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
938
प्रतिक्रिया
0
मिसळपाव
प्रतिक्रिया