*बालदिन *
हासूया खेळूया नाचूया गाऊया
आनंद घेऊया मुलांसवे
कोवळ्या निरागस मुलांपासून
मिळते आम्हा सुख नवे
पंडित नेहरूंचा जन्मदिवस आज
म्हणती त्यास बालदिन
मुले असती फुले देवाची
होऊ त्यांच्यात तल्लीन
मातीच्या गोळ्यासम बालमनावर
संस्कारांची नक्षी काढू
सद्विचारांचे शिंपण करूनी
उद्याचे आदर्श नागरिक घडवू
--शब्दांकित (वैभव दातार )
१४ नोव्हेंबर २०१७
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2431
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
खूप दिवसांनी तुमची कविता
काढू आणि घडवू हे तितकेसे जुळत
तुम्ही सुचवलेल्या ओळी छान
In reply to काढू आणि घडवू हे तितकेसे जुळत by सतिश गावडे
हहपुवा.
In reply to तुम्ही सुचवलेल्या ओळी छान by हरवलेला
प्रसंगोचीत...नेहमीप्रमाणेच आवडली...पण..
बर्याच दिवसांनी कविता वाचून