साहित्य - २ पाकिटे bourbon biscuits, चिमूटभर खाण्याचा सोडा, २ कप दुध, कॅडबरी चोकलेट किंवा डार्क चोकलेट .
कृती - सर्व बिस्किटे मिक्सरमधून ग्राईंड करून घ्या. बिस्किटांचा भुगा एका बाऊल मध्ये घेऊन त्यात अंदाजे दुध मिसळत राहा. आप्प्यांप्रमाणे सरबरीत मिश्रण करा. मिश्रण २ मिनिटे चांगले फेटून घ्या. खाण्याचा सोडा घालून हलक्या हाताने पुन्हा एकदा मिश्रण हलवा. आप्पे पात्राला तुपाने ग्रीस करुन मिश्रण अर्ध्यापर्यंत भरा. कॅडबरी चोकलेटचा किंवा डार्क चोकलेटचा एक चौकोनी तुकडा ठेऊन पुन्हा थोडे मिश्रण ओतून आप्पे पात्र व्यवस्थित भरून घ्या.मंद आचेवर ३ ते ४ मिनिटे बेक करा. झटपट कप केक्स तयार

केक उकलल्यावर आत melted चोकोलेट असल्याने याला मिनी चोको लावा केक सुद्धा म्हणू शकता.
वाचने
8397
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
यमी कप केक्स!!!
यमी कप केक्स!!!

झकास!
झकास!
मी फक्त
खाण्याकरता.....
झक्कास! एक प्रामाणिक शंका…
झक्कास!
एक प्रामाणिक शंका…
इथे कॅडबरी चॅाकलेट किंवा डार्क चॅाकलेट ऐवजी लिकर चॅाकलेटचा वापर केला तर चालेल का?
करून पाहायला हवे..
In reply to झक्कास! एक प्रामाणिक शंका… by टर्मीनेटर
चवीत थोडा गोडसरपणा आणावा लागेल.
भारीच
भारीच
खूप दिवसांनी नविन पाककृती आली आणि ती पण आवडणारी आणि सोप्पी वाटतेय.
वाह
अभिनंदन छान केक्स बनवलेत.
हा पदार्थ मी दोनदा केलाय, चांगला फसला.मग मी अप्पेपात्र निकृष्ट आहे हे ठरवून याच्या नादी लागले नाही :)
धन्यवाद :)
In reply to वाह by Bhakti
धन्यवाद :)
नॉनस्टिक पात्रात होईल.. तुमचे अप्पे पात्र बिडाचे आहे का?
यम्म!
सोपा प्रकार दिसत आहे. एकदा करायला हवा!
७ ते १० मिनिटात होतात.
In reply to यम्म! by जुइ
७ ते १० मिनिटात होतात.
नक्की करा :)
मस्त!
लॉकडाऊन मध्ये ओरिओ आणि बर्बनचे केक बऱ्याचदा व्हायचे. एकदा इडली पात्रामध्ये तयार करून चॉको इडल्या बनवल्या होत्या. 😀
पण चॉको चिप्स टाकून चॉको लावा केक तयार करायची आयडिया मस्त आहे.
हा फोटो
In reply to मस्त! by स्नेहा.K.
प्रत्येक कप्प्यात बॅटरमध्ये डेअरी मिल्कचा एक एक पीस टाकला होता.
इडली पात्राची कल्पना चांगली
In reply to हा फोटो by स्नेहा.K.
इडली पात्राची कल्पना चांगली आहे.
ओरिओचे केक काळपट होत असतील ना?
हाईड अँड सीक चे पण छान होतात.
बिना ओव्हन चे केक हि कल्पना
बिना ओव्हन चे केक हि कल्पना चांगली आहे
पण एक प्रश्न
बिस्किटे आधीच भाजलेली असतात मग असे परत भाजले गेल्याने हा "केक" कडवट नाही का होत?
बिस्किटे आधीच भाजलेली असतात
In reply to बिना ओव्हन चे केक हि कल्पना by चौकस२१२
बिस्किटे आधीच भाजलेली असतात मग असे परत भाजले गेल्याने हा "केक" कडवट नाही का होत?नाही होत.
आपण ती भिजवतो ना.
झटपट!
झटपट टायटल पाहून धागा उघडला आणि आपण टायटल चुकीचे वाचले असल्याची जाणीव होऊन तोंड कडू झाले. परंतु धागा मात्र गोड आहे हे वे. सां न. ल.