Skip to main content

जिव्हाळघरटी

लेखक समयांत यांनी शनिवार, 02/12/2017 16:04 या दिवशी प्रकाशित केले.
मनाच्या काचेवर कापरासारखे आपले बालपण ठेवले तर ते भुर्र उडून जाते, ते उडूच नये असे वाटते, हसरे मन लेऊन जन्मतो आपण प्रत्येक जण मात्र इथूनच ते हरवून द्यायला.. पण नेहमी रडतोसुद्धा आपण तरी दिवसेंदिवस लागतात आपले हसू विरायला, पहिला दिवस खळाळून जातो हसण्या-रडण्यात, नंतर नंतर तर हसण्याला स्मृतीभ्रंश होतो आणि रडण्याला पेव फुटते. नातं व्हावं कसं.. जराही उत्तम नको, तर मनावर काच ठेवून दिसत राहिलं नुसतं तरी निखळ.. ते नको नातं ज्यात नावाचे रकाने भरावेत, वंशाची जबाबदारी घेत. छंदबद्ध तारे खुणावत राहावेत नात्यात, फुलांचा देठापर्यंतचा मागोसा जाणवत-घेत-शेवटत जाणारे. हसू आवरत न-आवरत जीवन सरावे, पक्ष्यांच्या साद घालतांनाच्या समयीं; आपला जीव न्यावा त्यांनी आपल्या घरट्यातल्या पिल्ल्यांना आपल्याच नात्याच्या गोष्टी सांगत. *जिव्हाळघरटी – जी.एं.नी सुनीताबाईंना आपल्या पत्रातून दिलेली शब्दभेट, त्यावरून सुचलेल्या काही ओळी.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1298
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया