Skip to main content

संयमित आहारातून शरीरशुद्धी/वजन घटवण्याचा यशस्वी प्रयोग - भाग १ (पहिले १२ दिवस)

लेखक चित्रगुप्त यांनी रविवार, 08/09/2024 08:08 या दिवशी प्रकाशित केले.
दि. २७ ऑगस्टला सुरुवात करून गेल्या १२ दिवसात मुख्यतः भाज्या आणि फळांद्वारे शरीरशुद्धीचा प्रयोग करून माझे बिघडलेले स्वास्थ्य मी परत कसे मिळवत आहे याबद्दल हा लेख आहे. महर्षी पतंजली यांनी सांगितले आहे : योगश्चित्तवृत्तिनिरोध: ('योग' म्हणजे (मोकाट सुटलेल्या) चित्तवृत्तीवर ताबा मिळवणे). अभ्यासवैराग्याभ्यांतन्निरोध: ( हा ताबा मिळवण्याचा उपाय म्हणजे वैराग्य, अर्थात 'अयोग्य' (अनिष्ट, हानिकारक) गोष्टींचा त्याग आणि त्याबरोबरच 'योग्य' गोष्टींचा अभ्यास (सराव, सवय) आपले आरोग्य आणि आहार, या विषयीसुद्धा हे लागू होत असते.

श्री गणेश लेखमाला २०२४ - ॥ श्रीगणेश स्तवन ॥

लेखक मी-दिपाली यांनी शनिवार, 07/09/2024 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
॥ श्रीगणेश स्तवन ॥ जय गिरिजात्मज हे गणनायक तू सकळांत कलाधिपती वरदविनायक विघ्नविनाशक तू प्रतिपाळक या जगती ॥ध्रु.॥ तिलकविलेपित चंदनगंधित चंद्रविराजित भाळ तुझे मुदित चतुर्भुज रूप मनोहर तेज मुखावर दिव्य सजे सुमुख तुझे स्मरता अवघे खल,

श्रीकांत बोल्ला: दृष्टीहिन व्यक्तीचा डोळे उघडणारा प्रवास

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 05/09/2024 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
✪ “मै कोई बेचारा नही हूँ, हमें बेचारगी नही, बराबरी चाहिए" ✪ २% लोकांकडे दृष्टी नाही, पण ९८% लोकांकडे व्हिजन नाही ✪ जन्मल्यावर अंध बाळ म्हणून वडिलांनी जमिनीत पुरायचं ठरवलं ✪ वैज्ञानिक डॉ. एपीजे अब्दूल कलामांसोबत भेट आणि त्यांची मदत ✪ क्षमतेला साकार करण्याची‌ वाट दाखवणारी शिक्षिका ✪ सिस्टीमसोबत संघर्ष करून बारावीनंतर विज्ञान घेतलेला पहिला भारतीय दृष्टीहिन विद्यार्थी ✪ अमेरिकेमध्ये उच्च शिक्षण आणि भारतामध्ये ८०% दिव्यांगांना रोजगार देणारा उद्योगपती ✪ प्रतिष्ठेचा पुरस्कार "स्पेशल कॅटेगरीतून नको" म्हणून नाकारण्याची हिंमत ✪ Know us not for our disability, but for our abilities! नमस्कार.

प्रवास

लेखक प्रसाद गोडबोले यांनी मंगळवार, 03/09/2024 22:54 या दिवशी प्रकाशित केले.
प्रवास कुठे पायवाटा, कुठे मार्ग मोठा प्रवासाकडे लक्ष होते कुठे अशी झिंग होती "तिथे" पोहचण्याची कशाला फुका वेळ दवडा कुठे आता पोहचल्यावर असे वाटते की कुठे चाललो अन् पोहचलो कुठे ? कुठे मार्ग हा स्पष्ट दृष्टीसी आला ? अन् कुठे रांगता चालू झालो कुठे ? इथे नित्य होतो अनादी अनंतीं इथे जन्मलो, वाढलोही इथे इथे जागलो तुझिया कृपेने इथे बध्द अन् मुक्त झालो इथे निघालो जिथुनि तिथेची पोहचलो जिथे चालली वाट ती ही तिथे आताशा गवसला प्रवासा मला तू आता जायचे ना , यायचे ही कुठे. Welcome Home ! _________________________________
काव्यरस

द हिडन लाईफ ऑफ ट्रीज् (ऐसी अक्षरे-२०)

लेखक Bhakti यांनी शुक्रवार, 30/08/2024 15:33 या दिवशी प्रकाशित केले.
*द हिडन लाईफ ऑफ ट्रीज्-पुस्तकपरिचय अ जंगलातील परिसंस्था निरंतर चालते, किंबहुना वाढीसच लागते. कारण प्रत्येक प्रजातीची जिवंत राहण्याची धडपड असते. ते आपल्याला लागेल ते दुसऱ्यांकडून घेत राहतात, प्रत्येक जण तसा निर्दयी असतो, पण ही व्यवस्था कोलमडत नाही.

त्रांगडे

लेखक चौकस२१२ यांनी शुक्रवार, 30/08/2024 05:34 या दिवशी प्रकाशित केले.
त्रांगडे थांबा ,थांबा /////मी माविआ बद्दल बोलत नाहोये पण विषय तसा राजकीय आहे इमर्जन्सी नामक चित्रपटाची झलक प्रसिद्ध झाली आहे आणि त्यावरून प्रतिक्रिया येत आहे ३ ठिकाननहून १) भाजप विरोधी याला "इंदिरा गांधींना राष्टवादी आणि म्हणून "प्रोजेकट " करणारा अप्रत्यक्ष भाजप च्या राष्ट्रवादा बद्दल प्रोपोगांडा करणारा चित्रपट म्हणून नाराज किंवा केवळ कंगना रानौत त्यात आहे तेम्हणून विरोध , पण मग गोची अशी कि आपल्याच या दिवंगत नेत्यावर चित्रपट काढला जातोय तर आनंद कसा दाखवय्यांचा ? नाही दाखवलं तर पंचाईत , दाखवलं तर भाजप प्रोपोगांडा ला साथ ..

देव माझा निळा निळा

लेखक Bhakti यांनी सोमवार, 26/08/2024 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
अ कृष्ण निळा निळा बासुरीचा लावितो लळा.. जन्माष्टमीच्या शुभेच्छा!! कृष्ण(विष्णू )का तो निळा आहे?