पुत्र व्हावा ऐसा गुंडा...
पुत्र व्हावा ऐसा गुंडा...
ह्याचा कवीला जो काही अर्थ अपेक्षित असेल तो असेल.. पण आमच्या लेकरानी शब्दशः घ्यायचा ठरवला आहे. आणि तो बहुदा "गुंडा" सिनेमाच्या हिरो सारखा "गुंडा" हा असावा.. असो..
तर..आमचे सुपुत्र झोपेतुन उठतात तेच मुळी बटन दाबुन मशिन चालु केल्या सारखे.. एकदम धो धो एनर्जी कोसळायला सुरवात होते. तिथुन पुढे दिवसभर ती तशीच कोसळणार असते. दम दिल्या सारखा हाका मारत सुटतो..चावतो..उड्या मारतो..बोचकारतो..लाथा मारतो आणि वर "हा हा" करुन हसतो..
मिसळपाव