Skip to main content

रोज रोज

लेखक सिरुसेरि यांनी शनिवार, 02/12/2017 23:11 या दिवशी प्रकाशित केले.
रोज रोज -- कथा ( काल्पनीक ) "रोज़ रोज़ आँखोंतले एक ही सपना चले रात भर काजल जले .." हे गीत ऐकु आले आणी काहि वेळासाठी तिचे मन भुतकाळात हरवुन गेले . तिला तिचे कॉलेजचे सोनेरी दिवस डोळ्यांसमोर दिसु लागले . कॉलेजमधील मनमोकळे वातावरण , मित्र मैत्रिणींचा नवा जमलेला ग्रुप , रोजच्या रंगलेल्या गप्पा टप्पा , ग्रुपबरोबर त्या दिवसांत केलेली धमाल तिला परत एकदा आठवु लागली . या ग्रुपमधेच तिची त्याच्याशी पहिली ओळख झाली . ती एका साध्या , मध्यमवर्गातील घरातली . तर तो शहरातील एका श्रीमंत बिझनेसमनचा एकुलता एक मुलगा .

(धुतले...)

लेखक टवाळ कार्टा यांनी शनिवार, 02/12/2017 19:21 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णा उंच उधळला इकडून तिकडे, बापाचे (काय) चुकले भंजाळून पडला तोंडावर खाली, भावानेही धुतले दुरूनच पाहुनी पटकन आला, वर्दीने(ही) ठासले पारावरती विसावलो अन तिथेच चुकले खबर होता कर्णोकर्णी, बघ्यांचेही फावले तडफडलो पण थांबले नाही, सगळ्यांनीच धुतले सुजून गेली अंगे सगळी, प्लास्टरही घातले पाटलीणीस चुकून आपले म्हटले, (अख्ख्या) गावाने धुतले...

जिव्हाळघरटी

लेखक समयांत यांनी शनिवार, 02/12/2017 16:04 या दिवशी प्रकाशित केले.
मनाच्या काचेवर कापरासारखे आपले बालपण ठेवले तर ते भुर्र उडून जाते, ते उडूच नये असे वाटते, हसरे मन लेऊन जन्मतो आपण प्रत्येक जण मात्र इथूनच ते हरवून द्यायला.. पण नेहमी रडतोसुद्धा आपण तरी दिवसेंदिवस लागतात आपले हसू विरायला, पहिला दिवस खळाळून जातो हसण्या-रडण्यात, नंतर नंतर तर हसण्याला स्मृतीभ्रंश होतो आणि रडण्याला पेव फुटते. नातं व्हावं कसं..

मी...एक अ(न)र्थतज्ञ !!

लेखक चिनार यांनी शनिवार, 02/12/2017 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
कालपरवा रिझर्व्ह बँकेचा एक लक्षवेधी अहवाल जाहीर झाला. आणि मी सुटकेचा निश्वास सोडला. गेले काही दिवस जरा भविष्याच्या चिंतेतच होतो. या आर्थिक मंदीमध्ये आपली नोकरी टिकेल का? समजा नोकरी गेली तर दुसरी मिळेल का? पगार वगैरे कसा असेल? असे बरेच प्रश्न पडत होते. पण त्यादिवशी आरबीआयच्या वरिष्ठ अर्थतज्ज्ञांनी माझ्यावर उपकारच केले म्हणायचे. आता मला ओळखणाऱ्या लोकांना वाटेल की, माझ्या टीचभर ज्ञानाचा, चिमूटभर कौशल्याचा, वेळकाढू नोकरीचा आणि तुटपुंज्या उत्पन्नाचा रिझर्व्ह बँकेच्या अहवालाशी काय संबंध? मी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची शप्पथ घेऊन सांगतो, त्या अहवालाशी माझा काहीही संबंध नाही.

'टमरेल' प्रवृत्ती संपणार कधी ?

लेखक अँड. हरिदास उंबरकर यांनी शनिवार, 02/12/2017 13:16 या दिवशी प्रकाशित केले.
'टमरेल' प्रवृत्ती संपणार कधी ? जिल्ह्यात सध्या स्वच्छता मोहिमेने चांगलाच जोर धरला आहे. हागणदारीमुक्त आणि शौचालययुक्त समाजाची निर्मिती करण्यासाठी प्रशासन सरसावले असल्याचे दिसत आहे. दररोज सकाळी जिल्हा तथा नगर प्रशासनातर्फे उघड्यावर शौचास जाणाऱ्याला कायद्याचा दंडुका दाखवला जात आहे. दुसरीकडे स्वच्छ भारत अभियानाअंर्तगत खेड्यापाड्यात शौचालय बांधण्याचं काम मोठ्या प्रमाणात सरकार करत आहे. गावातील लोकांमध्ये शौचालय, स्वच्छतेबाबत जनजागृती केली जात आहे. प्रत्येक गाव हे हागणदारी मुक्त व्हावं, लोकांनी स्वच्छेतेकडे आणि चांगल्या आरोग्याकडे विशेष भर द्यावा यासाठी प्रयत्न सुरू आहे.

चुकले...

लेखक अजब यांनी शनिवार, 02/12/2017 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
गंध उधळला इकडुन तिकडे, वाऱ्याचे चुकले निखळुन पडला वरून खाली, ताऱ्याचे चुकले दूर जाउनी परतुन आली, वाटेचे चुकले किनाऱ्यावरी विसावली अन लाटेचे चुकले घाव लागला वर्मी, होते बाणाचे चुकले तडफडला पण गेला नाही, प्राणाचे चुकले बुडून गेली वस्ती सगळी, प्रलयाचे चुकले इतके कुणास अपुले म्हटले, हृदयाचे चुकले...

'लोकपाल'फ़क्त आंदोलनापुरतेचं..?

लेखक अँड. हरिदास उंबरकर यांनी शनिवार, 02/12/2017 09:22 या दिवशी प्रकाशित केले.
'लोकपाल' फक्त आंदोलनापुरतेचं..? सरकार, प्रशासन आणि सार्वजनिक जीवनातील भ्रष्टाचाराचा मुद्दा जसा घासून घासून गुळगुळीत झाला आहे, तसाच भ्र्रष्टाचार संपविण्यासाठी केल्या जाणाऱ्या आंदोलनांचाही चावून चावून चोथा झाला आहे. देशात बोकाळलेला भ्रष्टाचार संपवून लाचखोरी करणाऱ्यावर वचक बसावा यासाठी आजवर अनेक आंदोलने करण्यात आली, विविध कायदे आणि नियम आणल्या गेले. 'भ्रष्टाचार निर्मूलन' हा मुदा जनआंदोलनातून बहुतांश राजकीय पक्षांच्या मॅनिफेस्टो मध्ये आला. भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाने काहींना 'महात्मा' बनविले, तर काहींसाठी सत्तेच्या राजकारणाची दारे उघडी केली.

राजाची नियत

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 02/12/2017 07:52 या दिवशी प्रकाशित केले.
राजाची नियत आटपाट नगर होते. तिथे एक राजा होता. राजा फार दयाळू आणि प्रजेचे हित पाहणारा होता. वेश पालटून आपल्या राज्यात फिरे. लोकांची सुख दुखे समजून घेई. एकदा फिरता फिरता एका गावात पोहचला. तहान लागली होती. दूर एक लहानसे घर दिसले. घरा भोवती ऊसाचा मोठा मळा होता. तिथे गेला. एक म्हातारी सामोरी आली. त्याने प्यायला पाणी मागितले. ती शेतात गेली. एक उस तोडला. उभ्या कांडक्यावर आडवा कोयता मारला. एक मोठा ग्लास भर रस निघाला. राजा बघतच राहिला! उसावर कोयता मारायचा अवकाश कि लगेच एवढा रस! रस पिऊन राजा तृप्त झाला. त्याने विचारले, ‘माई, हा काय जादूचा ऊस आहे का? इतका रस?

किक !!!

लेखक किल्लेदार यांनी शनिवार, 02/12/2017 00:37 या दिवशी प्रकाशित केले.
"किक" कोणाला कशातून,केव्हा आणि किती मिळेल याचं "तार्किक" विश्लेषण करणं जरा अवघडच आहे. रोजच्या आहाराप्रमाणेच या किकचा लागणारा खुराक देखील व्यक्तिसापेक्ष असतो. रोजच्या आहारातली कमतरता भरून काढायला जशी बाजारात व्हिटॅमिन सप्लिमेंट्स मिळतात तशी काही यासाठी उपलब्ध नाहीत . हे "किक" जीवनसत्व ज्याचे त्यालाच शोधावे लागते. हाच वार्षिक खुराक पूर्ण करण्यासाठी किक च्या शोधात रॉलीला किक मारतो आणि कुठल्यातरी प्रवासाला निघतो. उत्तुंग पीर पन्जाल पर्वतरांगा आणि चित्रासारखी सुंदर छोटी गावं दाखवत पहाटे विमान काश्मिर खोऱ्यावरून अलगद खाली उतरते. आपले पाय मात्र जमिनीवर विमानतळाबाहेर आल्यावरच येतात.