Skip to main content

फ्यूज

लेखक जव्हेरगंज यांनी सोमवार, 24/07/2017 02:26 या दिवशी प्रकाशित केले.
मरणाची थंडी पडली हुती. म्या श्याल गुंडाळून चौकीवर गेलो. इनस्पेक्टरला म्हणलं मर्डर झालाय लवणावर. मग त्यनं गाडी काढली. फटफटी. दोघंच निघालो लवणावर. लय रात झालती. त्यो म्हणला, फुकणीच्या कुठं झालाय मर्डर? म्या म्हणलो, फुलाच्या खाली. मग त्याला घेऊन खाली गेलो. एक बाई पडली हुती तिथं नागडी. म्या ब्याटरी मारून त्यला दाखवलं. बघ म्हणलं. त्यो म्हणला, रेप झाला का हिच्यावर? म्हणलं, कुणाला म्हाईत. त्यो म्हणला, तुला कसं कळलं? म्या म्हणलं, लिंबं आणायला गेलतो. ही दिसली फुलाखाली जाताना. बघितलं तर ह्ये आसं. मग त्यानं ब्याटरी मारून नीट तिला बघितली. टकुरं फुटलं हुतं. नुसतं रगात.

लेडी-ओरियेंटेड चित्रपट

लेखक पिशी अबोली यांनी रविवार, 23/07/2017 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
सेन्सॉर बोर्ड जेव्हा एखाद्या चित्रपटाची जातीने जबाबदारी घेऊन प्रसिद्धी करतं, तेव्हा एरवी कुठेतरी फेस्टिवल्समध्ये वगैरे अडकून पडू शकला असता असा चित्रपटही जवळच्या थियेटरला लागला का, हे आवर्जून बघितलं जातं. तसा तो बघितला, आणि ‘फिलिंग फास्ट’ असल्याने लगेच तिकीट घेऊन टाकलं. तरीही चित्रपटगृहात एवढी गर्दी असेल असं वाटलं नव्हतं.. पूर्ण भरलेल्या चित्रपटगृहात ‘ए’ रेटिंगवाला ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ बघण्याचं धाडस केलं, तर आता लिहिण्याचंही करूनच टाकावं म्हणते. एका वाक्यात कथा सांगायची, तर चार स्त्रियांना वेगवेगळ्या प्रकारच्या स्वातंत्र्यातून आलेलं आत्मभान हा या चित्रपटाचा विषय.

ये कश्मीर है - दिवस नववा - १७ मे (अंतिम भाग)

लेखक एक_वात्रट यांनी रविवार, 23/07/2017 20:46 या दिवशी प्रकाशित केले.
आज आमचा काश्मीरमधला शेवटचा दिवस. आमचे परतीचे विमान ११:५५ ला होते, तेव्हा लवकर उठायची काही गरज नव्हती. आम्ही आरामात उठलो. हाउसबोटीतला आमचा शेवटचा चहा घेतला आणि सज्ज्यात बसून सरोवरात येजा करणारे शिकारे न्याहाळत बसलो. श्रीनगरमधले आमचे सगळे मुक्काम हाऊसबोटींमधेच होते. आतमधे असलेल्या सजावटीमधे अधिक-उणे असले तरी आम्ही राहिलेली प्रत्येक हाऊसबोट सुंदरच होती. आमची आजची हाऊसबोट देखील साधी असली तरी कमालीची आकर्षक होती.

या खलनायकांच करायचं काय ?

लेखक परशुराम सोंडगे यांनी रविवार, 23/07/2017 08:00 या दिवशी प्रकाशित केले.
कथा आणि व्यथा या खलनांयकांच करायचं काय ? ♻♻♻♻♻♻♻♻♻ आज सकाळची गोष्ट.रस्त्यानं जात असताना.एका काॅर्नरवर एक स्कूल बस थांबली.तो त्यांचा थांबा असावा.तिथं अनेक मुलं थांबली होती.त्या सोबत काहीच्या आया ही होत्या. पाॅश ड्रेस,शूज,टाय.दप्फतर पाठीवर ....आता सरकारानं किती ही दप्फतराच्या ओझ्याचं टेन्शान घेऊ दया .पालक आणि त्यंचे टिचर..हे मात्र गंभीर होत नाहीत .ते होणार पण नाहीत .दप्फतरा विषय फक्त मुलांशी संबधीत राहिलेला नाही .तो पालकांच्या आणि शाळांच्या प्रिस्टेजचा प्रश्न आहे. असो.त्य सोबत पुन्हा टिपिन बॅग ....त्या बाॅटल.... . .

मनुस्मृति (भाग १)

लेखक शरद यांनी रविवार, 23/07/2017 06:11 या दिवशी प्रकाशित केले.
मनुस्मृति (भाग १) आपण जेव्हा कोणत्याही धर्मकृत्याच्या संकल्पात " श्रुतीस्मृतीपुराणोक्त फलप्राप्यर्थम् " असे म्हणतो तेव्हा आपणाला फारफार तर पुराण माहीत असते, अगदी बरीच नावे माहीत नसली तरी त्यात जुन्या देवादिकांच्या गोष्टी असतात, त्यात भक्तीचा पुरस्कार केला आहे इतके जुजबी ज्ञान नक्की असते. श्रुती-स्मृती ही काय भानगड आहे ? आज थोडी माहिती मिळवू. वेदसंहिता-ब्राह्मणे-आरण्यके-उपनिषदे या सर्व साहित्याला श्रुती म्हणतात. आपल्या, विशेषत: पंडितांच्या, धार्मिक व्यवहारात, हा अतिम शब्द.

वॉशिंग्टन डीसी मेट्रो एरिया सहल - भाग ४

लेखक जुइ यांनी शनिवार, 22/07/2017 20:23 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १, भाग २, भाग ३ आमच्या सहलीच्या तिसऱ्या दिवशी युएस कॅपिटॉल आतून पाहिले. हा अनुभव अतिशय चांगला होता कारण की कॅपिटॉल आतून पाहायलाही खूप रंजक आहे. तसेच तेथील ऐतिहासिक संदर्भासहित केलेली गायडेड टूर खूपच माहितीपूर्ण होती. ते पाहून होईपर्यंत दुपार कधी झाली ते कळले नाही.

दक्षिणायन चित्रपटांचे !

लेखक धर्मराजमुटके यांनी शनिवार, 22/07/2017 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
युट्युबवर शोधतांना उत्तम दर्जाचे मराठी चित्रपट जास्त सापडत नाहित. जे उत्तम आशय असलेले आहेत ते उत्तम दर्जाचे चित्रिकरण असलेले असतीलच असे नाही. बहुसंख्य मराठी, हिंदी चित्रपट एकतर नवीन आले असताना चित्रपटगृहात बघीतलेले असतात किंवा थोड्याच दिवसात युट्युब, टोरंटस वर मिळतात. हॉलीवुड चित्रपट देखील बरेच पाहायला मिळतात. पण ते कधी कोणत्या प्रकारचे धक्के देतील ते सांगता येत नाही म्हणून घरात बघण्याला मर्यादा येतात. या सगळ्या चित्रपटांच्या भाऊगर्दीत दक्षिणेचे चित्रपट पहायला सुरुवात केली आणि मग ते आवडू लागले. विशाखापटटणमला कंपनीच्या कामानिमित्त महिनाभर रहावे लागले होते.

चंद्रकिनार

लेखक चांदणशेला यांनी शनिवार, 22/07/2017 19:13 या दिवशी प्रकाशित केले.
मावळतीच्या चंद्रकिनारी श्रावणाची चिंब पहाट उतरुन आला शुक्र निळी निळी पाऊलवाट सावळ्या तरुंच्या छायेत पसरला धुक्यांचा फुलोरा थरथरणाऱ्या पानांतून सांडला शुभ्र कवडसा लाजरा संथ उभ्या जळांत मधुर ओले चांदणे निशब्द ही लहर गाते मंजुळ गाणे वेलींवरचा धुंद गारवा घेवून पंखांच्या कुशीत एक थेंब जागलेला गंध हिरवा वेचित
काव्यरस

गोवा सफर --मंडळीबरोबर-- आणि ते पण २ व्हीलर वर..

लेखक विशुमित यांनी शनिवार, 22/07/2017 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
लग्नाची सुपारी फुटल्या नंतरच्या तिसऱ्याच दिवसापासून जो आमचा NXG स्प्लेंडरवर प्रवास चालू झाला तो आमची कन्यारत्न पोटात आली आहे समजल्यावरच त्याला ब्रेक लागला. (पोटात असताना ती कन्या आहे का हे तपासले नव्हते बरका मायबाप हो..!! ) आमच्या दोघांच्या जवळपास सगळ्या आवडी निवडी खूप भिन्न आहेत पण एकच आवड आता कॉमन झाली आहे ती म्हणजे २ व्हीलरवर (च) भटकंती करणे. पहिल्या चार वर्षात सिंहगड, लोणावळा, सज्जनगड, कास, ठोसेघर, महाबळेश्वर, प्रतापगड, कोल्हापूर, जोतिबा,पन्हाळा, शिर्डी, तुळजापूर, सांगली, सोलापूर सगळं २ व्हीलर वर फिरलो. ते दिवस आठवले तर वाटतं खूप येडे होतो आम्ही. कसलीच फिकीर नव्हती.

नाच्या बेडुक

लेखक हेमंत ववले यांनी शनिवार, 22/07/2017 13:01 या दिवशी प्रकाशित केले.
नाच्या बेडका विषयी दोन तीन वर्षापुर्वी वाचले होते. परवा आपल्या निसर्गशाळा कॅम्पसाईट परीसरात हा बेडुक प्रत्यक्ष पाहाण्याचा योग आला. यशदिप आणि जेवण आटोपुन पसायदाना विषयी एक ऑडीयो ऐकत झोप येण्याची वाट बघत होते. कॅम्पिगला आलेले लोक देखील कॅम्पफायर भोवती गराडा करुन गप्पा टप्पा मध्ये मग्न होते. आमच्या किचन शेड वर नळीचा पत्रा आहे. अचानकच पावसाची एखादी सर यायची आणि आमच्या डोक्यावर (पत्र्यावर) ताशा वाजवुन जायची. असा हा ताशाचा आवाज थोडा कमी झाला की मग मात्र एक विशिष्ट आवाज दुरवरुन कानावर येत होता. चालबध्द, लयबध्द उच्च स्वरात म्हणजे अगदी खर्जातला वाटावा असा हा आवाज लक्ष वेधुन घेत होता.