लोहगड, भाजे लेणी--फोटोवारी
नमस्कार मंडळी
पहीलेच सांगतो की भटकंती विभागात एरर येत असल्याने ईथे धागा काढला आहे त्याबद्दल क्षमस्व.
एप्रिल्/मे महीन्याचे ऊन तापत आहे, त्यामुळे हे काही भटकंतीचे दिवस नव्हेत गड्या. पण मुलाची परीक्षा संपुन पुढचे क्लास सुरु व्हायला २-३ दिवस होते, आणि अभ्यास "करुन" तो आणि "बघुन" मी कंटाळलो असल्याने एक तरी वन डे करावा असा विचार केला. त्याचे १-२ मित्रही तयार झाले. मग काय, विकांताला निघालो गाडी घेउन सकाळी ६-६.१५ वाजता. थंड वातावरण होते, ट्रॅफिकही कमी होते, वाटेत घोरावडेश्वर लागले, म्हटले जरा वॉर्म अप होईल, म्हणुन गाडी बाजुला घेतली आणि निघालो वर जायला.
मिसळपाव
मुंबईला पुण्याशी जोडणारा लोहमार्ग वाहतुकीसाठी सुरू होऊन आता 160 वर्षे पूर्ण झालेली आहेत. या मार्गामुळे या शहरांदरम्यानचा प्रवास अवघ्या काही तासांवर आला. वेडीवाकडी वळणे घेत, दऱ्या-खोऱ्यांतून, बोगद्यांमधून होणारा हा प्रवास सर्वांना कायमच रोमांचित करत आला आहे.