साहित्यः
१. रवा - १ वाटि
२. साजुक तुप - पाव वाटि
३. ताजा मँगो पल्प - १.५ वाटि (नसेल तर टिन्ड/कॅन मधला वापरु शकता पण चवीत फरक पडेल)
४. दुध/पाणी - १ वाटि प्रत्येकि
५. चवीनुसार साखर (आंब्याच्या गोडिनुसार)
६. बारीक चीरलेले बदाम/पिस्ते
७. पाव चमचा वेलचीपुड
कॄती:
१. मंद आचेवर एका नॉनस्टिक कढईत तुप तापलं कि रवा खमंग भाजावा/परतावा
२. एका भांडयात १ वाटि दुध आणि पाणी एकत्र करुन उकळि आणावी
३. परतलेल्या रव्यात उकळलेले दुध/पाणी घालावे व दणदणीत वाफा काढुन रवा मोकळा करावा. गरज भासल्यास रवा मोकळा करण्यासाठि परत दुधाचे हबके मारुन १-२ वाफा काढाव्या
४. आता त्यात मँगो पल्प, चवीनुसार साखर व वेलचीपुड घालुन एकजीव करावा व एक १०-१५ मि. गॅस बंद करा. मधे मधे ढवळलात तरी ठिक अन्यथा शिर्याची खरपुड पण छान लागते. निदान मला तरी आवडते :)
५. वरुन बारीक चीरलेले बदाम/पिस्ते पेरुन गरमा गरम मँगो शिर्याचा लुफ्त घ्यावा
टिप: मँगो पल्प शक्यतो मिक्सर मधुन काढु नका. शिरा खाताना मधे मधे जो आंब्याचा गर येतो त्याने खायची लज्जत अजुन वाढते. कॅन मधला असेल तर पर्याय नाहि :D
वाचने
11450
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा शिरा बनवून पाहाला हरकत
आंबा असताना वेलची कशी लागेल
हो....... आंबा असल्यावर वेलची
मस्त लागतो हा शिरा!
अलीकडेच करुन चापल्याने या
मस्त!
व्वा....व्वा करून पाहिला
त्या दणदणीत वाफा कशा
मस्तच !!!
आंबा भात
झकास्स्स
In reply to आंबा भात by मीनल
शाब्बास.
ती डिश असच म्हणतीये...कसली
वा ! मस्त दिसतो आहे अंबा शिरा.
माझ्या बायकोच्या सासुबाई
सांभाळा!
In reply to माझ्या बायकोच्या सासुबाई by विजुभाऊ
दीपू काका शिरा छान दिस्तोय पण
धन्यवाद लोक्स
दीपूकाका भावनाबद्दल काकुला
In reply to धन्यवाद लोक्स by दिपक.कुवेत
अ च प्रतिम!
१ नंबर...सकाळी सकाळी असला