Skip to main content

BANFF माऊंटन फिल्म फेस्टिवल (११ जुन २०१७ - पुणे)

लेखक मोदक यांनी सोमवार, 12/06/2017 01:14 या दिवशी प्रकाशित केले.
. नमस्कार मंडळी.. "BANFF माऊंटन फिल्म फेस्टिवल" बघण्याचा रविवारी योग आला. अचाट साहस आणि चिकाटीने पूर्ण केलेल्या १० वेगवेगळ्या प्रकारच्या मोहिमांवरील शॉर्ट फिल्म्स दाखवल्या गेल्या. आणखी फारसे वर्णन न करता सरळ फिल्म आणि त्यासंबंधी माहिती देतो. तसेच, या धाग्यामध्ये खूप व्हिडीओ द्यावे लागणार आहेत - धागा लोड होण्यास वेळ लागू शकतो.

एक बाजू अशीही!

लेखक ज्योति अळवणी यांनी रविवार, 11/06/2017 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी मला whatsapp वर एक लिंक आली होती. विषय होता'A LEGAL RAPIST'. एका विवाहित स्त्रीच्या मनातले विचार मांडले आहेत या लिंकमध्ये.  नवरा कामावर असतो आणि ती घरी. तो घरासाठी कमावतो आहे आणि ती घर सांभाळते आहे. 'तो कमावतो आणि मी घराचे खर्च संभाळते', 'मी नोकरी करत नाही; पण आम्ही दोघेही कंपनीच चालवतो. तो बाहेर काम करून आणि मी घरी काम करून.' अशा काही वाक्यांमधून तिच्या मनात असलेल तिच स्वतंत्र आस्तित्व कुठेतरी जाणवत. याचा अर्थ ती एक सुशिक्षित स्त्री आहे. खोल कुठेतरी तिच्या मनात तिने जपलेल स्वत्रांत्य जाणवत. पण या विडीओ मध्ये पुढे तिनेच  एक घटना सांगितली आहे.

नामकरण.. (एक प्रेमकथा - भाग १ )

लेखक दिपक लोखंडे यांनी रविवार, 11/06/2017 21:50 या दिवशी प्रकाशित केले.
गुरुवार १२ डिसेंबर, सकाळी ९:३० वा.. ..................................................... अहो ऐकलत का?.. तुम्ही लवकर अटपुन घ्या, आपल्याला डॉक्टरकडे जायचे आहे... कशाला गं? तब्बेत बरी आहे ना?.. अरे देवा!... या माणसाच्या लक्षात एक गोष्ट राहात नाही.. विसरला का तुम्ही? आज डॉक्टरनी बोलावलय चेकअप साठी.. अरे हो आलं लक्षात.. चल तु तयार हो लवकर मी गाडी बाहेर काढतो.. .......................................................... - २० मिनिटानंतर... (गाडीमध्ये सागर व त्याची बायको..) सागर.. तुम्हाला काही विचारु का? काय गं, यात परवानगी कसली घ्यायची..

कुरकुरीत्/क्रिस्पी भेंडी:

लेखक सविता००१ यांनी रविवार, 11/06/2017 18:25 या दिवशी प्रकाशित केले.
वाढणी: ३ व्यक्तींसाठी साहित्य: अर्धा किलो कोवळी भेंडी, १ टीस्पून तिखट, १ टी स्पून गरम मसाला, १/२ टीस्पून आमचूर पावडर, १/२ टीस्पून धने - जिरे पावडर, १/२ टीस्पून चाट मसाला, १/२ ते पाउण वाटी बेसन, चवीनुसार मीठ, शॅलो फ्राय करण्यासाठी तेल. कृती: पहिल्यांदा भेंडी धुवून टॉवेल वर कोरडी करून घ्यावी. नंतर दोन्ही बाजूंची टोके कापून प्रत्येक भेंडीला एक एक उभी चीर द्यावी. जर भेंडी खूप मोठी असेल तरच तिचे दोन-तीन तुकडे करावेत. नाहीतर अख्खीच ठेवा. एका ताटात हे सारे तुकडे ठेवून द्या.

उतारवय ही संकल्पना हळुहळू बाद होतेय

लेखक अजय भागवत यांनी रविवार, 11/06/2017 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
हया शतक़ातील सर्वात मोठी क्रांति जर कोणती असेल तर ती, “वयोमानातील वाढ” ही मानावी लागेल. आपण आपल्या आजी-आजोबांच्या काळातील नागरिकांपेक्षा २५-३० वर्षे अधिक जगत आहोत. ही वाढीव वर्षे खूप मोठा कालावधी आहे - अगदी एक आख्खे दुसरे आयुष्य वाढल्यासारखेच आहे. परंतू, आपण अजुनही आयुष्याकडे पूर्वीच्याच नजरेने पाहतोय का? म्हणजे असं की, आयुष्य म्हणजे, जन्म, मग तारुण्यातील आपल्या जीवनाची चढती कमान आणि मग पन्नाशीनंतर शारीरिक-मानसिक उतार...

मीच का ?

लेखक अरूण गंगाधर कोर्डे यांनी रविवार, 11/06/2017 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
मीच का ओझे वाहावे ? संस्कृतीचे सभ्यतेचे पांढऱ्या कॉलरीत माझ्या मीच का गोड बोलावे ? मीच का पूजा करावी ? मीच का वारी करावी ? मीच का त्यांच्या चुकांना पदरात घ्यावे पुन्हा पुन्हा मीच का साफ करावा माझाच चष्मा हरघडी त्यांनी चालावे रुबाबात काळा चष्मा वापरोनी मीच चोरटेपणाने का पाहावे स्त्रीकडे ते भोगुनीयाही तिला लेऊनी घेती हारतुरे मीच बांधलेला समाजी मीच बाधलेला भिडेने मीच छाती आत घेउनी का चालावे घाबरोनी ? अशाच या कोंदट जगातील सहावा लागे कोंडमारा प्रकाशाला अन सूर्याला जो ढगाआडून पाही.
काव्यरस

वॉशिंग्टन डीसी मेट्रो एरिया सहल - भाग २

लेखक जुइ यांनी रविवार, 11/06/2017 00:04 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १, भाग ३, भाग ४ सकाळी लवकर उठून डीसी भटकंतीला सुरुवात केली. डीसीतील मंद गतीने चालणार्‍या ट्रॅफिक मध्ये गाड्यांवरील नंबर प्लेटकडे लक्ष गेले. दिसायला अतिशय साध्या असलेल्या या नंबर प्लेटवर लिहिलेल्या एका घोषवाक्याने चांगलेच लक्ष वेधले. त्यावर लिहिले होते "TAXATION WITHOUT REPRESENTATION". या घोष वाक्या मागील इतिहासा विषयी थोडे खोदकाम करायचे ठरवले. याचे मूळ घोषवाक्य आहे "No taxation without representation".

मुलांचे लैंगिक शिक्षण आणि पालकांचेही...

लेखक आदित्य कोरडे यांनी शनिवार, 10/06/2017 23:39 या दिवशी प्रकाशित केले.
(मुळात मुलांचे लैंगिक शिक्षण कसे करावे?, त्याना हे शिक्षण कसे द्यावे? हे सांगण्याकरता हा लेख लिहिलेला नाही. ह्या एरवी अत्यंत महत्वाच्या विषयासंबंधी सर्वसामान्य पालकांचा आणि सरकारचाही दृष्टीकोन काय आहे आणि तो कसा असायला हवा?, का असायला हवा? हे सांगायचा हा प्रयत्न आहे. खरे पाहू जाता लैंगिक शिक्षण आणि लैंगिकता शिक्षण ह्यात थोडा फरक आहे पण मुळात जेथे लैंगिक शिक्षण ह्या विषयी जबाबदारीने काही लिहिणे बोलणे कमी, त्यात ह्या दोनही गोष्टीतल्या फरकावर विस्तृत बोलणे म्हणजे विषयान्तराला आमंत्रण देणे ...मागे एकदा मी ‘ शिक्षण : धोरण उद्दिष्ट आणि गफलती’ हि चार भागांची लेखमाला लिहिली होती.

चिरंजीव रॉक्स

लेखक इनिगोय यांनी शनिवार, 10/06/2017 22:59 या दिवशी प्रकाशित केले.
संवाद (१) “If you wish to make an apple pie from scratch, you must first invent the universe.” - Carl Sagan ९ – ही मस्त कोट आहे, मला आवडली. ३७ – तुला कळली? ९ – हो. म्हणजे तुम्हाला जर अगदी पहिल्यापासून ऍपल पाय बनवायचा असेल, तर आधी झाड लावावं लागणार. त्याच्यासाठी पृथ्वी बनवावी लागणार. त्यासाठी बिग बँग झाला पाहिजे म्हणजे युनिव्हर्स तयार होईल. ३७ – (!!) कार्ल सगान?? संवाद (२) ९ – हे काय गं, देवाची पूजा नाही केलीस? ३७ – नाही रे बाबा, मला पूजा वगैरे नाही जमत. माझा त्यावर विश्वास नाहीये.

कथुकल्या ११

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी शनिवार, 10/06/2017 22:33 या दिवशी प्रकाशित केले.
१. तुझ्याविना… निखिलने डोळे उघडले अन टेबलावरच्या घड्याळात पाहिलं. आज उठायला तब्बल एक तास उशीर झाला होता. त्याने पटापट आवरलं अन ड्रेस बदलून तयार झाला. कॉलरवरच्या हिरवट डागाकडे पाहून तो जरा नाराज झाला पण एका आर्ट टीचरसाठी हे नेहमीचच होतं. जाताजाता त्याने प्रियाकडे वळून पाहिलं. ती त्याच्याकडे तोंड करून झोपली होती. लांबसडक सोनेरी केसांनी मुखचंद्रमा अर्धवट झाकला होता. डोळे मिटलेला तिचा सुंदर चेहरा शांत, प्रसन्न दिसत होता. “सॉरी डियर.