प्रश्नत्रयी
कृष्ण-विवराच्या
गर्भीच्या कल्लोळा
वेध का लागती
दिक्काल-मुक्तीचे ?
स्थूलास व्यापून
सूक्ष्मात सांडता
कैवल्य ओलांडी
उंबरे कशाचे ?
तुझ्या नि माझ्या
निर्लेप नात्याला
पाश हे कशाला
जीवन मृत्यूचे ?
काव्यरस
होतकरू नगरसेवकानची भरली होती सभा,
होतकरू नगरसेवकानची भरली होती सभा,
व्होटर होता सभापती मधोमध उभा.
व्होटर म्हणाला, व्होटर म्हणाला, "मित्रांनो,
देवाघरची लूट..
काव्यरस
वर्ल्डकप क्लासिक्स - १९९२ - सेमीफायनल - इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रीका
२२ मार्च १९९२
एससीजी, सिडनी
न्यू साऊथ वेल्समधल्या सिडनीच्या ऐतिहासिक मैदानात गेल्या वर्ल्डकपमधले उपविजेते इंग्लंड आणि अपार्थाईड व्यवस्था मोडीत निघाल्यावर वर्षाभरापूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलेली दक्षिण आफ्रीका यांच्यात वर्ल्डकपची दुसरी सेमीफायनल रंगणार होती. या मॅचमधील विजेत्या संघाची मेलबोर्नच्या मैदानावर फायनलमध्ये गाठ पडणार होती पाकिस्तानशी!
ग्रॅहॅम गूचच्या इंग्लिश संघात स्वतः गूच, अनुभवी अॅलन लॅम्ब, ग्रॅहॅम हिक, नील फेअरब्रदर, अॅलेक स्ट्युअर्ट असे बॅट्समन होते. इंग्लंडच्या बॉलिंगचा भार मुख्यतः अनुभवी फिलिप डिफ्रीटार, ग्लॅडस्टन स्मॉल, रिचर्ड इलिंगवर्थ यांच्यावर होता.
!!! ....सभा "Social Networking " ची.... !!!
भरली होती एकदा 'Social Networking' ची सभा
Twitter होता मध्यस्थानी, Facebook सोबत उभा..
चढ़ाओढ़ होती लागली, कोण Social Networking चा राजा
Google Plus आणि Ibibo करत होते प्रसिद्धीसाठी गाजा - वाजा..
Orkut म्हणाले Facebook ला , तुझ्यामुळे गेली माझी खुर्ची
Facebook च्या आगमनाने Orkut ला भलतीच लागली होती मिरची..
Linked IN म्हणाले आहे मी 'Professional', मलाच करा 'King'
सगळे म्हणाले, "Timepass" की बात करो तो "LINKED IN is Nothing " ..
Whatsapp म्हणाले गर्वाने, करतात मला सगळे Like
काय माहित,देव जाणे, रूसून कोपऱ्यात का बसले Hike..
या सर्व गदारोळात..
Myspace, PerfSpot, BigAdda ओरडत होते
'आम्ही पण आह
काव्यरस
धोडपचे धाडस - सोलो ट्रेक
शीर्षक वाचून काही जण गोंधळतील तर काहींचा विश्वास बसणार नाही. पण जे अनुभवलयं तेच इथे लिहीत आहे. सतरा वर्षांच्या ट्रेकींग प्रवासातील मी एकट्याने केलेला पहिलाच ट्रेक. एक वेडेपणाच.
नोव्हेंबरच्या दुसर्या आठवड्यात माझी पंढरीची वारी (परीक्षा) आटोपली होती. त्यानंतर आँफिसला रूजू होण्याची घाई नसल्याने खूप निवांत झालो होतो. आजच्या काळात नशिबाने मिळालेल्या अशा मोकळ्या वेळात वाचन पुन्हा सुरू केलं. पण यंदा चटक लागली ती e-sahityवरच्या 'भूतकथा, रहस्य, गूढकथा, तंत्र-मंत्र' ह्यांची. दिवसरात्र ती पुस्तक वाचवून संपवत होतो.
भाषेचे मूळ : चिंता आणि चिंतन
- डॉ. सुधीर रा. देवरे
जानेवारी-फेब्रुवारी (२००३) महिन्यात भाषेविषयीच्या राष्ट्रीय पातळीवरील चर्चासत्रासाठी ‘अहिराणी भाषेचा प्रतिनिधी’ या नात्याने निमंत्रित म्हणून म्हैसूर येथील केंद्रीय भाषा संशोधन संस्थेत गेलो होतो. दिवसभर परिसंवादातील चर्चा आणि रात्री विविध नाटके पाहायला मिळत होती. नाटकांना जाताना भाषेची निवड हा भाग दुय्यम महत्त्वाचा होता.
रात्र…
दामूचं कायतरी बिनसलंय हे तिनं तो संध्याकाळी घरी आला तेंव्हाच ओळखलं होतं. एक दोनदा तिनं तसं विचारायचा प्रयत्नही केला पण दामूने दाद दिली नाही. जेवताना दामूचं लक्ष नव्हतं. आज कित्येक दिवसांनी तो पोरांवर डाफरला ही नव्हता. रात्री विचारू असं म्हणून ती शांतपणे तिची कामं करत होती. अर्थात रात्री दामू तिला विचारायला वेळ कधीच देत नव्हता. अश्या कितीतरी गोष्टही तिने रात्री बोलू,विचारू म्हणून मनातच दाबून ठेवल्या होत्या. रात्री दामू आपला 'कार्यभाग' साधेपर्यंत ती मनातल्या मनातच त्याच्याशी कितीतरी बोलून जायची. तोंड उघडलं तर आवाजाने पोरं उठतील अशी भीती तिला वाटायची.
गजलांकित प्रतिष्ठान
जनार्दन केशव म्हात्रे आणि त्यांच्या गजलांकित प्रतिष्ठान बद्दल (आंतरजालावर स्वतंत्र स्रोतातून पुरेशी माहिती मिळत नसल्यामुळे माहितीची खात्री करुन हवी अथवा दुजोरा हवा आहे.
गजलांकित प्रतिष्ठान
https://mr.wikipedia.org/s/30r3
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
गजलांकित प्रतिष्ठान ही महाराष्ट्रातील म
मोबियस प्रकरणे भाग -२ प्रकरणे ११-१२
त्याचे डोकेच काम करेनासे झाले होते. त्यातच पडलेल्या स्वप्नाने ते पुरते भंजाळून गेले. स्वप्नात तो एका खराट्याच्या काडीवर एका रस्त्यावरुन उडत चालला होता. एखादी स्कुटर चालवावी तशी. पण जशी त्याची नजर रस्त्यावरुन ढळली तसा तो धाडकन जमिनीवर आला. त्याच्या जवळचा रस्ता लाल होता तर दूरवर तो हिरव्या रंगाचा वाटत होता. त्या रंगसंगतीने तो गोंधळून गेला.
मिसळपाव