Skip to main content

चंद्रामागे जाणारा व परत येणारा शुक्र बघण्याचा थरारक अनुभव

लेखक मार्गी यांनी शुक्रवार, 13/10/2023 14:20 या दिवशी प्रकाशित केले.
✪ दिवसा झालेले चंद्र- शुक्राचे पिधान ✪ क्षणार्धात अदृश्य व थोड्या वेळाने परत दृश्यमान होणारा शुक्र! ✪ ध्यानाचा अनुभव- जणू पूर्ण अंधार आणि क्षणार्धात आलेला प्रकाश ✪ दिवसा उजेडीसुद्धा शुक्र बघता येतो ✪ आकाशातील आश्चर्ये आपल्याला विनम्र करतात सर्वांना नमस्कार. आपल्याला दिसणारं आकाश एक जादूचा पेटारा आहे! अंधा-या रात्री दिसणारं आकाश बघताना आपण मंत्रमुग्ध होऊन जातो. अशाच एका अवाक् करणा-या अनुभवाबद्दल आपल्यासोबत शेअर करत आहे. हा अनुभव अगदी वेगळा होता कारण तो दिवसा आलेला होता! दिवसाच्या वेळी आपण चंद्र तर बघूच शकतो आणि सौर फिल्टर वापरून सौर डागसुद्धा बघू शकतो.

मिसळपाव दिवाळी अंक - २०२३ - आवाहन

लेखक साहित्य संपादक यांनी शुक्रवार, 13/10/2023 06:33 या दिवशी प्रकाशित केले.

लेखन पाठवण्यासाठी मुदत दिनांक ७ नोव्हेंबर २०२३ दिवसअखेरपर्यंत वाढवली आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

राम राम, मिपाकर. श्रीगणेश लेखमाला पार पडली, की मिपाच्या पडद्यामागील मंडळाला वेध लागतात ते आपल्या मिपा दिवाळी अंकाचे. मराठी आंतरजालावर आणि छापील दिवाळी अंकांचे साहित्य विश्वामधे दिवाळी अंकांची समृद्ध आणि अभिमानास्पद अशी परंपरा आहे. गेल्या अनेक दशकांपासून विविध विषयांना वाहिलेले दर्जेदार दिवाळी अंक दरवर्षी असतात, आपल्याही मिपाचा दिवाळी अंक प्रत्येक वर्षी असतो.

इस्रायल-पॅलेस्टाईन युद्ध आणि IMEC चे भवितव्य!

लेखक टर्मीनेटर यांनी गुरुवार, 12/10/2023 17:13 या दिवशी प्रकाशित केले.

७ ऑक्टोबर २०२३ रोजी स्थानिक वेळेनुसार पहाटे साडे सहाच्या सुमारास 'हमास' (Hamas) ह्या पॅलेस्टाईन मधील 'सत्ताधारी' दहशतवादी संघटनेने गाझा पट्टीतून (Gaza Strip) अवघ्या वीस मिनिटांत सुमारे ४ ते ५ हजार रॉकेट्स डागून इस्रायलवर हल्ला केला.

प्रारब्ध

लेखक साहना यांनी गुरुवार, 12/10/2023 04:21 या दिवशी प्रकाशित केले.
आर्यावर्तात कुणा एके काळी एक गरीब शेतकरी होता. त्याची एक सर्वसाधारण मुलगी होती. आई लहानपणातच मेली आणि गावांत साथ येऊन असंख्य लोक मेले आणि शेतकऱ्याला आपल्या पोरीला घेऊन गांव सोडावा लागला. बरोबर एक बैल आणि मोजकेच सामान घेऊन बाप लेक लाचारीने आणि भुकेने सर्वत्र फिरत होते. मुलगी लग्नाची झाली होती, वयात आली होती त्यामुळे तिचे शिलरक्षण हि सुद्धा चिंता होतीच. अश्यांतच बापाला ताप आला. आपण आणखीन जास्त दिवस जगणार नाही हि जाणीव झाली. मुलीचे काय होईल ह्या चिंतेने त्या बापाची घालमेल आणखी वाढली.

शुक्राची चांदणी

लेखक चक्कर_बंडा यांनी बुधवार, 11/10/2023 14:53 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी बाहेर शेतात झोपणं म्हणजे एक पर्वणीचं असायची. उत्तर-दक्षिण उभी पसरलेली शेतं आणि दक्षिण टोकाला, उत्तरेकडे तोंड करून असलेली घरांची वस्ती, घरांसमोर, वस्तीतील वापराचा पुर्व-पश्चिम जाणारा कच्चा माती-फुफाट्याचा रस्ता व रस्त्याच्या पलीकडे ज्याच्या त्याच्या वाटणीची शेतं. या शेतांच्या कडेने सोडलेल्या व साफ केलेल्या जागेत एखाद्या जुनाट पटकुरानं झाकलेली अंथरूण-पांघरुणे दिवसभर उन्हात धूळ खात पडून असत.

डिमुलां कॅमिली (Desmoulins camillie)

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 09/10/2023 08:33 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार! सध्या फ्रेंच राज्यक्रांतीवर पुस्तक लिहितोय. जगात घडून गेलेल्या अत्यंत महत्त्वाच्या या घटनेने आपण अचंबित होतो. त्या काळातील माणसे, त्यांचे राजकारण, त्यांची त्यांच्या तत्त्वांवरील निष्ठा हे वाचल्यास सध्याच्या राजकारण्यांशी त्यांची तुलना होणे अपरिहार्य आहे. असो. ती तुलना मी मनातल्या मनात रोज करतोच. पण त्या क्रांतीतील तीन चार व्यक्‍तिरेखा मला अत्यंत आवडतात कारण जेव्हा ती क्रांती रक्‍तरंजित झाली तेव्हा ते मोठ्या धैर्याने त्या दहशतीच्याविरुद्ध उभे राहिले. त्यांनी, त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचे प्राणही गमावले... तो इतिहास खरोखरच विस्मयकारक आहे...

(कावळ्यांची फिर्याद-३)

लेखक कर्नलतपस्वी यांनी रविवार, 08/10/2023 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
https://www.misalpav.com/node/48814 कावळ्यांची फिर्याद https://www.misalpav.com/node/51617- कावळ्यांची फिर्याद-२ मास भादव्याचा आला, झाला पितृपक्ष सुरू वायसांची, एक्स्ट्रा-ऑर्डिनरी सभा होती सुरू त्रासलेले काही,काही माखलेले, काही कुरकूरत होते पिपंळाच्या पानां परी, कावळे अधिक होते उडत,काही,पडत काही,तर काही, "नशीब खोटे आपले", म्हणून बडबडत होते तीच ती भाजी,वडी अन्,तेच भोक पडलेले वडे अमसूलाच्या चटणीमुळे पडले जिभेला तडे नाही पिझ्झा,नाही पनीर,तीच ती तांदळा

एक किस्सा: अब की बार सौ पार

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 08/10/2023 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
भारताला १०७ पदक मिळाले त्यासाठी सर्व खेळाडूंचे अभिनंदन. त्याच सोबत देशाच्या खेळांची नीती निर्धारित करणाऱ्यांचे ही अभिनंदन. बहुतेक दीड एक महिन्यापूर्वीची गोष्ट, एका जुन्या सहकारीचा फोन आला. हॅलो, देशभक्त कैसे हो( बहुतेक त्याला अंधभक्त म्हणायचे होते), मी पण काही कमी नाही लगेच त्याला उत्तर दिले, बोल रे टेबलस्पून, बऱ्याच दिवसांनी तुला आठवण आली, काय म्हणायचं आहे. अरे तुझ्या फेकूने नारा दिला आहे आपकी बार सौ पार. खूप लांबची फेकली आहे. ७० पेक्षा कमी मिळाले तर गोची होईल. विपक्ष हा मुद्दा उचलून धरणार आणि त्याचा निवडणुकीवर परिणाम होईल. तुला ही बरणाल वापरावे लागेल.

एक मधाळ अनुभव

लेखक रम्या यांनी शनिवार, 07/10/2023 18:43 या दिवशी प्रकाशित केले.
आज कधी नव्हे तो सोसायटीचा हणमंत वॉचमन ड्युटीवर असताना उभा होता. डाव्या हाताच्या तळहातावर उजव्या हाताच्या अंगठ्याने तंबाखू चोळत कंपाउंड जवळच्या एका झाडाच्या शेंड्यावर एकटक नजर लावून होता. बाजूला दोन्ही हातानी एक दांडकं उभं पकडून दोन पायांवर परसाला बसल्या सारखा विष्णू शिपाई निवांत बसला होता. सोसायटीच्या पदाधिकाऱ्याला साजेशा तुसडेपणाने मी डाफरलो, "सुट्टीवर आहात का चेअरमन साहेब?" सोसायटीच्या वाँचमनला साजेशा बेफिकीरपणे तो उत्तरला, "डिवटीवरच हाये साहेब. ते बघितलं का मधल्या फांदीवर?

संगीत प्र(या)वास

लेखक कुमार जावडेकर यांनी बुधवार, 04/10/2023 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
अलीकडेच एका मित्रासोबत कुठल्या तरी बुवांच्या गायनाला गेलो होतो. त्यांनी 'केदार'चा एक स्वनिर्मित प्रकार गायला. गायकाचं नाव 'खार'कर असल्यानं बहुधा त्याच्या रागाचं नाव 'झुब-केदार' असं असावं असं माझ्या उगाच मनात येऊन गेलं. पण अर्थात, मला ते मित्राला सांगायचं धारिष्ट्य झालं नाही. उगाच (त्याचं ते आडनाव नसलं तरी) तो माझ्यावर खार खायचा. माझी सांगितिक वाटचाल कशी झाली असं जर कुणी विचारलं तर त्यावर 'अगतिक' हेच उत्तर मला पटकन सुचतं. त्या प्रयासाचं 'प्रागतिक'शी (मात्रा जुळत नसल्या तरी) यमक जुळवायचा त्रास मात्र मला टाळावासा वाटतो. प्रथम, संगीत म्हटलं की सूर आले.