Skip to main content

मला भावलेलं गाणं

लेखक समीरसूर यांनी गुरुवार, 09/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
घरी येता येता ती तिच्या घराच्या दारात उभी दिसली. मन प्रसन्न झाले. खांदा दरवाज्याच्या चौकटीला टेकवून उभं राहण्याची तिची ती तर्‍हा मोहक होती. ती तशी उभी राहिली की तिच्या कंबरेची उजव्या बाजूला नाजूक कमान तयार होत असे. तिचा उजवा हात कमरेवर आणि डावा हात वेणीशी चाळा करत असे. घरी आलो. चैन पडेना. पुन्हा एकदा तिच्या घरावरून चक्कर मारण्यासाठी म्हणून बाहेर पडलो. ती अजून तशीच उभी होती. मला पुन्हा पाहताच सुरेख हसली आणि आत पळून गेली. मनाला इतकी खुशी इतर कुठल्याच गोष्टीने होत नसे. परत घरी जायला निघालो. आभाळ भरून आलं होतं; पावसाचे थेंब पडू लागले होते. तिच्या त्या हसण्याचा गारवा मनाला गुदगुल्या करतच होता.

तुम्ही काय करता ?

लेखक _मनश्री_ यांनी गुरुवार, 09/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही जर कधी फार उदास असाल तर औदासिन्य घालवण्यासाठी काय करता ? मी जेव्हा अपसेट असते तेव्हा पु. ल . च म्हैस किंवा असामी असामी ऐकते किंवा एखादा मस्त पिक्चर पाहते जब वी मेट ,लगान ,चक दे इंडिया ,धमाल ,छोटी सी बात ,बावर्ची ,आनंद ,गोलमाल ( जुना ) ,अशी हि बनवाबनवी किंवा निशाणी डावा अंगठा यापैकी कुठलाही एक नाहीतर मस्त गाणी ऐकत पुस्तक वाचते ,हॉटेल मधून मस्तपैकी पावभाजी आणि फ्रुट सलाड मागवून भरपेट खाऊन कानाशी गाणी लावून मस्त ताणून देते

मर्डर ऑनलाईन

लेखक पगला गजोधर यांनी गुरुवार, 09/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
यु यु (युरोपीय युनियन) ची सायबर गुन्हे अन्वेषक संस्था (EC3), ने असे भाकीत वर्तवलं आहे की २०१४ च्या अंता पर्यंत , पहिला 'मर्डर ऑनलाईन' कदाचित झाला असेल. जगात आज सायबर तंत्राद्यान प्रचंड वेगाने मानवी जीवनाचा अविभाज्य अंग बनत आहे. आज पेसमेकर ला ब्लू टूथ वैगरे तत्सम कनेक्टीविटी देण्यात आलेली आहे, हेतू हा की ह्रिदयाची कार्यक्षमता व पेसमेकरची क्षमता, शिल्लक ब्याटरी वैगरे तपासून पाहता येतील. (ह्रिदयाला जोडलेले पेसमेकर व बाहेरील डेटा रिडर यांच्यात संदेशाची देवाण घेवाण होऊन).

त्यांची दिवाळी ..

लेखक सस्नेह यांनी गुरुवार, 09/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
आज मिटिंग. जिल्हा अधिक्षक नवरेसाहेबांची केबिन खचाखच भरून गेली होती. ऑफिसच्या कानाकोपऱ्यातून जमा करून आणलेल्या खुर्च्या केबिनमध्ये मावत नव्हत्या अन त्यावर बसलेले वजनदार अधिकारी खुर्च्यांमध्ये मावत नव्हते. आजच्या मिटींगला जिल्ह्यातले सर्व क्षेत्रिय अधिकारी आले होते. मिटिंग तशीच महत्त्वाची होती. दिवाळी तोंडावर आलेली. ग्राहकांच्या खिशात पैसे खुळखुळत होते. व्यापाऱ्यांचे गल्ले भरून वाहत होते. दिवाळीपूर्व काही दिवस म्हणजे वसुलीचा नामी सीझन. वाहत्या गंगेचा लाभ घेऊन वर्षाची थकबाकी निल करण्यासाठी मोर्चे कसे बांधायचे याच्या सूचना नवरेसाहेब जातीने देणार होते आणि त्यासाठीच खास मिटिंगचे आयोजन केले होते.

नथ........भाग-२

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 09/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire नथ.......भाग-१ नथ............भाग-२ मानसी आर्य कँपबेल........ एम्बसीवरील हल्ल्याची बातमी कळल्यावर वेळासला माझ्या ह्रदयाचा ठोका चुकला. मला चैन पडेना. घरात सर्वजण काळजी करु नकोस असे सारखे समजवत होते पण त्यामुळे मला जास्तच रडू येत होते.

अंधार क्षण भाग १ - सामूहिक हत्या (लेख २)

लेखक बोका-ए-आझम यांनी गुरुवार, 09/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार क्षण भाग १ - सामूहिक हत्या दुस-या महायुद्धात सहा कोटींहून जास्त लोक मारले गेले - आजवरच्या सर्व संघर्षांमध्ये सर्वात जास्त. हे शक्य होण्यामागचं एक मुख्य कारण म्हणजे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा माणसांना मारण्यासाठी झालेला वापर. या भागात एकूण तीन मुलाखती आहेत. त्यावरुन तुमच्या हे लक्षात येईलच की विसाव्या शतकात मोठ्या प्रमाणात माणसं मारणं हे  अगदीच सहजसुलभ झालं होतं - तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने आणि मानसशास्त्रीय दृष्टीनेही.

आणि यांनी घडविली अमेरिका! .. २) जॉन डी रॉकफेलर

लेखक अमित खोजे यांनी गुरुवार, 09/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
या पूर्वी . . . आणि यांनी घडविली अमेरिका! .. १) कोर्नेलिअस व्हँडरबिल्ट कोर्नेलिअस व्हँडरबिल्ट हा जगातील सर्वात मोठ्या रेलरोड कंपनीचा मालक होता. अन त्याला याची कल्पना होती कि रेलरोड आता अमेरिकेत सगळीकडे झालेले आहेत. आता पैसा रेलरोड बांधून नाही तर त्यावर मालाची आणि उतारूंची वाहतूक करून येणार. त्यासाठी तो एका चांगल्या मालाच्या शोधात होता ज्याची वाहतूक संपूर्ण देशभर करून तो पैसा कमवू शकेल आणि असा माल आणि अशा कंपनीचा मालक त्याला लवकरच मिळाला. जॉन डी. रॉकफ़ेलर आणि त्याचे केरोसीन (रॉकेल)! पुढे चालू . . .

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - १५ (अंतिम)

लेखक स्पार्टाकस यांनी गुरुवार, 09/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट ही लेखमालिका आज संपली. ही मालिका प्रकाशित करु दिल्याबद्दल मी मिसळपाव प्रशासनाचा मनापासून आभारी आहे. ही मालिका आपल्याला कशी वाटली ते जरुर कळवा. ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- सॅन फ्रॅन्सिस्को १९०६ च्या एप्रिलमध्ये बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यातून अद्यापही सावरत होतं. जवळपास ८०% शहर भूकंपात उध्वस्तं झालेलं होतं. नॉर्थवेस्ट पॅसेज यशस्वीपणे पार करुन आलेल्या अ‍ॅमंडसेन आणि त्याच्या सहकार्‍यांच्या यशाने सॅन फ्रॅन्सिस्कोवासियांना या धक्क्यातून सावरण्याची उमेद मिळाली असावी.

ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता

लेखक संजय क्षीरसागर यांनी गुरुवार, 09/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
अर्थ बाजूला ठेवून, पहिल्यांदा हृदयनाथांनी गायलेलं हे कमाल गाणं (पुन्हा एकवार) ऐकू. अत्यंत गोड आवाज, कवितेला साजेशी, मुख्य म्हणजे ग्रेसच्या लयकारीच्या नखर्‍याला जराही धक्का न लावणारी चाल आणि कमालीची दिलकष शब्दफेक! खरं तर ग्रेसच्या इतक्या सुंदर कवितेचं `गाणं' झालं नसतं तर कदाचित, ती चर्चेचा विषय झालीही नसती.

माझ्या शेल्फवरची पुस्तके...!!

लेखक प्रकाश१११ यांनी बुधवार, 08/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
जमवून जमवून गोळा करून मांडून ठेवलेली असतात पुस्तके माझ्या पुस्तकाच्या खास शेल्फवरची संदर्भ ग्रंथासकट काही कवितेची मी चाळत रहातो मला हवे तेव्हा हवी तशी मी फिरत असतो पुस्तकाच्या रानात अक्षरांच्या ओळीओळीतून मनसोक्त फिरत राहतो घुसतो शब्दांच्या निबिड रानात मला हवा तो मोसम सुरु होतो जेव्हा माझ्या हातात पडतात मला हवे ते शब्द जादू करतात मनावर भ्रमित करतात मला मग कोसळू लागतो पाऊस मी शब्दांच्या पावसात भिजून जातो नको ईतका माझ्या बेड रूमची खास खिडकी मी काढून टाकल्यात त्या दुधी काचा नि बसवल्यात शुभ्र पारदर्शक ज्यातून सकाळचा सूर्य अलगद येतो भेटीला सांडतो प्रकाश माझ्या पुस्तकावर मग ती मला