Skip to main content

स्वतःशी मी कधीतरी आडमुठा वागतो

लेखक वैभव कुलकर्नि यांनी बुधवार, 24/07/2013 20:54 या दिवशी प्रकाशित केले.
लागे कस जीवनाला,तेव्हा कात टाकतो आधाराची काठी म्हणून,हाती रेषा बघतो देवाला ती लाच थोडी,मोठी भीक मागतो दुसऱ्याच्या दुखावर थायथया नाचतो स्वतःशी मी कधीतरी आडमुठा वागतो …………१ ……… कधीतरी स्वतःशीच स्वतःवर त्रागतो देवळात उभा मी प्रसादाला सोकतो नको तिथे उगी उगी शब्द मी ओकतो ओकण्याचे फळ म्हणून प्रसंगही भोगतो स्वतःशी मी कधीतरी आडमुठा वागतो …………२ ……… खोटी स्वप्ने बाळगुनी , बळे शड्डू ठोकतो गळे स्वप्न कधी जर नशिबाला टोकतो पुण्यायीच्या तराजूत पापाला मी जोकतो आयुष्य न कळे मला , जगणेच मुकतो तरी स्वतःशी मी कधीतरी आडमुठा वागतो …………२ ………
लेखनविषय:

वाचने 1329
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

वा कुलकर्णीआप्पा भारी लिव्हताय की तुम्ही. तेव्हढं विषयाशी प्रामाणिक ओळी अन शुध्द्लेखन जमलं की दुधात साखरच.