ऑस्ट्रेलियन ओपन चा अंतिम सामना आणि शैलीदार फेडरर...
काही माणसे कायम चिरतरुण राहावीत अन त्यांच्या कलाकृती सतत येत राहाव्यात अस वाटत राहतं. ज्यांचं मन चिरतरुण असत अशा रसिकांची ही भावना देखील तितकीच चिरतरुण.
ऑस्ट्रेलियन ओपन चा २०१८ चा अंतिम सामना संपल्यावर रडणारा फेडरर पाहून ही रसिक मंडळी अशीच पुटपुटली. सर्वकालीन महान खेळाडूंत ज्यांच्याबद्दल आत्यंतिक आदर राहील आणि शेवटपर्यंत लोकप्रियतेच्या शिगेला असलेला हा खेळाडू.
वयामुळे खेळाला मर्यादा येतात खऱ्या. जुन्यांनी ते ओळखून नव्यांना संधी द्याव्यात. परंतु ही व्याख्या सांघिक खेळाची. वैयक्तिक खेळात निवृत्तीचे वय जो तो ठरवतो.
सौर उर्जा आणि काही शंका
फार वर्षापुर्वी रेवा नावाची विजेवर चालणारी गाडी बाजारात आली होती.
<टाइम प्लीज>
ज्यांना पॉपकॉर्न खाऊन घाण करायची आहे त्यांनी
https://www.misalpav.com/node/41559
इथे व्यक्त व्हावे.
</टाइम प्लीज>
फार वर्षापुर्वी रेवा नावाची विजेवर चालणारी गाडी बाजारात आली होती. वापरण्यापूर्वी काही तास ती चार्ज करावी लागते.
सैल असावी मिठी जराशी...
सैल असावी मिठी जराशी,
हळूच वळुनी तुला बघाया,
अर्ध्या मिटल्या तव नयनांचे,
ओले हळवे चुंबन घ्याया..
रेशीम काळे केस उडोनी,
कुरळ्या लाटा बाहुंवरती,
मऊ मुलायम आखीव रेखीव,
घटद्वयांना व्यर्थ लपवती...
जरा विसावून सिंहकटीवर,
मधूर मादक श्वास फुलावे,
अधीर कोडे या विश्वाचे,
गहि-या डोही उकलून यावे..
पहाटवारा लगबग करतो,
घेऊन येतो थोडे केशर,
स्वर्णीम करतो शर्मिल गाला,
तलम तृप्तीचे शिंपून अत्तर..
( पहिली ओळ रेखोकडून उधार घेतली आहे..)
काव्यरस
मानसशास्त्रातील रंजक प्रयोग - १
उंदरांच्या नंदनवनाचा प्रयोग
१९५० ते १९७२ या काळात अमेरिकन संशोधक जॉन कोलनने लोकसंख्या वाढीचे परिणाम जाणून घेण्यासाठी उंदरांवर काही प्रयोग केले. या प्रयोगा अंतर्गत त्याने उंदरांना राहण्यासाठी सुमारे ३००० उंदरांना पुरेल असा मोठा पिंजरा तयार केला. पिंजऱ्यात अन्न, पाणी इत्यादीचा मुबलक पुरवठा होता. राहण्यासाठी अतिशय उत्तम अशी परिस्थिती तयार करण्यात आली होती. त्यावरुन या प्रयोगाला ‘माऊस युटोपिया एक्सपेरीमेंट’ अर्थात ‘उंदरांच्या नंदनवनाचा प्रयोग’ असे नाव पडले. यात सर्व काही मुबलक असून बंधन फक्त एकच होते ते म्हणजे जागेचे.सुधारस
सुधारस हे पक्वान्न बहुसंख्य मराठी घरात ऐतिहासिक किंवा आठवणींच्या कोषात जाऊन पडलं असलं तरी आमच्याकडील जेवणाच्या ताटात मात्र आजही सुधारस आपलं स्थान टिकवून आहे. याचं मुख्य कारण म्हणजे यासाठी लागणार्या सामग्रीची सहज उपलब्धता, कमीत कमी लागणारा वेळ आणि कौशल्य ,ही त्रिसूत्री.
तुम्हाला कोण व्हायचंय.... बारामतीकर?
बऱ्याच दिवसांनी पु. ल. देशपांडेंचे 'तुम्हाला कोण व्हायचंय - मुंबईकर, पुणेकर की नागपूरकर?' पाहिलं..
सहज त्यावरून सुचलं.. कर जोडावे असे अजून एक शहर काही वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या नकाशावर आले आहे..
ते म्हणजे बारामती..
आता तुम्हाला बारामतीकर व्हायचंय का? तर.. अगदी नावाची फोड केल्यासारखेच आहे पण..
निदान दहा - 'बारा' वेळा विचार करा आणि तरी 'मती' ठिकाणावर असली तर तयारी सुरु करा कारण जितके बाकी ३ शहरे आणि तिथले कर होणे अवघड आहे, तसेच इथे सुद्धा आहे..
मुंबईकरांचं घड्याळ त्याचा हाताला नाही तर नशिबाला बांधलेलं असतं..
बोरांचे दिवस
डिसेंबर - जानेवारी महिन्यात आमच्या उरण येथील नागांवातील वाडीमध्ये बोरांचा घमघमाट सुटलेला असायचा. डिसेंबरच्या सुरुवातीलाच अधून मधून एक-दोन लालसर-कच्चट बोरे पडायची मग आम्ही समजायचो की आता थोडे दिवसांत पिकलेल्या बोरांचे सडे झाडाखाली पडणार. माझी आई ह्या बोरे मोहोत्सवासाठी सज्ज असायची. तिच्या टोपल्या वाटच पाहत असायच्या त्यांचं रितेपण भरून काढण्यासाठी. आई प्रार्थमिक शिक्षिका होती. पण शाळेतल्या जबाबदार्या पार पाडून ती घरच्या-वाडीतल्या कामांतही लक्ष घालायची. झाडा-फुलांत रमायची. चिंचा-बोरांच्या सीझनला तिची लगबग असायची. वाडीत पाच-सहा बोरांची झाडे होती. प्रत्येक बोराचे खास वैशिष्ट्य असायचं.
काही चित्रपटीय व्याख्या
हे एक आमचे संशोधन, खास जनहितार्थ. गाणी, संवाद वगैरे ऐकताना लोकांना असे प्रश्न पडतात की तेरी मैफिल मे म्हणजे नक्की कोठे. तेथे ही माहिती उपयोगी पडेल. गेल्या काही दिवसांत वाचकांनी "प्रेमात पडल्यावर सजदे नक्की कधी करतात?", "तिच्या मैफिलीत जायचे आहे. काय तयारी करून जाऊ?", "जानेजा जास्त भारी की जानेजहॉ?" असे अनेक प्रश्न विचारले. म्हणूनच हा लेखप्रपंच.
तर काही गाण्यांमधून व डॉयलॉग्ज मधून नेहमी ऐकू येणार्या शब्दांच्या व्याख्या.
फूटी कौडी:
प्रत्यक्षात जी देणार्याकडे नसते. घेणार्याला नको असते. तरीही ती मिळणार नाही अशी देणारा धमकी देतो, अशी जगातील एकमेव गोष्ट.
'नासक' नावाचा हिरा आणि दुसर्या बाजीरावाची संपत्ति
माझ्या समजुतीनुसार बाजीराव आणि अन्य हिंदुस्तानी राजे-महाराजे आणि नबाब ह्यांच्याकडून ब्रिटिशांनी वेळोवेळी ज्या रकमा आणि जडजवाहीर युद्धाच्या मार्गाने मिळविले त्यांचे पुढे काय झाले ह्याबद्दल आपल्याकडे स्पष्ट अशी काहीच माहिती उपलब्ध नाही. ती संपत्ति ब्रिटिशांनी 'लुटली' एवढेच आपण म्हणू शकतो. आता बुक्स.गूगल सारख्या स्थळांमुळे १८व्या-१९व्या शतकातले छापील साहित्य आपल्याला नव्याने उपलब्ध झाले आहे आणि बाजीरावच्या संपत्तीचे काय झाले ह्याचे पुष्कळसे समाधानकारक उत्तर मिळू शकते.
मिसळपाव