बाजरीचे ढेबरे
ही एक गुजराथी रेसीपी आहे. मी माझ्या बहीणीकडे खाल्ली आणि आवड्ली म्हणून करुन बघितली. सर्वाना आवड्ली म्हणून तुमच्या बरोबर शेअर करावीशी वाटली. तुम्ही पण जरूर करुन पहा.
साहित्य : बाजरीचे पीठ (ताजे दळून आणावे), दोन चमचे दही, आल लसूण मिरची पेस्ट, थोडी साखर, मीठ, ओवा चिमूट्भर, तीळ, कसुरी मेथी किंवा ताजी चिरलेली मेथी थोडीशी अथवा किसलेला दुधी, थोडे गव्हाचे पीठ, हळद, मिरची पावडर, दोन चमचे तेल.
सर्व साहित्य एकत्र करुन कणके प्रमाणे भिजवावे. प्लास्टिकच्या पिशवीवर गोळा ठेवून लाटावे. तव्यावर तेल घालून ठेपल्याप्रमाणे दोन्ही बाजून भाजावे. गरम खायला द्यावेत दही किंवा कोणत्याही चटणी बरोबर छान लागतात.
१० वी 'क' - भाग ५
१० वी 'क' - भाग १
१० वी 'क' - भाग २
१० वी 'क' - भाग ३
१० वी 'क' - भाग ४
"साल्या भिकारचोटा, कुठे उलथला होतास रे इतके दिवस?" बापलेकरला बघताक्षणीच शिव्या घालत त्याच्या पोटात मी दोन तीन गुद्दे ठेवून दिले. गुद्द्यांचा त्याच्यावर काही परिणाम झाला नाही उलटं दात काढून हसायला लागला. त्याला पाहताच आम्हा दोघानांही खुप आनंद झाला होता.
राष्ट्रकाकु
एक आटपाट नावाच नगर होत्,तिथे पामि नावाच एक मोठ्ठ घरकुल होत्, वयाने मोठी असलेली मंडळी सगळ्यांना कस जिवापाड जपायची,त्यांनी त्यांच काम हलक करण्यासाठी,कामाच आउटसोर्सिंग केल होत ते पण घरातलेच होते
आता घर म्हटल्यावर भिन्न स्वभावाचीही माणस होती त्यात्,काही उग्र स्वभावाची,काही लंपट्,काही विनोदी,काही स्थिर
गंभीर्,काही हातावर हात धरुन बसायची
काहीनी पदर बघीतला की मागे मागे करायची काहीतरी खायला मिळेल म्हणुन्,काही तरुण होती जे की कायम गुलाबी
स्वप्न बघायची,माझ्याशी मैत्री करणार का म्हणुन काटेरी गुलाब घेउन मागे हिंडायची,समोरची गुलाबी पार्टी काटे
टोचतील म्हणुन दुर
आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके १३० वी पुण्यतिथी
क्रांतीविरांचा मुकुटमणी असे आद्य क्रांतिकारक फडके कुलोत्पन्न वासुदेव बळवंत फडके यांची १३० वी पुण्यतिथी १७ फेब्रुवारी रोजी आहे. त्यांचे हृद्य स्मरण.
१८५७ सालच्या अयशस्वी क्रांतीपर्वानंतर भारतमातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी स्वप्राणांच्या आहुत्या दिल्या, त्या थोर वीरांमध्ये वासुदेव बळ्वंत फडके यांचे नाव अग्रेसर आहे. या साठीच त्यांना “ आद्य क्रांतिवीर” असे संबोधले जाते.
पनवेल जवळील “अभयारण्य “ म्हणून प्रसिध्द असलेले “कर्नाळा” या ऐतिहासिक किल्याच्या पायथ्याशी आहे. वासुदेव बळ्वंत फडके यांचे आजोबा श्री अनंतराव फडके हे या किल्याचे किल्लेदार होते.
तरंग
पीत वारा धुंद होतो, नित उषेच्या मैफिली
पाखरे उडती विहरती देत त्यांच्या चाहुली
रोज ही चैतन्यमय लय येइ माझ्या अंगणी
दूर कोठे शीळ घाली तृप्ततेची माउली
शीण चिणलेला निशेचा जातसे मन लंघुनी
लाट पाटाची प्रवाही होतसे क्षण बिलगुनी
योजनेच्या या पळांचे गीत गाई वैखरी
आळावी सारे तरंग अंतरंगी रंगुनी
.............................अज्ञात
काव्यरस
एक कप चहा ...!!
निखळ आनंद देणारं स्वच्छ पाणी ,
गालांवर हसू आणणारा साखरेचा गोडवा ,
आल्हाददायक रंगांची उधळण करणारी गंधित चहा पूड ,
आणि या सगळ्यांना सामावणारे पांढरेशुभ्र दूध ......
..........असंच बनतं सगळं ....
......... आधी दीर्घ श्वास आणि मग…. एक कप चहा !!
पावसात भिजताना झालेली नजरानजर .
उसाचा ट्रक मधे आल्यावर झालेली हुरहूर ,
इंद्रधनुष्य सामावलेले तुझे डोळे ,
आणि पांढऱ्याशुभ्र ढगात हरवलेले आकाश .....
अशी झाली ती पहिली भेट .....
...भिजलेली टपरी आणि तिथे ....
राष्ट्रपती - इंग्रजी संज्ञांचे भारतियीकरण
राष्ट्रपिता या संबोधनामुळे अंमळ हळवेपण आल्याचे कांही ठिकाणी दिसून आले. या निमित्ताने राष्ट्रपती या संबोधनाबद्दल ज्ञानात भर पडावी असे वाटतेय. मूळ शब्द शोधण्यासाठी इंग्रजीचा आधार घ्यावा लागत असल्याने तसे केले. त्या शब्दास अध्यक्ष असे म्हणत असावेत अशी एक शंका मनात येऊन गेली. जर प्रेसिडेण्ट = ....पती हे बरोबर असेल तर घराघरातून अध्यक्षमहाराज, जेवायला चला असा हाकारा ऐकू यायला काहीच हरकत नाही. इकडून तिकडून पेक्षा आमचे अध्यक्ष आज दुचाकीवरून मार्गस्थ झाले हे म्हणायला आणि ऐकायलाही सुटसुटीत वाटते. असो.
मुद्दा असा, प्रेसिडेण्ट म्हणजे पती असे भाषांतर कुणी केले असावे ?
मिसळपाव
* एथेन्स ते पिराउस
सकाळी लवकरच जाग आली. रोजच्या प्रमाणे हॉस्टेल मध्येच नाश्ता करुन बाहेर पडलो आणि जवळच असलेल्या मेट्रो स्थानकावर पिराउस कडे जाणारी मेट्रो पकडली.
***