मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पॉम्पे (२०१४)= मोहोंजोदारो (२०१६) ??

पगला गजोधर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
पॉम्पे' एक पीरियड अॅक्शन सिनेमा होता. मीलो नावाच्या एका पात्राभोवती सिनेमाचे कथानक गुंफण्यात आले होते . सिनेमातील मुख्य पात्र आपल्या प्रेयसीसाठी स्थानिक लोकांशी लढतो. मीलोची प्रेयसी कॅसियो एका श्रीमंत व्यापारीची मुलगी आस्ते. रोमन सिनेटर हा व्हिलन असतो. ज्याचा हिरोईन वर डोळा असतो. हिरोच्या आईचा खुनी पण तोच सिनेटर . आता या सिनेटर ला मारून, सर्व शक्तीमान रोमन सैन्याचा कसा मुकाबला करायचा, तर निसर्ग ज्वालामुखीद्वारे पूर्ण पॉम्पे' चा नाश करतो. त्यातच हिरो (पुर्वश्रमीचा रोमन गुलाम) व हिरोईन, तुज्यावाचून कसं जगू गं/रे, म्हणून दुनियाकी कोई ताकत और ज्वालामुखी हमें जुदा नै कर सकते, म्हणून तिथंच थांबून कोळसा होतात वै वै अशी तद्दन बकवास स्टोरी होती (हॉलिवूड निर्मित असून बकवास वाटली) तर येणारा 'मोहोंजोदारो' नामक चित्रपट पण याच पॉम्पे' सिनेमाच्या धर्तीवर, कॉपी टू कॉपी - माशी टू माशी (विथ सम आयटम सॉंग + गाणी + रितिक म्हटल्यावर ड्यान्स , यांच्या तडाक्यासह) असणार कदाचित, असं माझा सिक्स्थ सेन्स सांगतोय. कुणीतरी 'मोहोंजोदारो' पहा, आणि या धाग्यावर सांगा. आपली तर हिम्मत होत नाही ब्वॉ हा चित्रपट पाहण्याची.

वाचने 7018 वाचनखूण प्रतिक्रिया 30

स्वामी संकेतानंद 10/08/2016 - 20:41
मेरेकु बी वैसाइच लग र्‍या. कदाचित शेवट बदल्तील. नायक सगळ्यांना सुरक्षित बाहेर काढेल महापुरातून आणि ते आप्ले स्थलांतर सुरू करतील.

अनिरुद्ध.वैद्य 10/08/2016 - 20:52
अडीच वर्ष अभ्यास करत होते म्हणे. आता पोम्पे ते मोहेनजोदारो कसं कॉपी करायचं ह्याचा अभ्यास होता होय!

पद्मावति 10/08/2016 - 21:50
अगदी हेच वाटतंय मलाही. गोवारीकर साहेब बहुतेक कन्फ्यूज़ झाले आहेत. ग्रीक, रोमन कॉस्ट्यूम्स आहेत चक्क. पण चित्रपट एकदा तरी बघीनच:)

अभ्या.. 10/08/2016 - 22:07
काहीही असू दे फक्त व्हिलन म्हणजे तो जगप्रसिद्ध किलवरची शाल पांघरलेला मोहेंजोदारोचा दाढीवाला पुरोहित नसू नये म्हणजे बरे.

In reply to by संदीप डांगे

अभ्या.. 10/08/2016 - 23:44
हेहेहे, हेच साहेब. लै छळले हिस्ट्री ऑफ इंडियन आर्ट मध्ये याने. ती एकाच हातात बांगड्यावाली झिरो फिगर दीपिका असणार बहुतेक. लै कमी ओरिजिनल इन्पुटसवर पिक्चर काढलेला असनारे. बाकी सब हॉलिवूड मसाला. आय बेट.

In reply to by संदीप डांगे

पगला गजोधर 11/08/2016 - 13:00
कुणाशीतरी हुबेहुब मिळतंजुळतं दिसतंय
कपाळावरील पट्टी/मुकुट हा पुतुळा, तत्कालीन कुठल्या तरी प्रधान पदी असलेल्या व्यक्तीचा असावा असे वाटते. अंगावरील महावस्त्रावरील बुट्टी ही नक्षीकाम नसून, त्याचे तत्कालीन लिपीतले नाम असू शकते. ठेवलेली कोरीव दाढी ही तत्कालीन अधिकारपदावरील व्यक्तीमधली फ्याशन असू शकते. असो पण महाप्रलयानंतर आपण फक्त अंदाजच बांधू शकतो.

ज्योति अळवणी 10/08/2016 - 23:02
मेहेनत घेतली आहे गोवारीकरने हे आपण वाचतोच आहोत. या अगोदरचे त्यांचे सिनेमे चांगले बनले आहेत. मुख्य म्हणजे लगान ही काल्पनिक कथा असूनही कदाचित खरंच असं घडलं असेल असं सिनेमा संपून बाहेर पडताना अनेक प्रेक्षकांना वाटत होत... त्यामुळे मोहन्जोदारो चांगला सिनेमा असावा असं मानायला काय हरकत आहे? त्यांनी आपल्या इतिहासाची चेष्टा केली नसली म्हणजे झालं. बाकी कथा कशी खुलवायची हा कथा लेखकाचा प्रश्न.इतकी नकारात्मकता का?

In reply to by ज्योति अळवणी

आदूबाळ 11/08/2016 - 11:42
त्यामुळे मोहन्जोदारो चांगला सिनेमा असावा असं मानायला काय हरकत आहे?
मानायला काय आम्ही डेव्हिड धवनला जगातला सर्वोत्तम दिग्दर्शकपण मानू. पण गोवारीकरकडून कॉपीबाजीची अपेक्षा नाही. लगान, स्वदेसमुळे मिळालेलं पुण्य तो मातीत घालतो आहे. नकारात्मकता या कारणासाठी आहे.

In reply to by आदूबाळ

गंम्बा 11/08/2016 - 12:12
मानायला काय आम्ही डेव्हिड धवनला जगातला सर्वोत्तम दिग्दर्शकपण मानू.
मी तर डेव्हीड धवन ला गोवारीकरांपेक्षा वरचाच नंबर देइइन. धवन च्या सिनेमांनी भरपुर मनोरंजन केले आहे आणि आयुष्यात भरपुर हसवले आहे.

In reply to by ज्योति अळवणी

पगला गजोधर 11/08/2016 - 12:54
इतकी नकारात्मकता का?
आमचं एवढंच म्हणणं आहे, की आमी धाशात खाल्ली, म्हनून, आमी हेल्दी स्केप्टीसिज्म चं चिलखत अन जिरेटोप घालून बसलोया, शिवाय उपरोध व टीकेचा बिचुआ अन वाघनखे धारण केलिया. आमी काय घरगडावरून खाली उतरून, मोहंजोदारो खानाला भेटायला, मल्टीप्लेक्स च्या शामियानात जावूंचा नाय आक्के ! तुम्हास्नी दोन्ही हात फैलावून साकारत्मकतेने मोहंजोदारोला गळाभेट द्यायची असल्यास खुशाल द्या, हा मग् मोहंजोदारोने पाठीत निराशेचा खंजीर खुपसल्यावर रडूचा नाय मग.

In reply to by ज्योति अळवणी

1) लगान किती हि चांगला असला तर तो कॉपी होता - कोणी व्हिक्टरी किंवा एसकेंप टू व्हिक्टरी आणि टू हाल्फ टाइम्स इन हेल - या चित्रपटांतून "प्रभावित " होता - अर्थात भारतात अनेकांना नंतर "ओरिजनल " कथा सु च तातच !! https://en.wikipedia.org/wiki/Two_Half_Times_in_Hell https://en.wikipedia.org/wiki/Escape_to_victory http://whocopywho.blogspot.in/2008/07/lagaan-copy-paste-of-victory.html 2) स्वदेस बारा होता असे म्हणतात ( मी पहिला नाही ) पण बऱ्याच जणांना तो कंटाळवाणा वाटला , आणि तिकीट बारीवर वाईट पडला. 3) नंतर गोवारीकर चा ऐक हि चित्रपट चालला नाही . ( व्हॉटस युअर राशी ? , खेले हम जी जण से , जोधा अकबर ) - जोधा अकबर हा सेमी हिट होता असे म्हणतात त्यामुळे याकडून काही अपेक्षा नव्हत्या .....

In reply to by हेमन्त वाघे

आदूबाळ 12/08/2016 - 17:03
प्रभावित असण्याला आक्षेप आहे का? कॉपी जरूर करावी पण स्वतःचं डोकंही लावावं. नगाला नग फ्रेमीला फ्रेम असं कॉपीपेस्ट नको. उदा. चाची ४२० हा सरळसरळ डाऊटफायरवर बेतलेला होता. पण तरीही चाची उच्च आहे कारण त्यात डोकं लावलं गेलं आहे. "चाची का पती कौन" हा अशक्य भारी प्रकार डाऊट्फायरमध्ये नव्हता. तसंच लगानचं कथाबीज कुठलंही असलं तरी गोवारीकरने डोकं लावलेलं आहे. रच्याकने: विकीपिडिया वाचून मला "एस्केप टू व्हिक्टरी" "टू हाफ टाईम्स" ची कॉपी वाटला.

In reply to by आदूबाळ

अनुप ढेरे 12/08/2016 - 17:06
उदा. चाची ४२० हा सरळसरळ डाऊटफायरवर बेतलेला होता. पण तरीही चाची उच्च आहे कारण त्यात डोकं लावलं गेलं आहे. "चाची का पती कौन" हा अशक्य भारी प्रकार डाऊट्फायरमध्ये नव्हता.
+१. सेम विथ कायद्याचं बोला.

In reply to by अनुप ढेरे

पगला गजोधर 12/08/2016 - 17:51
माय कझिन विंनी, अतिशय क्लास चित्रपट आहे. त्याचं वऱ्हाडी स्टायल वडा आपल्याला काही जास्त आवडला नाही. (सॉरी इन ऍडव्हान्स)

In reply to by आदूबाळ

हेमन्त वाघे 12/08/2016 - 17:57
मला लागण ऑस्कर साठी गेला होता त्यावेळी वाटले होते कि या चोरीचा सरळच उल्लेख होतो काई ? पण जाऊ दे . आपला अशतोष असल्याने त्याची चोरी म्हणजे इन्स्पिरेशन आणि अनु मलिक करतो ती -- ती चोरी !! आपण विकिपीडिया वाचाल असेल तर त्यात लिहिले आहे - Two Half Times in hell - Two Half Times in Hell was remade as the 1981 American-British film Escape to Victory, this time with the prisoners of war representing a diverse group of countries, and a happier ending. In addition, the 1974 film The Longest Yard, about an American football game between prisoners and their wardens, has been compared to Two Half Times in Hell; The Longest Yard has been remade three times. तसेच Escape to व्हिक्टरी च्या विकीत हि स्पष्टपणे लिहिले आहे कि - Based on Two Half Times in Hell त्यामुळे ते आहेच - वाटण्याचा प्रश्न येत नाही
मोहेंजोदारो पॉम्पीचे 'इंडीयन वर्जन'च असेल, फ्लॉप होण्याची दाट शक्यता. @डांगेभाऊ- आपले आदरणीय पंतप्रधान पुराणपुरूष आहेत याचा पक्का पुरावा दीलात तुम्ही.

मयुरा गुप्ते 11/08/2016 - 01:01
आताच एक गाणं ऐकलं.. ए.आर.रेहेमानने स्वःत गायलेलं.."तु है". ए.आरचं संगीत मला आवडतं पण मोहेंजोदारो जे प्रगत पण अतिप्राचीन असलेली संस्कृती होती..त्यासाठी एकदम टेक्नो सॅव्ही म्युझिक, उल्ट्रा मॉर्डन नृत्य, हे जरा काहिच्या काहिच वाटतयं. पण ह्या सिनेमॅटीक लिबर्टीच्या नावाखाली असल्यामुळे बाहुबली सारखे तंत्रपूर्ण द्रूश्य बघायला मिळतील असं वाटतयं. --मयुरा

अभिदेश 11/08/2016 - 02:20
सोसा .. 2 दिवसांत प्रदर्शित होणार आहेच ना चित्रपट ? आदींपासून का नकारघंटा लावताय ?

अभिदेश 11/08/2016 - 02:22
सोसा .. 2 दिवसांत प्रदर्शित होणार आहेच ना चित्रपट ? आधीपासून का नकारघंटा लावताय ?

चिनार 11/08/2016 - 13:45
गोवारीकरांच्या लगान,स्वदेस,जोधा अकबर या पूर्वपुण्याईच्या जोरावर येणारा मोहोंजोदारो बघीतल्या जाणार आहे. कॉपी -पेस्ट नसेल असा विश्वास आहेच. पण असला तरी इंग्रजी सिनेमाचं आमचं ज्ञान शून्य असल्यामुळे ते आमच्या लक्षात येणार नाहीच... सगळे हिंदी सिनेमा इंग्रजी सिनेमांची कॉपी असतात असं मानणारा एक वर्ग आहे आपल्याइथे. माझ्या एका मित्राच्या मते दिल चाहता है हा अमरिकन पाय ची कॉपी होता, हे ऐकल्यावर प्रीती झिंटाला डोळ्यासमोर ठेऊन किती आशेने मी सिनेमा पाहायला गेलो होतो म्हणून सांगू !! :-)

वाल्मिक 11/08/2016 - 14:27
SHAZIA JUL 04, 2016 03:17PM Why am I feeling this flick is an Indian version of Pompeii.? And horrible end tho. Before this , before that... why not simply say, before you know time or era there was Mohenjo-Daro. Khala, सिम्पल http://images.dawn.com/news/1175742

In reply to by वाल्मिक

पगला गजोधर 11/08/2016 - 14:51
हा पेपर माझ्या वाचनात नसल्यामुळे, तुमच्या या प्रतिक्रियेमुळे तिकडची लोकं पण असाच विचार करतात, हे पाहून अंमळ मौज वाटली. बाकी वाल्मिक भाऊ, भविष्यात तुमच्या या पेपरच्या नियमित वाचनात, आणखी काही मजेदार किस्से आले, तर जरूर मिपावर शेअर करायचं बर्का. खम्पलसरी समजा हवं तर.