साहित्य:
१. गव्हाचे पीठ
२. १ कप गाजराची पेस्ट
३. १ कप पालकाची पेस्ट
४. १ कप बिटाची पेस्ट
५. आलं-मिरची पेस्ट १ चमचा प्रत्येकि
६. ओवा/जिरेपुड - पाव चमचा प्रत्येकि
७. चवीनुसार मीठ
८. तेल कणिक भीजवण्यासाठि
९. बटर किंवा साजुक तुप पराठे भाजण्यासाठि
कृती:
१. गाजर, बीट वेगवेगळे वाफवून त्याची पेस्ट तयार करा. पालक ब्लांच करुन (उकळत्या पाण्यात एक १० मि. घालुन) त्याचीहि पेस्ट करुन घ्या
२. गाजर, पालक आणि बीटाच्या पेस्टमध्ये मावेल इतके गव्हाचे पीठ, चवीनुसार मीठ, आलं-मिरची पेस्ट, ओवा/जिरेपुड आणि तेल घालुन वेगवेगळि कणीक भिजवा
३. आता तिन्ही कणकेमधुन छोटा गोळा घेउन त्याचा एक मोठा गोळा करा व पराठा लाटा किंवा तिन्ही कणकेमधुन छोटा गोळा घेउन लंबगोलाकर वळा व एका गोळ्याच्या शेवटि एक ठेवुन चक्राकार वळा (भुईचक्र असतं त्या प्रमाणे). शेवटचं टोक गोळ्यावर घेउन हलकेच दाब द्या म्हणजे पराठा लाटता येईल
४. हलक्या हाताने पराठा लाटून घ्या. पराठा थोडा जाडसरच ठेवा. बटर/साजुक तुपावर खमंग भाजून आवडत्या लोणचं, चटणी, सॉस, रायत्याबरोबर, भाजी बरोबर खायला द्या. अगदि काहिच नसेल तर वाफाळणार्या चहाबरोबर नुसता खा!
अवांतरः पराठा अंमळ जास्त भाजला गेलाय तेव्हा जरा तिकडे जरा कानाडोळा करा :)
टिपः हा पराठा स्टफ्ड नसल्यामुळे खाताना कदाचीत बेचव लागण्याची शक्यता आहे म्हणुन जोडिला एखादि भाजी, लोणचं, रायतं असेल तर चव वाढेल. मुख्य म्हणजे कलरफुल असल्यामुळे मुलं आकर्षित होतील(च) शीवाय पालक, बीट आणि गाजर विनासायस त्यांच्या पोटात जाईल :)