Skip to main content

सायकल राईड - तापोळा - भाग २ (समाप्त)

लेखक मोदक यांनी शनिवार, 23/01/2016 18:27 या दिवशी प्रकाशित केले.
...नंतर एका शेकोटीजवळ शेकत शेकत जेवण आवरले व रात्री तिथल्या सगळ्या टूरिस्ट सोबत १२ वाजेपर्यंत अंताक्षरी खेळत दिवस संपला सकाळी कडाक्याच्या थंडीत जाग आली. सगळा परिसर धुक्याची दुलई पांघरून झोपी गेला होता. सुर्योदय होण्याआधी मी आवरले. थोड्या वेळात अमित आणि किरणही उठले व आवरू लागले. काल जेवताना व नंतरही आमचे बरेच वेगवेगळे प्लॅन्स ठरत होते व रद्द होते. तापोळा-बामणोली-सातारा-पुणे असे जायचे की पुन्हा महाबळेश्वर-पुणे करायचे वगैरे चर्चा झाल्या होत्या.

सर्वोच्च न्यायालयाचा पथदर्शक निर्णय

लेखक पुणे मुंग्रापं यांनी शनिवार, 23/01/2016 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
काही महत्वाच्या कामासाठी किंवा चक्क सुट्टीमध्ये चार दिवस मजेत घालवण्यासाठी परगावी जायला आपण रेल्वेचे आरक्षण करावे, आणि स्टेशनवर जाऊन बघावे तर आपले आरक्षणच गायब ! शेवटी प्रवास रद्द करण्याची वेळ येते . जीव चडफडतो . रेल्वेच्या एका कर्मचाऱ्याची चूक किंवा हलगर्जीपणा , पण त्याची केव्हडी किंमत ग्राहकाला द्यावी लागते ?ग्राहक म्हणून आपल्याला मिळालेली अशा प्रकारची सेवा ही निश्चीतच सदोष असते. अशा वेळी जागरूक ग्राहक हा ग्राहक संरक्षण कायद्याचा (ग्रा.सं.

थोरले माधवराव यांचे अस्सल चित्र

लेखक मनो यांनी शनिवार, 23/01/2016 10:17 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या महाराष्ट्र टाईम्स मध्ये माझे संशोधन प्रसिद्ध झाले त्याबद्दल हा एक छोटा लेख. कुणाला अजून काही माहिती असेल अथवा काही प्रश्न असतील तर जरूर विचारावेत यासाठी (आणि चित्राला व मला थोडी अजून प्रसिद्धी मिळावी या स्वार्थी हेतूने) इथे मिसळपाववर लेख टाकत आहे. या शोधात मिसळपाव सदस्य बॅटमॅन यांचीही थोडीफार मदत झाली त्याबद्दल त्यांचे आभार! "या तरुण पेशव्याचा अकाली मृत्यू म्हणजे मराठी साम्राज्याच्या जिव्हारी बसलेला घाव, त्यापुढे पानपतचा आघात काहीच नव्हे" -- ग्रॅंट डफ थोरला माधवराव पेशवा. बुद्धिमान, मानी आणि तेजस्वी. लहान वयातच मोठमोठी कृत्ये करून तरुणपणीच निजधामी गेलेला असा हा कर्तृत्ववान पेशवा.

एयरलिफ़्ट

लेखक समीर_happy go lucky यांनी शनिवार, 23/01/2016 09:34 या दिवशी प्रकाशित केले.
तेलाच्या भांडणात, सद्दामच्या सुवर्णकाळात, इराकने कुवैतवर आक्रमण केले, त्या काळात कुवैतमध्ये अडकलेल्या भारतीयांना सोडवण्यासाठी कदाचित मानवी इतिहासातील सगळ्यात मोठी सुटका मोहीम (Evacuation) आखण्यात आली होती. जरा इकडे-तिकडे वाचन करण्याची सवय असेल तर या मोहिमेचे कौतुक बरेच ठिकाणी बघितले असेल. या कथेपासून प्रेरित होऊन अक्षय कुमार त्या कथेवर बेस्ड सिनेमा घेऊन आला असून एक मनापासून केलेला चांगला प्रयत्न असे याचे वर्णन करता येईल.

थंड डोक्याने...

लेखक हुप्प्या यांनी शनिवार, 23/01/2016 08:08 या दिवशी प्रकाशित केले.
एक अस्सल अमेरिकन कादंबरी वाचली ज्याचे नाव इन कोल्ड ब्लड अर्थात थंड डोक्याने (केलेले कृत्य). एका सत्य घटना कादंबरी रूपाने सादर करण्याचा एक नवा प्रयोग ट्रुमन कपोट ह्या लेखकाने केला. एक अत्यंत खिळवून टाकणारी, अत्यंत नाट्यपूर्ण कलाकृती त्यातून जन्माला आली. ही कादंबरी अनेक शाळात अभ्यासक्रमात सामील केलेली असते. त्यावर एक उत्तम चित्रपटही बनलेला आहे (तेच नाव). ह्या लेखकाला ह्या घटनेचे वेडच लागले होते. तो तहानभूक विसरून ह्या प्रकरणाचा अभ्यास करत होता आणि त्यातूनच इतके चांगली कलाकृती निर्माण झाली आहे. काय घडते ह्या गोष्टीत (खरे तर काय घडले होते?) ?

श्री गुरू...एक कोडे (भाग-१)

लेखक शरद यांनी शनिवार, 23/01/2016 07:30 या दिवशी प्रकाशित केले.
( भाग १. भारतात गुरूभक्ती का रुजली असावी ? थोडा इतिहास. भागे २.. मला वाटते.) गुरू ही भारतीय संस्कृतीतली एक महत्वाची संकल्पना आहे. अध्यात्म तर सोडाच पण संगीत, नृत्य अशा ललित कलांमध्येही ही गुरूभक्ती म्हणजे टोकाची, अंतीम श्रद्धेची, भावना आहे/ होती असे आढळून येते. भावूक, श्रद्धाळू शिष्याचे सोडा, तुम्ही त्याच्याकडे कणवेने, गरीब बिचारा, त्याला अक्कल नाही, अशा विविध दृष्टीकोनातून पाहू शकता. विषेशत: त्या विषयातले खोल ज्ञान आपणास नसेल तर अशी भुमिका घेणे सोपे जाते.

एक स्कॉर्पियो आणि सहा जण... भाग ४

लेखक संदीप डांगे यांनी शुक्रवार, 22/01/2016 23:46 या दिवशी प्रकाशित केले.
पहिला भाग | दुसरा भाग | तिसरा भाग या सगळ्या धावत्या कथेला एक साइडट्रॅकही होता. अजून पुढे.... ----------------------------------------------------------------------------------------------- क्रमशः

तो........

लेखक एक एकटा एकटाच यांनी शुक्रवार, 22/01/2016 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
उदासल्या अंबरी तो कधीचा दाटलेला आसवांत होई रिता परी उरी साचलेला........ लाख अडवू पाही तो या आठवांच्या लाटां ज्या डिवचूनी जाती त्या उध्वस्त तटाला........ उन्हे पेटवूनी गेली त्याची गाफिल स्वप्ने आता उरले ना काही ह्या रात्रीस जाळण्याला..... उतरती सांज बोले सावर रे वेडया ना तिचा दोष काही होता तुच फसलेला......... ती येईल माघारी तुझ्यासाठी एकदातरी का आस ही वैरी झुलवी त्या जिवाला..... बहरला गुलमोहर जेव्हा तिच्या अंगणात निरोपाच्या फुलांनी होता मग तोही सजलेला.........

आरसा हरवेल तेव्हा ये ..

लेखक drsunilahirrao यांनी शुक्रवार, 22/01/2016 20:22 या दिवशी प्रकाशित केले.
आरसा हरवेल तेव्हा ये (चेहरा गवसेल तेव्हा ये) केवढी गर्दी तुझ्याभवती.. एकटे वाटेल तेव्हा ये पोकळी आहे जशी येथे ही तिथे दाटेल तेव्हा ये दाह सोसावा कसा तुजला हा ऋतू बदलेल तेव्हा ये वाहती आहेच ही दुनिया पण कधी आटेल तेव्हा ये.. डॉ.सुनील अहिरराव
काव्यरस

१०० स्मार्ट सिटी आव्हाने की स्मार्ट नेत्यांची कसोटी

लेखक नितीनचंद्र यांनी शुक्रवार, 22/01/2016 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
कालच म्हणजे २१/१/२०१६ ला चिंचवडच्या रामकृष्ण मोरे सभागृहात स्मार्ट सिटी आव्हाने या विषयावर रोटरी क्लब आयोजीत शिशीर व्याखानमाला यात एक परिसंवाद झाला. आज काल प्रचार नाही तर सर्व व्यर्थ या तत्वावर मोठे वक्ते येऊनही रामकृष्ण मोरे सभागृह अर्धे भरेल इतकी गर्दी दिसली नाही. जे कोणी होते ते सर्व निवृत्त आणि वेळ घालवायचे साधन म्हणुन आलेले. तरुणाई मोजकीच दिसत होती. या परिसंवादात श्री अभय फिरोदीया.