जपान, जपानी आणि मी !....भाग ३
भाग १
भाग २
पुर्वी कधीतरी एक म्हण ऐकली होती की ज्या पुरुषाचे घर अमेरिकन आणि ज्याची बायको जपानी तो माणूस जगातला सर्वात सुखी माणूस आहे....अशा काहीशा अर्थाची...
अशाच काही सुखी पुरुषांची घरं आमच्या आसपास होती. या जपानी पुरूष मंडळींचा थंडीतला सकाळी कामावर जाण्याचा सोहळा थोडाफार असा होता. ओहायोच्या उणे १२ डिग्री सेल्शीयस तापमान आणि बर्फाच्या चार फुटी ढीग जमलेला ड्राइववे साफ करण्यासाठी बायको भल्या पहाटे बाहेर पडणार.
मिसळपाव