... एक क्षण भाळण्याचा.(४)
मागील दुवा : http://www.misalpav.com/node/41704
ती आत आहे. येईलच.
सामोसे घेउया तोवर. आता आमच्या गप्पा चहाच्या टेबलवर सुरू झाल्या. अचानक खोलीच्या दारातून एक साधारणतः पन्नाशी पलीकडच्या एक बाई आल्या.
बाइंच्या चेहेर्यावर काहीसे हरवल्यासारखे भाव. किंवा कोणतेच भाव नाहीत असे म्हणाना. बाईनी आमच्या कडे पाहिले आम्ही नमस्कार केला. त्यानी उलट नमस्कार केला नाही.
ही माझी पत्नी सौंदर्या. नाथ साहेबानी ओळख करुन दिली.
चला . बसायचंय इथे. का आत जायचंय परत.
बाईंच्या चेहेर्यावर काहीच प्रतिक्रीया नाही.
मिसळपाव