महिलामंडळाने ठाण मांडलय,
फाटक्या “चिंधीच्या” तुटक्या झोपडीसमोर,
तीन दगडाची चुल, मोडकी ट्रंक,
आजारी सासू, तिथेच खेळणारी चिंधीची शेंबडी पोरं
तिला जाणीव करून देणार, तिच्या हक्कांची, अधिकारांची
आजचा शेवटचा टास्क,
सकाळपासुन चार “क्लायंट” केलेत, हा शेवटचाच !
बर्गर, पाच-सहाच इडल्या, सकाळचा ज्युस,बस्स
उन्हे तापलीयेत, फ्रीजमधली चिल्ड बिअर वाट पाहतेय…
चिंधी कुठे उलथलीय कोण जाणे?
एक दिवस नसती गेली कामाला, काय बिघडणार होते?
किती वाट पाहायची उन्हात अजुन?
उकिरड्याआड लपलेली चिंधी…
बाया काय जायाला न्हायी,
दाल्ल्याने हाग्यादम भरलाय, गोडधोड कर सांजच्याला
येक चिपटीबी आन, सरपनाच्या पैक्यातुन गुत्त्यावरनं
नर्सबायनं सांगटलय…
म्हैलादिन का काय म्हंत्यात ते हाय म्हनं आज!
माझ्या ब्लॉगवर पूर्वप्रकाशित !
विशाल...
वाचने
3117
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
कटू वास्तव
@कधी तरी अशा कथा पूर्णपणे
In reply to कटू वास्तव by श्रीरंग_जोशी
खरोखर समर्पणभावाने,
In reply to कटू वास्तव by श्रीरंग_जोशी
वास्तव ...sadly :-(
हम्म
छान.
बापरे....भयानक आहे...पण
2 वेळा टाइप करून प्रतिसाद
कथा आवडली..
धन्यवाद मंडळी !
नि:शब्द
विशाल्या
पंखा नाखु
सुन्न......
कटू
_/\_
छान मांडणी.