चॅलेंज - भाग ५ अन्तिम
चॅलेंज भाग ५ (अंतिम)
एक विचित्र शांतता टेबलवर पसरली होती. इतक्यात नेमका मीराचा फोन वाजला. “हो हो, मी येतेच थोड्या वेळात” म्हणून तिने फोन ठेवला. सगळ्यांच्या चेहर्यावरची प्रश्नचिन्ह पाहून तिने म्हटलं, “रसिक, बुकस्टोअरवाला”
“तो कशाला तुला फोन करतो?” शौनकने तत्काळ प्रश्न केला.
“बुकस्टोअरवाला कशाला फोन करेल! पुस्तकांबद्दलच करेल ना!” दिगंतने परस्पर शौनकला उत्तर दिलं.
“नाहीतर काय! मी पुस्तकं मागवली होती. ती आली आहेत. ते थोड्या वेळाने दुकान बंद करतील. म्हणून लवकर येऊन घेऊन जायला सांगत होता.
चॅलेंज - भाग ४
चॅलेंज भाग ४
“आता तू वाचतेस का, मीरा?” दिगंतने मीराला विचारलं. नेमकं त्याच वेळी कॅफेचं दार कोणीतरी उघडलं आणि वार्याची एक झुळूक आत आली. त्या झुळकेने शौनकच्या डायरीचं पान उडालं, ते नेमकं दिगंतने पाहिलं.
“अरे तू अजून लिहिलयंस, मग हे का नाही वाचलंस?”
“जाऊदे रे, झालंय माझं” शौनकने ते लिहिलेलं पान हाताने झाकून म्हटलं.
“अरे असं कसं, पूर्ण सत्य नको का?” दिगंत पिच्छा सोडणार्यातला नव्हता. मीरा आणि अवनीलासुद्धा आता काय लिहिलं आहे, आणि झाकलं आहे याची उत्सुकता होती. किती विचित्र आहे ना मनुष्य स्वभाव. काही समोर ठेवा, वाचायला सांगा, कोणी ढुंकून बघणार नाही.
अतींद्रिय अनुभव : डॉक्टरांची तडजोड आणि भ्रूणहत्या
डॉक्टर सदाभाऊ मराठवाड्याच्या एका दुर्गम म्हणाव्या अश्या भागांत दाखल झाले आणि काही दिवसांनी मी सुद्धा दाखल झालो. सदाभाऊ हे घोरपडे घरातील द्वितीय मुलगे. प्रचंड श्रीमंती घरी वास करत असली तरी सदाभाऊ ना त्यांची काहीही पर्वा नव्हती. ते आधी डॉक्टरकी शिकायला गेले, तिथे एक मुलीच्या प्रेमात पडले आणि वडिलांच्या विरुद्ध जाऊन घरजावई म्हणून ह्या गावांत दाखल झाले. त्यांनी आपल्या मोठ्या भावाला पत्र लिहून एखादा चांगला कारकून पाठवण्याची विनंती केली होती. घोरपडे घराण्यात मी कामाला होतो पण दुय्यम दर्जाचा दिवाणजी म्हणूनच. मला दुर्गम भागांत इच्छा जरी नसली तरी पूर्णपणे सारा कारभार माझ्याच हातांत राहील म्हणून मी हि नोकरी पत्करली.
रिमझिम पाऊस पडतो ..!!
रिमझिम पाऊस पडतो
सुन्नं सुन्नं मन भिजवतो ..!!
हा वारा निवारा मनाचा
चिंब झाला पिसारा झाडांचा
धुंध ही निशा
आली नशा
भिजली आकाशा
सखी रे तुझी...
रिमझिम पाऊस पडतो ..!!
चालविला धिंगाणा विजांनी
मोकळे केस सोडले मेघांनी
माझिया या सख्या
रात्री अश्या
कवेत(मिठीत) तुझ्या
आवळून घे....
रिमझिम पाऊस पडतो...!!
रिमझिम पाऊस पडतो
सुन्नं सुन्नं मन भिजवतो ..!!
!! भेट शिवतीर्थ रायगड !!
लहानपणी इयत्ता नववीत असताना म्हणजे २३ वर्षापूर्वी शाळेच्या सहली मधून शिवतीर्थ रायगड ला भेट दिली होती. खुप दिवसापासून परत भेट देणे जमलेच नाही.मला भेटलेले रुग्ण - ७
http://www.misalpav.com/node/40563
सकाळची OPD सुरू झाली तोच अमोल चा फोन आला (psychiatrist आहे हा) ... "अरे एक पेशंट पाठवतोय depression ची केस आहे , पण सतत दम लागतोय म्हणे अगदी बसल्या बसल्या पण "....
"बरं , बघून सांगतो " म्हणून मी फोन ठेवला आणि कामाला लागलो.. २ तासांनंतर ती पेशंट आणि तिचा नवरा आले , प्राथमिक तपासणी केली आणि श्वसनक्षमतामापन तपासणी ( spirometry ) साठी पाठवलं .....
रूममेट (स्वानुभवावर आधारित काल्पनिक कथा)
रूममेट भाग १
ICWA ची परीक्षा पास झालो आणी कॅडबरी मध्ये नोकरी लागली. पहिलाच जॉब आणी तो पण कॅडबरी सारख्या मोठ्या कंपनीमध्ये, त्यामुळे खुश होतो. थोडे टेंशन सुद्धा होते. त्यातून कामाचे ठिकाण होते सातारा जिल्ह्यातील, फलटण तालुका. कॅडबरी कंपनीची एक काँट्रॅक्ट मनुफॅक्चरिंग साईट फलटण तालुक्यातील साखरवाडी गावात होती. कॉन्ट्रॅक्ट मनुफॅक्चरर कंपनी होती डॉ. रायटर्स. कॅडबरी ची आम्ही एकूण चार माणसे होतो. सुधीर, रवी, मी आणी योगेश. बाकी सर्व स्टाफ आणि वर्कर्स डॉ. रायटर्स चे होते. योगेश भावसार म्हणजे आमचे साहेब. भावसार साहेब प्रोडक्शन सांभाळायचे.
निर्णय
मान्य आहे ते सत्तेत होते
मान्य आहे त्यांनी स्वप्नं दाखवली
मान्य आहे ते तुमचे 'आदर्श' होते
त्यांच्यातले बरेच जण
खरे असतील
हेतूही स्वच्छ असतील बहुतांशी
आणि काही जण त्यांनीच घेतलेल्या निर्णयाच्या
विरोधातही असतील
पण कदाचित
निर्णायक क्षणी समोर आलेली
त्यांची काही अपरिहार्यता असेल
किंवा त्यांना, तुम्हाला सगळ्यांना
घाईसुद्धा झाली असू शकते...
ईतकी वर्षं लढा दिल्यावर
समोर विजय दिसत असतानाची घाई
सगळं सगळं मान्य आहे
पण तरीही ,
ते मूठभरच होते
तुम्ही तर करोडोंच्या संख्येने होता ना
का नाही सांगितलंत मग
...की आम्हाला नकोय फाळणी
काव्यरस
मिसळपाव