एक प्रश्न विचारावासा
वाटतो देवा तुला
असा कसा संसाराचा
गाडा तु उभा केला
कुणी न जिंकती कुणी न हारती
कुणी न हसती कुणी न रडती
सारेच अभिमन्यु इथे
नशिबाच्या चक्रव्युहात अडकती
पैजांचा असतो डाव
तीन पत्त्यांत रंगतो खेळ
इथे कुणाचे कुणीच नसती
फक्त असतो हाता-तोंडाचा मेळ
क्षितीजाच्या वाटेवरती
डोळे सारेच लावुन बसतात
तोच सूर्योदय पुन्हा सूर्यास्त
मनातल्या मनात हसत राहतात
ठिणग्यांची कमतरता इथे
अगदीच आहे असे नाही
पण सारे रानच पेटुन उठावे
असे काही घडतच नाही
अद्याप घंटानाद होतोय
गाभारी देवा तुझ्या
अद्याप आस लावुन बसलोय
पायरीशी देवा तुझ्या
तुच आता ओढुन आण
लाट वादळांची एखादी
मुठी वळु दे नसा तापु दे
होउन जाउ दे लढाई एखादी
आम्हीच कर्ण आम्हीच अर्जुन
तरी अपुरे तुझ्या सारथ्थ्या वाचुन
उमेद अमुची ढळुन देउ नकोस
काळजातली धग विझु देउ नकोस.......
- कवि म.ना.दे.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1633
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
जय भोले टोले .....
होउन जाउ दे लढाई एखादी....
एकदम खास
आवडली. भापो.(भावना पोचल्या)
पुन्हा एकदा झक्कस प्रतिक्रिया
मलाही एक (अशीच ) कविता
जमल्यास इथे पोस्ट कर ना
In reply to मलाही एक (अशीच ) कविता by अत्रुप्त आत्मा