पिझ्झा.. बेस, सॉस.. सगळं काही शुन्यापासून
अमेरिका म्हणलं की बाकी बर्याच गोष्टींबरोबर डोळ्यासमोर येतो तो पिझ्झा. इकडे आल्यावर तो दिवस उजाडलाच कि ज्या दिवशी थोडा उत्साह पण होता, हाताशी वेळ पण होता आणि डोक्यात पिझ्झा करावा तोही कणिक मळून बेस करण्यापासून असा विचार पण घोळत होता. झालं, ठरलं आणि मी पिझ्झा कृती शोधायला सुरुवात केली. पिझ्झा करताना तो गव्हाच्या पिठाचा करावा असा कधीचाच विचार केला होता. त्या दृष्टीने बघायला सुरुवात केली. पण मग शंकेखोर मनाने उचल खाल्ली आणि वाटलं पूर्ण प्रयोग फसला तर. नकोच ते. त्यापेक्षा थोडा तरी मैदा वापरू. पण तशी पाकृ कुठे सापडेना. मग मैद्याच्या आणि पूर्ण गव्हाच्या पिझ्झा कृतीचा अभ्यास करून माझ मीच थोडं प्रमाण बदललं आणि पिझ्झा बनवला. तर असा तो पिझ्झा ज्याची साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी खाली दिली आहे.
ये कश्मीर है - दिवस सातवा - १५ मे
मी आधी म्हटल्याप्रमाणे पेहेलगाममधे पहायची ठिकाणे तशी तीनच - बेताब व्हॅली, अबू व्हॅली नि चंदनवारी. आणि ही ठिकाणे पाहण्यासाठी स्थानिक गाडीच करावी लागते. तेव्हा आम्ही आमच्या गाडीने पेहेलगाम टॅक्सी स्टॅंडवर आलो. स्थानिक स्थलदर्शनासाठी मारूती इकोपासून सुमो, स्कॉर्पिओ ते इनोव्हा अशा अनेक गाड्या उपलब्ध होत्या. आम्ही मारूती इको गाडी ठरवली. एक पोरगेलासा तरूण आमचा चालक होता. “प्रत्येक ठिकाण पाहण्यासाठी तुम्हाला फक्त अर्धा तास मिळेल” आम्ही गाडीत बसताच त्याने तुटकपणे सांगितले. आम्ही त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला, पण का कोण जाणे, तो त्या गोष्टीसाठी फारसा उत्सुक दिसला नाही.
मोरनी बागा मा बोले आधी रात मा - कथा ( काल्पनीक ) ---- भाग १
मोरनी बागा मा बोले आधी रात मा - कथा ( काल्पनीक ) ---- भाग १
"बाबा , आज शाळेच्या गॅदरींगमधे माझा पहिलाच सोलो परफॉर्मन्स आहे . "
"गुड लक बेटा , छान परफॉर्म कर . "
"मला खुप टेन्शन आलं आहे बाबा . माझा डान्स चांगला होईल ना ? "
"डोन्ट वरी बेटा . तुझ्यावर रानीमांचा आशीर्वाद आहे . तुझा डान्स चांगलाच होईल ."
रेल्वेच्या वाढलेल्या खडखडाटाने अचानक मयुराला जाग आली आणी तिचे स्वप्न मधेच तुटले . बहुतेक रेल्वे रुळांवरुन सांधे बदलत होती . तिने खिडकीतुन बाहेर पाहिले . बाहेर थोडे थोडे उजाडु लागले होते . तिचे उतरायचे ठिकाण थोड्याच वेळात येणार होते .
आनंदवन
मी नाही जाणत उगम तुझ्या दु:खाचा
तू पापी अथवा क्षण जगसी शरमेचा
प्रारब्ध तुझे वा आणी येथे तुजला
करुणेचा पाझर नाही चौकस इथला
नि:शंक निकट ये, हाती दे तव हात
या दु:खार्ता॑च्या देशी हाच प्रघात
परवलिची इथली एकच अनवट खूण
जरि जखम तुला, तरी माझे हृदय विदीर्ण
जरि भग्न तुझे कर, घडवू शिल्प अभंग
जरि कभिन्न वास्तव, बदलू त्याचा रंग
या निबिड अरण्यी, चल रचण्यास तराणे
आनंदवनाचे हेच ब्रीद, अन गाणे
आनंदवनाचे हेच ब्रीद, अन गाणे
काव्यरस
चहा
एम आय डी सी ला असताना भवरलाल नावाचा एक राजस्थानी मारवाडी दोस्त होता..
भवरला्ल चे स्टील विक्रीचे दुकान होते मी व बरेच लोक्स त्याच्या कडूनं स्टील विकत घेत असु..
वास्तविक भवरलाल ला स्टील मधले शष्प कळत नव्हते..
साधारण राजस्थानी लोक्स किराणा माल..कपडे आदीची दुकानदारी करतात..
पण भवरशेट नी हि लाइन निवडली होती..
इंडस्ट्रियल स्टील ट्रेडिंग हे ट्कनिकल काम आहे म्हणजे थोडीतरी माहिती हवी..
स्टील मध्ये अनेक प्रकार आहेत..फ्याब्रिकेशन ला लागणारे च्यानल सळया पट्ट्या..तर ऍलोय स्टील मध्ये अनेक प्रकार आहेत जसे OHNS..En24-En32 spring steel आदी..
पण भवरलालाशेटने आमच्या सारख्या मित्रांच्या मदतीने व मागणी प्रमाणे स्ट
पहिला पाऊस
सूर्य मावळून गेला आहे.. पाखरे घरट्याकडे परतत आहेत.. आजूबाजूचा भवताल दिवसभरात जणू भाजून निघाला आहे.. त्याचा खरपूस वास घेऊन वारा वाहतो आहे.. मी गच्चीवर उभा.. आजूबाजूला यंत्रयुगाची साक्ष देत उभ्या ठाकलेल्या कंपन्यांच्या चिमण्या.. झाडांचा, पर्यावरणाचा गळा घोटून उभं राहत असलेलं लोखंडी जंगल.. जून केव्हाचा सुरु झालाय.. कधी येणार पाऊस?
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
...सुट्टीचा महिना सरत आला आहे.. लपाछपी च्या सगळ्या जुन्या जागा अन् या उन्हाळ्यात शोधून काढलेल्या नव्या जागा पालथ्या घालून झाल्या आहेत..
कलोनियल गोवा
नुकतेच एका कौटुंबिक समारंभाकरीता कारवार येथे जायचे होते . समारंभ सकाळचा. म्हणजे, अगदी पहिले विमान पकडून गोव्यात गेलो असतो तरीही कारवारला पोहोचेपर्यंत प्रचंड दगदग आणि धावपळ होणारच होती. म्हणून मडगावला मुक्काम करून दुसर्या दिवशी कारवार गाठावे असा बेत केला. हाताशी तसा वेळ फार नव्हता आणि यंदा समुद्रकिनार्यावर जायचे नाही असे ठरवेलेलेच होते. तेव्हा मडगावच्या जवळपासच थोडे फिरावे असा विचार केला.
मडगावजवळच चांदोर नावाचे एक टुमदार गाव आहे. तेथे ३-४ शतके जुनी अशी बरीच पोर्तुगिझकालीन घरे आहेत. तेव्हा भटकंती तिथेच करावी असे ठरवले.
पहिले घर पाहिले, ते होते मेनेझिस ब्रागान्झा हाऊस.
मी अभंगाची तुक्याच्या एक पंक्ती जाहलो!
मी न दोहा जाहलो वा मी न ओवी जाहलो
मी अभंगाची तुक्याच्या एक पंक्ती जाहलो!
मी जरी आलो न पायी दर्शनालाही तुझ्या
मीच विठ्ठल,मीच रखुमा,मीच वारी जाहलो!
काव्यरस
मिसळपाव