अनवट किल्ले २४: महाराष्ट्राच्या उत्तरटोकाचा, सोनगीर ( Songir )
उत्तरेकडून दक्षिणेकडे येणारा आग्रा-नाशिक मार्ग मध्ययुगात महत्वाचा होता कारण उत्तरेकडील शासक दख्खनेवर आक्रमण करण्यासाठी या मार्गाचा वापर करीत. तर मागच्या बाजुने जाणारा रस्ता नंदुरबार-सुरत या मध्ययुगीन महत्वाच्या शहरांना जोडतो. त्यामुळे या आक्रमकांना प्रतिबंध करण्या साठी मध्ययुगात उत्तर महाराष्ट्रातील या मार्गावर मोक्याच्या ठिकाणी किल्ले बांधण्यात आले. सुर्वणगिरी किल्ला नेमका कोणी बांधला याची इतिहासात नोंद नाही. सम्राट अशोकाच्या अधिपत्याखालील हा प्रदेश कालांतराने सातवाहनांकडे गेला व इ.स. २५० मध्ये अहिर राजांनी तो जिंकला.
मिसळपाव