Skip to main content

माझे पहिले पर्यटन (शैक्षणिक सहल )

लेखक योगेश आलेकरी यांनी गुरुवार, 23/02/2017 20:10 या दिवशी प्रकाशित केले.
माझे पहिले पर्यटन (शैक्षणिक सहल ) आजमितीस जी काही फिरण्याची माझी आवड जोपासलीय त्याची पाळे मुळे अगदी थेट शालेय जीवनात जातात, प्रवासाचं भाग्य तस खूप लहानपणापासूनच लाभलेलं मला. कारण हि तसच, आपले लाड जिथे सर्वाधीक पुरवले जातात असे नातेवाईक मामा व आत्यांची गावे ७० किमी च्या परिघाच्या बाहेर. त्यामुळे लांबचा (त्यावेळी हा लांबचाच ) प्रवास पप्पांसोबत घडायचाच. पाहत गेलो. शिकत गेलो. खेडे गावातील पार्श्वभूमी असली तरी आमच्या गावाला डोंगराचं भाग्य लाभला नव्हतं ती कसूर भरून काढली ती जवळीलच ३ किमी वरील तुकाई देवी डोंगराने.

वेदना..

लेखक राघव यांनी गुरुवार, 23/02/2017 18:09 या दिवशी प्रकाशित केले.
फुकाचे भरवसे मिळतात सारे, हवे ते नेहमीच हुलकावते.. मागावयाचे कुणाला-कशाला.. वेदना मनातील वदू लागते! जगातील घडणे - जगाचे बिघडणे.. जगाचीच सारी दोषांतरे.. विवेकात शक्ती किती ती असावी.. डोळ्यात दिसती जुनी जळमटे! कधी दिव्य काही मनातून उठते [की] स्वतःचीच झोळी खुजी भासते.. फुटक्या घड्याची ओंजळ कितीशी.. थेंबासही ती नको वाटते! आशा-निराशा.. पुन्हा तीच रेषा.. गिरवण्यात आयुष्य शिलगावते! असावी मनाची किती लक्तरे ती.. वेचावयाला उलटती युगे! राघव

शेजाऱ्याचा डामाडुमा - श्री तीन राणाज्यूं को सरकार - नेपाळ भाग ६

लेखक अनिंद्य यांनी गुरुवार, 23/02/2017 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
=========================================================================== शेजाऱ्याचा डामाडुमा - भारताचे सख्खे शेजारी : प्रस्तावना... नेपाळ-०१... नेपाळ-०२... नेपाळ-०३... नेपाळ-०४... नेपाळ-०५... नेपाळ-०६...

पौगंडावस्थेतील मुला-मुलींच प्रेम

लेखक वसुधा आदित्य यांनी गुरुवार, 23/02/2017 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
'पौगंडावस्थेतील मुला-मुलींच प्रेम' हा आई-बाबांसाठी काळजीचा विषय. मुलगा किंवा मुलगी प्रेमात पडलेत हे कळल्यानंतर, 'हे वय आहे का प्रेम करण्याचं?' ह्या वाक्यापासून सुरुवात होते. प्रेमावर मग बंधनं घातली जातात. 'पुन्हा त्याला भेटलीस तर बघ', अशा धमक्या दिल्या जातात. प्रेमात पडण, अफेअर असणं म्हणजे वाया जाणं, असा समज असतो. म्हणूनच मुलांच्या प्रेमात पडण्याने आई-बाबा हवालदिल होतात. आपली मुलगी किंवा आपला मुलगा चुकीच्या माणसाच्या प्रेमात वाहवत जाऊ नये, ह्याची काळजी वाटणं ती घेणं पालक म्हणून खूप गरजेचं असतं. पण त्रागा हा त्यावर उपाय नाही.

वर्ल्डकप क्लासिक्स - १९९९ - सेमीफायनल - ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रीका

लेखक स्पार्टाकस यांनी गुरुवार, 23/02/2017 09:29 या दिवशी प्रकाशित केले.
१७ जून १९९९ एजबॅस्टन, बर्मिंगहॅम वॉरीकशायर काऊंटीचं माहेरघर असलेल्या एजबॅस्टनच्या मैदानात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रीका यांच्यात वर्ल्डकपची दुसरी सेमीफायनल रंगणार होती. या मॅचमधील विजेत्या संघाची लॉर्ड्सवर फायनलमध्ये गाठ पडणार होती ती पाकिस्तानशी. ओल्ड ट्रॅफर्डच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडचा आरामात पराभव करुन पाकिस्तान फायनलमध्ये धडकले होते.

शतशब्दकथा स्पर्धा-२०१७ बांडगुळ

लेखक खेडूत यांनी गुरुवार, 23/02/2017 06:59 या दिवशी प्रकाशित केले.
aaaaaa रणखांबे मास्तर लईच दार्शनिक. परीक्षेत दुसऱ्याचं बगून ल्हिवायचो तर म्हनायचा '' तू लेका बांडगूळच रहाणार आयुष्यभर '' लई राग याचा तवा . धाव्वी काय लाभली नाय - आलो पुन्यात . वळखीतनं युवराजदादाला भेटलो , पुढारी माणूस, कामबी मिळालं . यका खबदाडीत झेरॉक्स मशीन टाकून दिली. आकडा टाकून कनेक्शनबी दिलं. फिप्टी - फिप्टीला आपल्या बाचं काय जातंय ? दिपवाळी झाली.

शतशब्दकथा स्पर्धा-२०१७ कांचनमृग

लेखक संजय क्षीरसागर यांनी गुरुवार, 23/02/2017 06:56 या दिवशी प्रकाशित केले.
aaaaaa ‘हे घ्या शेट दहा लाख. तुमच्या सहा लाखाचा व्याज धरुन हिशेब.’ ‘कुणाला च्युतिया बनवतो बे कचरा देऊन?’ ‘रोखीचा व्यावहार रोखीतच चुकता होणार ना शेट? मी तर इमानदारीनं कमावलेत. तुम्ही नाही घेतले तर मी उठलो ना जिंदगीतून. आता पुन्हा नाही कमवू शकत शेट. ’ सदानंद काकुळतीला आला. समोर आलेल्या लक्ष्मीवर पाणी सोडायचं शेटच्या जीवावर आलं. सगळं जगच जणू अनंत काळ थांबलं. मग शेट म्हणाला ’ सदा एक काम कर.

शतशब्दकथा स्पर्धा-२०१७ एकजीव

लेखक नीलमोहर यांनी गुरुवार, 23/02/2017 06:52 या दिवशी प्रकाशित केले.
aa मावळतीची किरणे चहूकडे सोनं उधळीत होती, ते सोनेरी लेणं लेऊन लाटाही चमचमत होत्या, फेसाळत्या लाटांच्या गाजेने आसमंतास एक गूढगंभीर साज चढवला होता. तिला समुद्र आवडतो, मनापासून.. त्याला माहित होतं, म्हणून तो तिला इथे घेऊन आला होता, जिथे होते फक्त ते दोघे, समुद्र, आणि साक्षीला सांजवेळ.. तिच्याकडे बघून मंद स्मित करत त्याने तिचा हात हाती घेतला," खुश ना?" तिचा चेहरा उतरला," किती कमनशिबी आहे मी, समोर अथांग समुद्र..

शतशब्दकथा स्पर्धा-२०१७ हा खेळ कागदांचा

लेखक समाधान राऊत यांनी गुरुवार, 23/02/2017 06:49 या दिवशी प्रकाशित केले.
aaaaaa "लय दिस झालं काय नवीन नाय केलं ,काय तर करावं म्हणतो..काय करू, काय करू " "ट्रींग ट्रींग "कोई है बाहर" "जी हुजूर" "काय तर करावं म्हणतो" "बोला की" "अशानी असं होईल काय" "लय आवघड हाय बाबा, " "काय आवघड बिवघड काय नाय, नुस्ती झैरात केली होती तर निवडुन आले होतो डायरेक, काय पण का " "नाय जमनार साहेब,कागुद सुद्धा नाय तेवढा" "अय तु व्हय बाजुला, दुसरा है माझ्याकडं" "चलतय का" "पळतय की" "बर मग मी वारीला जातोय,येईपोत बघा झालं तर" "व्हय जी" "हॅ

शतशब्दकथा स्पर्धा-२०१७ नवा दृष्टीकोन

लेखक रुपी यांनी गुरुवार, 23/02/2017 06:46 या दिवशी प्रकाशित केले.
a खांद्यावर पर्स, हातात छत्री, डबा, गळ्यात मंगळसूत्र आणि ओढणी सांभाळत स्टॉपपासून पन्नास मीटर लांब जाऊन थांबलेल्या बसमध्ये चिखलातून वाट काढत गर्दीतून स्वतःला आत घुसवलं. खिडकी नीट बंद होत नसल्यामुळे काल पावसाचं पाणी आत आलं होतं, त्यामुळे आज आयलकडच्या सीटवर जागा मिळाली, बरंच वाटलं. 'मॅनेजरला काय उशीरापर्यंत मीटींग ठेवायला? चापेल घरी जाऊन आयतं.' कॉलेजकन्यकांचा घोळका खिदळत बसमध्ये शिरला.