डॉक्टर ए.आर. शहाणे आणि श्राद्धाचा ब्राम्हण

विवेकपटाईत जनातलं, मनातलं
(रूपक कथा) नुकताच गेलेल्या पितृपक्षातली गोष्ट. बर्याच महिन्यांनी मला माझा एक जुना मित्र भेटला. डॉक्टर ए.आर. शहाणे त्याचे नाव. नावाप्रमाणेच अत्यंत हुशार. विषय कुठलाही असो, ज्ञान पाजायला नेहमीच उत्सुक. पण या वेळी त्याचा चेहरा मरगळलेला होता. मी विचारले कसली चिंता करतो आहे. तो म्हणाला तुला माहितच आहे, दरवर्षी मी पितरांना प्रसन्न करण्यासाठी ब्राम्हणाला घरी जेवायला बोलवितो, दान-दक्षिणा देतो. मी म्हणालो, त्यात एवढे उदास असण्याचे कारण काय. तो म्हणाला, गेल्या वर्षी हा ब्राम्हण पितृपक्षात घरी आला होता, जेवण झाले, दक्षिणा दिली. त्या वर त्याचे समाधान झाले नाही. जाताजाता माझ्या ५ वर्षाच्या मुलाच्या नाकावर मुक्का मारला आणि म्हणाला या वर्षी तुझ्या मुलाचे नाक तोडले आहे पुढच्या वर्षी तुझ्या मुलाची तंगडी तोडणार आहे. मी म्हणालो, एक मुस्कटात का नाही लावली त्याला? तो उतरला, एक तर अतिथी आणि त्यात ब्राम्हण. कसा मारणार त्याला. मुलाला हॉस्पिटलला घेऊन गेलो, नाकाचे हाड तुटले होते, सर्जरी करावी लागली. मी म्हणालो, झाले गेले विसरून जा. आता त्या ब्राम्हणाला पुन्हा घरी बोलवू नको, इतरांना हि तसे करायला सांग. चांगली अद्दल घडव त्याला. त्या वर तो म्हणाला, असे कसे करू शकतो, जुने संबंध आहेत, त्याच्या सोबत. त्याला वाळीत टाकणे केंव्हाही उचित नाही. येत्या रविवार मी त्यालाच घरी बोलविणार आहे. आता काय म्हणणार, अश्या उच्च शिक्षित विद्वान माणसाला. मी कपाळावर हात मारला, डोळ्यांसमोर, पायाला प्लास्टर बांधलेल्या अवस्थेत त्याच्या मुलाचा चेहरा डोळ्यांसमोर तरळला.
वर्गीकरण
लेखनप्रकार

36 टिप्पण्या 7,950 दृश्ये

Comments

पिलीयन रायडर नवीन

काय????? नाकावर मुक्का मारला? नाक फोडलं ५ वर्षाच्या मुलाचं??? आणि तरी मायबाप ओके आहेत?!!! ही सत्यकथा आहे?

खटपट्या नवीन

ऐकावे ते नवलंच... रच्याकने, मला त्या डॉक्टरच्या नाकावर ठोसा मारावासा वाटतोय...पितरांना प्रसन्न करतोय मेला....

कायरा नवीन

अशा लबाड ब्राह्मणांच कशाला समाधान करायच. द्या सोड़ून!मित्र वर्णन केल्याप्रमाणे खरोखरच हुशार आहे का शंका वाटते.काय तर म्हणे त्याला वाळीत टाकणे उचित नाही. मग इथे काय उचित आहे?

llपुण्याचे पेशवेll नवीन

In reply to by कायरा

अगदी बरोबर मित्र हुशार आहे पण चाकोरीबाहेर जाऊन त्या ब्राम्हणाला वाळीत टाकयला धजत नाहीये.

संदीप डांगे नवीन

In reply to by पिलीयन रायडर

दोन: रूपक भारत पाक संबंध व बॉलिवूड पाकिस्तानी आर्टिस्ट वर आहे एक: रूपक अंमळ हुकले आहे मतितार्थ: आमची बुद्धी क्षीण आहे, सारक्याजमचं खरे नाही राहिले हे दोन्ही अर्थाने होते हे नमूद करायचे इसरलो! ;) संबंधितांनी हलके घ्यावे!

जयन्त बा शिम्पि नवीन

या वर्षी तुझ्या मुलाचे नाक तोडले आहे पुढच्या वर्षी तुझ्या मुलाची तंगडी तोडणार आहे. काय कारण ? आणि बाप म्हणून नुसता बघत बसला ? कै च्या कै वाटले. भारत-पाक वर रुपकच लिहायचे होते तर अधिक विस्ताराने चांगले खुलविता आले असते.

सचु कुळकर्णी नवीन

डॉक्टर ए.आर. शहाणे त्याचे नाव. नावाप्रमाणेच अत्यंत हुशार. विषय कुठलाही असो, ज्ञान पाजायला नेहमीच उत्सुक. पण या वेळी त्याचा चेहरा मरगळलेला होता.

कैलासवासी सोन्याबापु नवीन

In reply to by सचु कुळकर्णी

ओ डांगे बुआ, ओ सचिन भाऊ लावाचे का बेटींग आकडे "रुपक पहचानो मिलन महा आकडा २०१६" म्हणुन ;)

सचु कुळकर्णी नवीन

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

चालते ना बाप्पु. थांबा जरा मांगच्या हप्त्याचे ओपन अन क्लोज चे रीजल्ट पाहु द्या गेशींग साठी ;) डांगे बॉ निरा घाबरवते राजा आता आमच्या हल्याच्या मस्तकात नाय घुसली ते रुपक का व्हय ते म्हनुन का ईतले प्रश्न चीन्ह टाकाव ;)

सतिश गावडे नवीन

(रूपक कथा)
चुकून विनोदी च्या ऐवजी रुपक लिहीले का?

सिरुसेरि नवीन

ए . आर . रहमान आणी ए . आर . मुरुगाडॉस तेवढे माहिती आहेत .

आनंदी गोपाळ नवीन

अवो, पतंजलीची अ‍ॅड आहे ती! कितीपण खराब प्रॉडक्ट विकले, त्याने नाक फुटलं, पुढे तोंड हात पाय तुटले तरी तेच घेणार अशी गोष्ट आहे.

विवेकपटाईत नवीन

In reply to by आनंदी गोपाळ

आनंदी गोपाळ (निश्चितच हे खरे नाव नाही), तुम्हास्नी गोष्ट कळली नाही, त्याला माझा इलाज नाही. वृतपत्र वाचत असता तर निश्चित गोष्ट कळली असती). बाकी काहीही म्हणा तुम्ही मला एक मौका दिला. आटा नूडल बाजारात मिळतात कि नाही म्हणून पतंजलीचे नाव दिले होते. त्या वरून इथल्या विद्वानांनी मला पतंजलीचा प्रचारक ठरविण्यास कमी केले नाही. आता तुम्हाला प्रश्न विचारतो, पतंजलीचे प्रोडक्ट निकृष्ट असतात हे विधान करायला किती मिळाले (रागावू नका). बाकी कुठल्या हि मार्केटिंग वाल्याला विचार एका निश्चित किमतीत पतंजली जी गुणवत्ता देऊ शकते दुसरे देऊ शकत नाही. कारण सुद्धा तो सांगू शकेल.

आनंदी गोपाळ नवीन

In reply to by विवेकपटाईत

पटाईतजी, पतंजलीचे प्रॉडक्ट उत्कृष्ट असतात, हे विधान करायला किती मिळतात? (रागावा) बाकी माझ्या खरे नसलेल्या नावाला उत्तर द्यायची इतकी निकड का भासली, याबद्दल काही लिहिणार का?

चौथा कोनाडा नवीन

बाप रे काय हिंसक धागा आहे ...... नाकावर मुक्का, नाक तोडले, तंगडी तोडणार .... ! नुकताच बापुंचा वाढदिवस झाला अन दोन चार दिवसात लगेच एवढी हिंसा ? भावना दुखावल्या ना आमच्या ! या वरुन एक आठवलं, कायप्पावर पण एक रुपककथा सध्या फिरत आहे: जंगलात रानडुक्कर माजलंच होतं सिंहाने काही दिवस सहन केलं मग घातली झडप, केला खातमा आणि सहज एक डरकाळी फोडली तर, कोल्हा म्हणाला.. पुरावा काय लांडगा म्हणाला... सिंह खोटं बोलतोय गाढव म्हणालं... भांडवल करतोय कहर म्हणजे उंदीर म्हणाला, माझ्या लग्नापूर्वी मीही सिंह होतो आणि मी तर तेव्हा चार रानडुकरं मारली होती ... पण जंगलाच्या सुरक्षेच्या दृष्टीने मी नाही ब्वा डरकाळी फोडली..... !