Skip to main content

!! बालदीन !!

लेखक नाखु यांनी मंगळवार, 14/11/2017 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
!!बालदीन !! असूया वाटते​ बघुनीया माथी केशसंभार कसा आनंद घेऊ या तरूण मुलांसवे लोपलेल्या केशकुंतलांच्या परागंदा मुळापासून मिळते तुम्हा सुख नित काका अंकल संबोधून किंचित केशकर्तनाचा कृष्ण दिवस आज मस्तक वाळवंटी म्हणती त्यास खालदिन छप्पर असता भाळी,मान वळे तारूण्याची नजर देतसे दाद, नित देव कोंबड्यांची शिलकीच्या तबल्यासम बालतळावर स्कॉलरपणाची सुरेख नक्षी काढू अनुभवांचे मीपण करूनी दिवसाही तारे तोडू उद्याचे आदर्श नागरिक आजच (हि) घडवू -झुल्पांकित (संतप्त खात्री कैवार पसार ) २२ जून २०१७

*बालदिन *

लेखक वैभवदातार यांनी मंगळवार, 14/11/2017 10:42 या दिवशी प्रकाशित केले.
*बालदिन * हासूया खेळूया नाचूया गाऊया आनंद घेऊया मुलांसवे कोवळ्या निरागस मुलांपासून मिळते आम्हा सुख नवे पंडित नेहरूंचा जन्मदिवस आज म्हणती त्यास बालदिन मुले असती फुले देवाची होऊ त्यांच्यात तल्लीन मातीच्या गोळ्यासम बालमनावर संस्कारांची नक्षी काढू सद्विचारांचे शिंपण करूनी उद्याचे आदर्श नागरिक घडवू --शब्दांकित (वैभव दातार ) १४ नोव्हेंबर २०१७

एक अनावृत्त(छी! अश्लिल!) पत्र

लेखक पुंबा यांनी मंगळवार, 14/11/2017 08:05 या दिवशी प्रकाशित केले.
रवि, अरे काय नाव ठेवलंस बाबा सिनेमाचं? न्युड? अरे! केवढं हे अश्लैल्य? 'दिगंबर' वगैरे सात्विक, शुचिर्भूत नाव ठेवलं असतंस तर चाललं असतं(हा आपला लेखकाचा कल्पनाविलास बर्का! दिगंबर नाव ठेवलं असतं तर उभा चिरला असता डायरेक्टरला). छे छे! संस्कृती बुडाली. (च्यामारी!(च्या आणि मारी दोन्हीही पतंजलीचे बर्का!) ह्या संस्कृतीला पोहायला शिकवले पाहिजे. सारखी बुडते. पण पोहायला शिकवायचं म्हणजे स्विमिंग कॉश्च्युम, आणखी अश्लैल्य! छे छे!!) 'न्युड'पणाचं आपल्या संस्कृतीला फार वावडं. कुंभमेळ्यात कधी दिसलाय न्युड साधू? कधीच नाही. आहे कुठला बुवा, महाराज अर्धन्युड? अंह!

गाज

लेखक अबोली२१५ यांनी सोमवार, 13/11/2017 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
श्रीवर्धन तालुक्याच्या कुशीत रममाण छोटे खाणी दिवेआगर.दिवेआगर म्हणजे सृष्टीला पडलेलं स्वप्न... नारळ पोफळीच्या बागांनी नटलेल निसर्गान पुष्कळ दान केलं. जसे श्रीवर्धनला अतिप्राचीन आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेलं आहे त्याचप्रमाणे दिवेआगर हि अतिप्राचीन गावांपैकी एक ठरत असून देवविद्या पारंगत घैसास, देवल, मावलभट आदी ब्राम्हणाची वस्ती होती. समुद्रमार्गानी येणाऱ्या अरब चाच्यांनी या गावाला वेळोवेळी लुटलं. पण, भट आणि बापट या दोघा भावंडानी सिद्धीच्या परवानगीने याचा कायापालट केला.

‘डर’ – एक भयकथा !

लेखक ए ए वाघमारे यांनी सोमवार, 13/11/2017 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
'डर' – एक भयकथा ! असं म्हणतात की झुरळ हा प्राणी फारच प्राचीन आहे. प्रागैतिहासिक का कुठल्याश्या काळापासून तो पृथ्वीवर वास्तव्य करून आहे. मानव तर तसा 'आनी-जानी'च आहे म्हणा. पण झुरळं मात्र माणसांच्या आधीपासून होती आणि माणसांच्या नंतरही राहणार आहेत असं आम्ही कुठेतरी वाचलंय. पण य:कश्चित झुरळाला इतकी सिनिअ‍ॅरिटी देऊन त्याचं 'प्रतिमासंवर्धन' करणं काही आम्हाला पटत नाही. मग या झुरळांपेक्षाही जुनं काय असावं जे आजही आपल्या आजूबाजूला सर्व चराचर व्यापून आहे ? थोडं डोकं खाजवल्यावर लक्षात आलं की- आहे ! अशी एक गोष्ट आहे जी या पृथ्वीवर फडतूस झुरळांपेक्षाही जुनी आहे ती म्हणजे भय, भीती किंवा डर !

प्रतिभेचे देणे

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 13/11/2017 14:54 या दिवशी प्रकाशित केले.
ती ठिणगी होऊन येते अन वणवा होऊन छळते ती लकेर लवचिक होते अन गाण्यातून रुणझुणते ती कधी निखारा होते विझुनी मग होते राख उमलविते त्यातून फूल मग तिचीच फुंकर एक ती उल्केसम कोसळते उखडून दिशांचे कोन धगधगत्या चित्रखुणांची ती लिहिते भाषा नविन जे तरल नि अक्षर ते ते, जे अथांग, अदम्य ते ते, जे दूर असूनही भिडते, जे जटिल तरी जाणवते, ते तिचेच देणे असते…. …..किती घ्यावे? तरीही उरते !
काव्यरस

सांज

लेखक चांदणशेला यांनी सोमवार, 13/11/2017 14:41 या दिवशी प्रकाशित केले.
अंग पेटून सांज जीव चिरते पापण्यांच्या पंखातून हळूच पाणी फिरते सय येता हुंदका कंठात फुटतो गहिवरलेल्या क्षितीजातून उदास रंग गळतो प्राणाच्या ओघळीत व्याकूळ शीळ तडफडते काळोखाच्या काठावरती दिवसाचे बन विझते खोल खोल गात्रात पिरतीचा मोहोर जळतो उरात आसवांचा झरा उचंबळुनी वाहतो
काव्यरस

!! श्रद्धांजली !!

लेखक जागु यांनी सोमवार, 13/11/2017 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
एखादी व्यक्ती जन्माला येते ती अनेक गुणांचे पुंजके घेऊनच. आयुष्याच्या वेगवेगळ्या वाटेवर त्यांचे विविध पैलू विखुरले जात असतात. अशीच एक विविध पैलूंनी आपले आयुष्य जगून गेलेली व्यक्ती म्हणजे माझे वडील कै. शशिकांत गणपत घरत उर्फ अण्णा. अण्णांचा जन्म रायगड जिल्ह्यातील उरण येथील फुंडे गावचा. आई,वडील चार भाऊ आणि पाच बहिणी असा आग्री समाजातील भला मोठा परिवार. अण्णा भावांमध्ये शेंडेफळ. अण्णांचे वडील रेल्वेमध्ये कामाला होते. घरी शेती व मिठागरे होती. अण्णांचे वडील म्हणजे माझे आजोबा शिस्तीने कडक व शिक्षण प्रिय असल्याने सगळ्या मुलांना सक्तीने शाळेत घातलेले.

व्होल्टेज स्टॅबिलायझर ची गरज

लेखक सिरुसेरि यांनी सोमवार, 13/11/2017 10:44 या दिवशी प्रकाशित केले.
पुर्वी टीव्ही / फ्रीज विकत घेताना त्या उपकरणांच्या सुरक्षेसाठी सोबत व्होल्टेज स्टॅबिलायझर सुद्धा विकत घ्यावा लागत असे . हल्लीच्या काळात या उपकरणांसाठी व्होल्टेज स्टॅबिलायझर आवश्यक आहे का ? असल्यास कुठल्या कंपनीचा व्होल्टेज स्टॅबिलायझर चांगला आहे ?