मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भ्रष्ट झाला कोळसा

चुकलामाकला · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
प्रेरणा सद्य परिस्थिती आणि अर्थातच श्रीगुरुजी यांचा लेख स्पर्श 'हाता'चा विखारी भ्रष्ट झाला कोळसा फ़ेकता तो कृष्ण पैसा शुभ्र झाला कोळसा भूक अन आक्रोश सारा मूक गर्भी दडपला वंचितांच्या वेदनेने अश्म झाला कोळसा संपली ती युगप्रतीक्षा खोदुनी वर काढला पाहुनी प्रेते सभोती भस्म झाला कोळसा क्रांतीच्या का वल्गना करिती फुकाचे धनिक हे पोचता त्यांच्या खिशातच थंड झाला कोळसा आजवरी मनमोहनाला आदराने वंदिले काजळी त्याच्याही हाता, खिन्न झाला कोळसा जाळण्या होळी खलांची फिरुनी जमवा लाकडे पेटण्याच्या सोहळ्याला सज्ज झाला कोळसा

वाचने 808 वाचनखूण प्रतिक्रिया 1