Skip to main content

अभिव्यक्त होणे (भाग१ : अभिव्यक्त होण्यास जागा आहे ? )

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 04/09/2014 या दिवशी प्रकाशित केले.
अभिव्यक्ती प्रकट होण्याची प्रक्रिया (Process of expression,or expressing oneself, in living organisms and specially human beings and how various sciences and philosophies explain,describe,perceive or relate to this process) या बद्दल नंतर स्वतंत्र धाग्याने चर्चा करावयाची आहे. तत्पुर्वी अभिव्यक्त होणे असा बर्‍याच जणांच्या तोंडी असलेला वाक् प्रचार चुकीचा असल्याचा शेरा प्रमाण आणि शुद्धलेखनवादींकडून वेळो वेळी येऊन मुख्य चर्चा भरकटत राहते असा अनुभव आहे.

प्रेम म्हणजे प्रेम असतं...

लेखक आशु जोग यांनी गुरुवार, 04/09/2014 या दिवशी प्रकाशित केले.

रमा-माधव !

. .... प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं... तुमचं आमचं सेम असतं. मग ती इतिहासातली पात्रं असली तरी प्रेम हे प्रेमच असतं. एखाद्या निर्मात्या दिग्दर्शकाला अशा प्रकारचा ऐतिहासिक विषयावरचा चित्रपट करावासा वाटणं त्यातही जिथे प्रेक्षकसंख्या मर्यादित आहे अशा मराठीत करावासा वाटणं हीच कौतुकाची गोष्ट आहे. (कृपया ध्यानात घ्या हे रमा-माधव या चित्रपटाचे परीक्षण नाही.

छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. २: "आनंद"

लेखक संपादक मंडळ यांनी गुरुवार, 04/09/2014 या दिवशी प्रकाशित केले.
छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा नमस्कार! १९ ऑगस्ट १८३९ ला पॅरिसमधे छायाचित्रणकलेची अधिकृतरीत्या सुरुवात झाली. या घटनेला नुकतीच १७५ वर्षे झाली. या निमित्ताने मिपावर छायाचित्रणाची स्पर्धा घ्यावी असा एक प्रस्ताव श्री सर्वसाक्षी यांच्याकडून आला. मिपावर अनेक गुणी कलाकार, छायाचित्रकार आहेत. मिपा सदस्य-स्पर्धकांना कोणताही एक विषय देऊन एकच एक स्पर्धा घेण्यापेक्षा स्पर्धामालिका सुरू करावी असा निर्णय घेण्यात आला. मालिकेतील या दुसर्‍या स्पर्धेचा विषय "आनंद" हा आहे. या विषायानुरूप तुम्ही काढलेली छायाचित्रे इथे या धाग्यावर प्रकाशित करावीत ही विनंती.

छायाचित्रणकलेची १७५ वर्षे: स्पर्धा क्र.१ मानवनिर्मित स्थापत्य - निकाल

लेखक संपादक मंडळ यांनी गुरुवार, 04/09/2014 या दिवशी प्रकाशित केले.
छायाचित्रणकलेची १७५ वर्षे: स्पर्धा क्र. १ मानवनिर्मित स्थापत्य ********************** नमस्कार मंडळी! छायाचित्रणकलेची १७५ वर्षे: स्पर्धा क्र.१ मानवनिर्मित स्थापत्य - निकाल जाहीर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. या स्पर्धेला उदंड प्रतिसद देऊन यशस्वी करण्यात तुमचा सर्वांचा हातभार लागला आहे. आलेली सर्वच छायाचित्रे अतिशय सुरेख होती आणि डावे-उजवे करणे फारच कठीण. म्हणूनच सर्व सदस्यांना चित्रे निवडायची विनंती केली होती. एकूण २८ स्पर्धकांची ७९ छायाचित्रे आली. निकाल लावताना ४० सदस्यांनी आपल्या पसंतीची चित्रे निवडली.

पेरू : भाग ९ : संग्रहालये

लेखक समर्पक यांनी गुरुवार, 04/09/2014 या दिवशी प्रकाशित केले.
या भागात पेरूतील संग्रहालयांची सफर. कोणत्याही देशाचा इतिहासाचा अभ्यास हा संग्रहालयांच्या भेटीशिवाय अधुरा असतो. गतवैभवाचे एक पुनर्जीवित दर्शन या संग्रहालयांमध्ये होत असते.

दूरस्थ

लेखक मीराताई यांनी गुरुवार, 04/09/2014 या दिवशी प्रकाशित केले.
प्रवासाला निघायचं म्हटलं की मन कसं हलकं-फुलकं होतं. तसं तर नेहमीच्या त्या रामरगाडयातून बाहेर पडायला मन सदैव उत्सुकच असतं. मनाच्या या उत्सुकतेचं निरीक्षण करताना जाणीव होते ती आदिमानवाची! आपल्या त्या पूर्वजाची! त्याच्यामधली ती भटकी प्रवृत्ती अजूनही आपल्यात जागी आहे अन् संधी मिळताच ती डोकं वर काढते याची जाणीव तीव्रतेने होते. ही संधी मग धंदा-व्यवसायासाठी करण्याच्या प्रवासाची असो की घरगुती भेटीगाठी किंवा कौटुंबिक सोहळे यांच्यासाठी असो! क्वचित प्रसंगी त्या विशिष्ट ठिकाणी पोचल्यावर या चार भिंतीतून त्या चार भिंतींमध्ये येऊन पडल्याची भावनाही निर्माण होईल. ते पुढचं पुढे!

बेबी 3

लेखक mohite jeevan यांनी गुरुवार, 04/09/2014 या दिवशी प्रकाशित केले.
या आठवडी बेबीच्या मनावरील बराच ताण हालका झाला होता, ती नेहमी प्रमाणे कामावर जात होती.

भविष्य......

लेखक मुक्त विहारि यांनी बुधवार, 03/09/2014 या दिवशी प्रकाशित केले.
"अरे, मी काय म्हणतो.उद्या मला यायला काही जमणार नाही" "कारे" "उद्या, काही मंडळी, भविष्य जाणून घ्यायला येणार आहेत.आता आपण म्हणजे काय? एक नंबरचे ज्योतिषी." "बरं ठीक आहे.ती तर रात्री येणार नाहीत ना?मग आपल्या कार्यक्रमांत खंड नको.मी असेनच इथे." "तरी पण जमणार नाही.कारण उद्या आपले आय.पी.एल. नाही का? उद्या आपले महाराज खेळणार बघ.आपले भविष्य काय वाया जाणार नाही.बेट लावतो का?" "ओ.के. तू बघ आय.पी.एल. मी आपला एल.पी. झिंदाबाद." -------- "काय रे!

प्रमोशन

लेखक vikramaditya यांनी बुधवार, 03/09/2014 या दिवशी प्रकाशित केले.
आनंद आपल्या कॅबिनमध्ये शिरला आणि एसीची थंड हवा खात शांत बसुन राहिला. आज तो ऑफ़िसमध्ये जरा लवकरच आला होता. समोरच्या कागदांची त्याने चाळवाचाळव केली. पण त्यात त्याचे लक्ष नव्हते. तो एका खास फोनची वाट बघत होता. घड्याळाचा काटा जसा जसा पुढे सरकु लागला तसा तो बेचैन झाला. अखेर त्याचा फोन वाजला. अमेरिकेहुन बॉबचा फोन होता. "ॲन्डी?" " येस, बॉब, थॅंक्स बॉब. शुअर बॉब." त्याने फोन ठेवला आणि टेबलावर जोरात हाथ आपटला. "येस्स, आय मेड इट!" त्याने लगेच पुजाला फोन लावला. "पुजा, इट्स थ्रु" "कॉंग्रॅटस" पुजा जवळ जवळ ओरडलीच.

व्यक्त : कारण आणि परिणाम

लेखक वडापाव यांनी बुधवार, 03/09/2014 या दिवशी प्रकाशित केले.
माणसाचं शरीर हा एक भव्य कारखाना आहे. या कारखान्यात बाहेरून कच्चा माल मागवला जातो, जो श्वासाच्या, अन्नाच्या, आणि कुठल्याही प्रकारच्या अनुभवाच्या रूपाने येतो. त्यावर प्रक्रिया होते. अन्नाचं पचन होतं. श्वास मंदज्वलनासाठी ऒक्सिजन पुरवतो. आणि अनुभवावर बेतलेली विचारप्रक्रिया मनात सुरू होते. या प्रक्रियांच्या अंताला आपल्या शरीराकडे बरीच उत्पादनं तयार झालेली असतात. काही वापरण्यासाठी, म्हणजे कृती करण्यासाठी; तर काही उत्सर्जित करण्यासाठी - ज्यांना आपण टाकाऊ म्हणतो. पण खरंच ती टाकाऊ असतात का? टाकाऊ म्हणजे नेमकी कुठल्या प्रकारची उत्पादनं असतात ही?