Skip to main content

मराठी भाषा दिन २०१७: वोवळां सर (पद्ये ब्राह्मणांची बोली)

लेखक पिशी अबोली यांनी मंगळवार, 21/02/2017 06:27 या दिवशी प्रकाशित केले.
1 ************************* १. माड्यां-सुपार्‍यांनी खेळटे धन, माडये तेकल्ल्या ज्या खांदये हालोवन पडटात वोवळां, त्या एका खांदयेर माझें भुरगेंपण २. वोवळीण मारली, तेधवां थोडी मुळां मज देवन् गेली, थोडी, थोडी करून मनांत पातळत र्‍हायली ३. वाटेर थांबून तुवेन् वोवळां विकती घेतली, तेधवां मनातलीं वोवळीण परतून राशींनी फुलली ४. तूं गेला, वोवळां गेली, वास सोपलां नाय, रासय नाय सोपली, तुज राशींनी फुलतना, मीच वोवळीण जाली *************************** 1 अर्थः वोवळ- बकुळ माडी- सुपारीचे झाड खांदी- फांदी वोवळीण-बकुळीचे झाड मारणे- झाड तोडणे पातळणे- पसरणे परतून-परत 1

वाचने 25337
प्रतिक्रिया 33

प्रतिक्रिया

भटी भाशेंत काव्य! ! क्लास आहे. मी वॊट्सेपार धाडटे गो सगळ्यांस. कोठेंच वाचली नव्हती भटी भाशेंतली कविता.

मला मुळात पद्ये ब्राह्मण कोण तेच ठाऊक नाही, तर भाषा माहिती असायचा संबंधच नाही. हे थोर आहे, नवीन भाषा कळली एक. तुमचे असंख्य आभार.

शब्दांका सुरेख गुंफलस गो... वळेसर सुरेख असा हयो... बरोबर आहे का?

हायकू-एस्क रचना आवडली.

मस्त गं पिशे. लडीवाळ भाषा आहे अगदी. माऊलींचेच शब्द जणू. . आता दोन प्रश्न. १) हे पद्ये ब्राह्मण कुठे असतात? स्थानाप्रमाणे की उपजात्/शाखा वगैरे? २) तू आहेस काय? ;)

In reply to by अभ्या..

१. मागच्या वर्षी लिहिलेले उत्तर चोप्य-पस्ते करते.
पद्ये बोली ऐकण्यासाठी गोव्यात यावं लागेल. केरी, रिवण, काणकोण, डिचोली अशा अनेक भागांमधे ही बोली बोलतात. या वेगवेगळ्या भागांतील बोलीमधेही फरक आहे. काही ठिकाणी कोंकणीचा प्रभाव फार दिसून येतो. कऱ्हाडे ही एक ब्राह्मणांची पोटजात आहे. असे म्हणतात की यांना शिलाहारांनी ब्राह्मणाचा दर्जा दिला. सह्याद्रीखंडात कऱ्हाड़यांबद्दल उल्लेख आहे(तो फारसा स्तुतिपर नाहीये, पण उल्लेख आहे एवढंच ;)) कऱ्हाडे आणि पद्ये यांच्या संबंधांबद्दल दोन मते वाचली आहेत. एक, शिलाहारांनी ब्राह्मण म्हणून दर्जा दिल्यावर जे कऱ्हाडे गोव्यात येऊन स्थायिक झाले, ते पद्ये. दुसरा, सगळे कऱ्हाडे गोव्याचे, जे इथे राहिले ते पद्ये आणि बाहेर पडले ते कऱ्हाडे. पद्ये लोक गोव्यातील बऱ्याच देवस्थानांमधे पुजारी आहेत. बागायती व्यवसायामधेही आहेत. त्यांची एकूण सामाजिक स्थिती चांगली आहे. शिक्षणही आहे.
२. नाही. ;) पण मला ही बर्‍यापैकी बोलता येते.

पुन्हा एकदा वाचतो. पण छान. -दिलीप बिरुटे

खूप आवडलं

धन्यवाद लोकहो. ही बोली काही माझ्या नेहमीच्या वापरातली नाही. त्यामुळे कवितेसारखं काही लिहिताना थोडं दडपण होतं. पण लिहून झाल्यावर माझं मलाच छान वाटलं. :)

चौथी रचना फारच आवडली (खाली अर्थ दिले नसते तर काही अर्थ लागला नसता :D )

रचना छान. नवीन बोली वाचायला मिळाली. लिहीत जा अधून मधून या बोलीत म्हणजे आम्हालाही वाचण्याचा सराव होईल. विनंती समजा हवं तर