Skip to main content

!माझी छबी!

लेखक sayali यांनी बुधवार, 25/10/2017 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
तिचं आणि माझं नातं काही वेगळंच आहे. एकमेकींचे लाड करतो. उपदेश करतो. आमचे जितके मतभेद असतात तितकाच जिव्हाळाही असतो. आमचे संवाद कधी हळवे तर कधी हसून हसून डोळ्यात पाणी आणणारे, कधी बौध्हिक पातळीवरचे तर कधी स्वयंपाकातील धाडसी प्रयोग यांची प्रेरणा देणारे, कधी उद्बोधक तर कधी आयुष्याला वेगळे वळण देणारे असतात. माझा तिला आणि तिचा मला शारीरिक, बौधहिक, मानसिक बदल लगेच जाणवतो. या मागे कोणती अंतःप्रेरणा असेल ? जन्मजनमांतरिचा एक स्त्री असल्याचा समान धागे तुझ्यातल्या मला माझे दर्शन घडवून देत असते. कशाला बघू मी उगा आरशात !

जरी अज्ञात देशाचा

लेखक अनन्त्_यात्री यांनी बुधवार, 25/10/2017 11:22 या दिवशी प्रकाशित केले.
जरी अज्ञात देशाचा किनारा गाठला होता तरी वारा शिडामधला जरा खंतावला होता दूरवरचे दिवे तिथले झळाळून पेटले होते तरी अंधार हटवादी जरा रेंगाळला होता वितळत्या चंद्रबिंबाने दशदिशा भारल्या होत्या तरी त्या चांदरातीचा कवडसा गोठला होता
काव्यरस

आज पांडव पंचमीच्या निमित्ताने केलेली कविता ...

लेखक वैभवदातार यांनी बुधवार, 25/10/2017 10:57 या दिवशी प्रकाशित केले.
आज पांडव पंचमीच्या निमित्ताने केलेली कविता ... श्रीकृष्णा रे कसा मी सोडू बाण कंठाशी आले मम प्राण || धृ.|| शंख पांचजन्य हा घुमतो आज ह्या रणी त्याचा निनाद घुमतो कानी मम शरीरासी कंप सुटे हा भारी गांडीव धनुष्य न धरी करी चाल माझ्या समोरी आप्तेष्ट हे जमले भीष्म पितामह दुर्योधन सगळे माझ्या विरुद्ध काही बाही वदले कसा वार करू युद्धविन्मुख माझे मन पाहुनिया मम आप्तस्वजन ||१|| द्रोणाचार्यांच्या गृही कौरवांसवे मी खेळलो धनुर्विद्येमध्ये पारंगत झालो द्युत खेळताना राज्य आम्ही हे हरलो वनवासा जाते झालो चाल राज्य न मिळे मागुनिया आता कौरव उभे ठाकले युद्धाकरिता मम चित्तासी न मिळे स्थिरता स्वजन

फास्टर फेणे च्या निमित्ताने

लेखक ओरायन यांनी बुधवार, 25/10/2017 00:52 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपासून टीव्हीवर फाफे च्या प्रमोशनची जहिरात बघत आहे. हे बघतांना मन भुतकाळात जाते. सहावी, सातवीत होतो. तेंव्हा टीव्ही असणारे कुटूंब फार कमी होते. त्यामुळे असेल कदाचित,पण आमचा फावला वेळ मैदानी खेळ व वाचनात जात असे. मला वाचनाची आवड होतीच. त्यात त्यावेळेचे प्रसिद्ध वाचनालय ( अजूनही आहे.) चितळे रस्त्यावरील 'अहमदनगर वाचनालय' येथील बालविभागात आमचा मुक्कामच असायचा. सभासदाला तिथे काही मासिकै,कथा,कादंबर्या चकट फु वाचण्याची मुभा असायची. भा.रा. भागवतांचा बन्या ऊर्फ फास्टर फेणे आमचा हिरोच असायचा. त्याचे नविन कोणते पुस्तक आले आम्ही लागलीच झडप मारून वाचुन फस्त करत असु.

बौंड्रीपार जाताना – डेस्टिनेशन पुणे

लेखक इनिगोय यांनी मंगळवार, 24/10/2017 13:20 या दिवशी प्रकाशित केले.
अचानक पाठ दुखू लागणं, पोट दुखू लागणं, डोकं जड वाटणं.. झालंच तर बॅगमध्ये आपलं सामान मावणारच नाहीये इथपासून ते अलार्म बिघडलाय बहुतेक, जागच कशी येणार असली कैच्याकै कारणं डोक्यात उगवू लागणं.. आणि अधून मधून गाण्यातल्या धृवपदासारखं “जाऊ दे रद्दच करू” हे वाटत राहणं....... एखादा अत्रंगी प्रकार करण्याच्या आदल्या रात्री होणारे हे असे सगळे प्रकार आता माझे मला सवयीचे झाले आहेत.

तुळापुर : संभाजीराजांची समाधी

लेखक आकाश खोत यांनी मंगळवार, 24/10/2017 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्याहुन औरंगाबादला जाताना, लोणीकंदच्या थोडं पुढे एक फलक दिसतो. संभाजी राजांची समाधी हायवेपासून ५ किमी डावीकडे तुळापुर गावात आहे अशी माहिती त्यावर आहे. हा फलक इथुन जाताना खूपदा पाहिला. प्रत्येक वेळी तो दिसला कि त्या ठिकाणी जायचंय हि इच्छा मी गाडीत सोबत असणाऱ्यांना बोलून दाखवायचो. सण अथवा काही कामानिमित्त नेहमी जात असल्यामुळे तिथे थांबता आलं नाही. एका मित्राच्या रविवारच्या लग्नाला जायचं होतं, आणि आम्हाला शनिवारी पण सुटी होती.

रुद्राध्याय एक मनन.

लेखक अरविंद कोल्हटकर यांनी मंगळवार, 24/10/2017 08:19 या दिवशी प्रकाशित केले.
रुद्राध्याय ह्या प्रसिद्ध सूक्ताचे नाव बहुतेकांनी ऐकलेले असते कारण शिवभक्तांचे ते एक नेहमी आवर्तन केले जाणारे सूक्त आहे. मी स्वत: जरी शिवभक्त - किंबहुना कोणत्याच देवाचा भक्त - नसलो तरी ह्या सूक्ताचे स्वच्छ उच्चारांमध्ये आणि आघातांसह केले जाणारे पठन मला ऐकायला फार आवडते. (जालावर अनेक ठिकाणी हे ऐकायला सापडते. त्यासाठी माझे आवडते संस्थळ हे आहे. हे पठन प्रामुख्याने ’नमक’ आणि ’चमक’ अशा दोन भागांमध्ये विभागले आहे. नमकामध्ये ’नम:’ ह्या शब्दाच्या आणि चमकामध्ये ’च मे’ ह्या शब्दांच्या वारंवार आणि लयबद्ध पुनरावृत्तीमुळे ही सुश्राव्यता निर्माण होते.

हॅरी पॉटर - भाग दोन

लेखक nishapari यांनी मंगळवार, 24/10/2017 01:00 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ हॅरी पॉटरच्या जगातले जादुई प्राणी या जगात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जादुई प्राणी / जादुई जीव आहेत . त्यातले कथेच्या दृष्टीने महत्वाचे आणि विविधतेची साधारण कल्पना येईल असे काही पुढीलप्रमाणे - १ . हाऊस एल्फ्स - हाऊस एल्फ हे अतिशय जुन्या व श्रीमंत प्युअर ब्लड जादूगार घराण्यांमध्येच आढळून येतात . हाऊस एल्फची उंची साधारण 3 फूट असते . हाऊस एल्फ हे आपल्या मालकाची आज्ञा पाळण्यास जादूने बद्ध असतात . मालकाची कोणतीही आज्ञा ते मोडू शकत नाहीत .

शिवार

लेखक चांदणशेला यांनी सोमवार, 23/10/2017 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
सावळ्या रानाच्या कुशीतून शिवार मोहरले उभ्या शेतात निळे आभाळपक्षी उतरले राईराईत सूर्यदूतांचा पदर उलगडला झाडाझाडातून कोवळा गंध ठिबकला भिरभिरणाऱ्या ऊन्हाची झुळूक भवताली नाचली बहरलेल्या फांदीवरील पालवी हळूच कुजबुजली तांबड्या पायवाटेने दूर गवतात पाय पसरले वाऱ्याचे रुपेरी सूर पानात रुमझुमले बाभळीच्या हिरवट सावल्या पिकात सांडल्या दाण्यादाण्यात रानपाखरांच्या चोची बुडाल्या रंग पिकल्या झुडुपाचा बांधावरती देह झुकला चहुकडे हिरव्या नक्षत्रांचा मळा फुलला
काव्यरस