तुम्हाला कोण व्हायचंय.... बारामतीकर?
बऱ्याच दिवसांनी पु. ल. देशपांडेंचे 'तुम्हाला कोण व्हायचंय - मुंबईकर, पुणेकर की नागपूरकर?' पाहिलं..
सहज त्यावरून सुचलं.. कर जोडावे असे अजून एक शहर काही वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या नकाशावर आले आहे..
ते म्हणजे बारामती..
आता तुम्हाला बारामतीकर व्हायचंय का? तर.. अगदी नावाची फोड केल्यासारखेच आहे पण..
निदान दहा - 'बारा' वेळा विचार करा आणि तरी 'मती' ठिकाणावर असली तर तयारी सुरु करा कारण जितके बाकी ३ शहरे आणि तिथले कर होणे अवघड आहे, तसेच इथे सुद्धा आहे..
मुंबईकरांचं घड्याळ त्याचा हाताला नाही तर नशिबाला बांधलेलं असतं.. तसंच काहीसे बारामतीकाराचे पण आहे कारण अगदी मुंबईकरासारखी काट्यावरची कसरत नसली तरी ‘घड्याळ’ ज्या पंज्याला बांधलंय ते चालू आहे ना हे माहित असणे महत्वाचे आहे.. कारण काट्यावरची कसरत नसली म्हणून काय झालं? काटा नीट काढता आलाच पाहिजे...
पुणेकरासारखा अभिमान सुद्धा काही अंशी हवाच पण हा बऱ्याच वेळा एकाच गोष्टी वर येऊन थांबतो.. म्हणजे कोणी म्हणलं की तुमचा आवडता ऋतू कुठला तर हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळा असे सर्व साधारण ढोबळ वर्गीकरण करणारे लोक भारतात सापडतील.. जरा पुरातन (पुरोगामी नव्हे) लोकं, अगदी वसंत आणि ग्रीष्म सुद्धा म्हणतील... तसंच परदेशी लोक Autumn N Spring म्हणतील पण अस्सल बारामतीकर होण्या करता 'शरद' ऋतू आवडणे ही काळाची गरज समजावी...
कोजागिरी किंवा Full Moon सारख्या गोष्टी लोक करायला लागले किंवा अगदी दस्तुरखुद्ध NASA वाले तुम्हाला चंद्रावर नेऊन आणायला तयार झाले तरी सुद्धा वाह काय ते आमचे 'शरदा'चे चांदणे ही ओळ साधारण पौर्णिमा असो किंवा अमावस्या बोलत रहावी…
तसं बारामती ला अशी काही शेती मधली History किंवा Speciality नाही म्हणजे नागपूरकर जसे आपल्या संत्र्यांचे गुणगान गातात तसे इथे गरज नाही पण सर्वसामान्य असो किंवा शेतकरी टोमॅटो, कांदा, बटाटे किंवा ‘मुळे’ या भाज्यांचा हंगाम माहित नसेल तर चालेल पण 'ताई' साहेब यांचा नियोजित दौरा हा तोंडपाठ हवाच..
जसा पु.ल. म्हणतात की, टिळक - गांधी या मुंबई बाहेरच्या लोकांनी इंग्रज आणि मुंबईकरांचे संबंध बिघडवले, तसेच काका आणि पुतण्याचे संबंध बिघडवणारी आणि पुणेकर लोकांनी कंठलेली 'काका मला वाचवा' या अतिशय ह्रदयद्रावक कहाणी लोकांच्या मनातून पुसून टाकायला आणि ‘काका ने पुतण्या ला कसे घडवले’ पर्यंत संस्कारी कहाणी याची माहिती तुम्हाला माहित असेल कि तुम्ही बारामतीकर झालात म्हणून च समजावे…
मुळात मुंबईकरासारखे गनिमी काव्याने येणाऱ्या पाहुण्याला चुकवायचा इथे प्रश्नाचं येत नाही कारण पाहुण्याला आवडो अथवा ना आवडो आणि पाहुणा प्रादेशिक परिसरातला असला काय किंवा देश पातळी वरचा असला काय इथे एकदा पाहुणचाराला येऊन च जातो इतकं ‘पॉवर’फुल समीकरण बारामतीकर होण्याकरता कळणे फार महत्वाचे..
बाकी धरणांची संख्या, पाण्याची पातळी, सहकारी तत्व आणि पुरोगामी धोरण अशी काही विषयांची आपली पूर्ण तयारी झाली की बारामतीकर होण्याची Ph.D ची परीक्षा आपण पास झालात म्हणून समजायचं!!
कारण बारामतीकर होणे म्हणजे आपल्या शहरात फार रेल्वे येत नसताना ‘इंजिनाची’ अचूक माहिती, ‘पंजाचा’ वापर आणि ‘धनुष्यबाणाची’ कला अवगत नसताना सुद्धा ‘कमळ मुखी’ चेहरा करून, बिनचूक नेम साधता आला की आपण आजन्म बारामतीकर म्हणूनच ओळखले जाल हे नक्की..
विनंती आणि तळटीप : हे फक्त विनोद याच अर्थाने सुचलेले आहे. राजकारण किंवा कुठलीही टीका करणे हे उद्देश्य नाही..
वर्गीकरण
कोटया जरा जास्तीच झाल्या अस
In reply to कोटया जरा जास्तीच झाल्या अस by उपेक्षित
अजून शिकतोय लिहायला..
In reply to कोटया जरा जास्तीच झाल्या अस by उपेक्षित
सहमत. नाही आवडलं.
मस्त जमलंय. आवडलं बुवा
In reply to मस्त जमलंय. आवडलं बुवा by ज्योति अळवणी
+11
In reply to +11 by प्राची अश्विनी
प्रतिसादासाठी धन्यवाद.. _/\_
In reply to मस्त जमलंय. आवडलं बुवा by ज्योति अळवणी
प्रतिसादासाठी धन्यवाद.. _/\_
हा हा हा
In reply to हा हा हा by सुखीमाणूस
प्रतिसादासाठी धन्यवाद.. _/\_
In reply to प्रतिसादासाठी धन्यवाद.. _/\_ by राखीव खेळाडू
ओक्के
मस्त जमलंय!
In reply to मस्त जमलंय! by श्रीगुरुजी
प्रतिसादासाठी धन्यवाद.. _/\_
पुलंच्या तुम्हाला कोण
In reply to पुलंच्या तुम्हाला कोण by कंजूस
फक्त एक प्रयत्न..
छान लिहिले आहे....
चांगला प्रयत्न आहे, लिहीत रहा
In reply to चांगला प्रयत्न आहे, लिहीत रहा by पगला गजोधर
कोणती आणि कोणाचीच टगेगिरी काय
In reply to कोणती आणि कोणाचीच टगेगिरी काय by विशुमित
लैच राव पर्सनली घेतासा तुमिबी
In reply to लैच राव पर्सनली घेतासा तुमिबी by पगला गजोधर
बरं बाबा विनोद तर विनोद.
मस्तं कोट्याधिश लेख !
@ राखीव खेळाडू,
नही जम्या.
In reply to नही जम्या. by अभ्या..
++११ पुलेशु
सर्वांना प्रतिसादासाठी धन्यवाद.. _/\_
नही जम्म्या...
In reply to नही जम्म्या... by विशुमित
राजे, दिलपे मत लो !
In reply to राजे, दिलपे मत लो ! by पगला गजोधर
नाही साहेब, बारामतीकर दिल पे
In reply to नाही साहेब, बारामतीकर दिल पे by विशुमित
आणि दुसर्याच्या गावाला
In reply to आणि दुसर्याच्या गावाला by धनावडे
तुमचा रोख वाई बद्दल असेल तर
In reply to तुमचा रोख वाई बद्दल असेल तर by विशुमित
जाऊ द्या पाटील, इग्नोर करा,
:)
लिहीत रहा..
In reply to लिहीत रहा.. by अभिदेश
+१११११११
मस्तय .... झक्कास !
भारी लिहीलंय... तुम्ही टगेखोर
In reply to भारी लिहीलंय... तुम्ही टगेखोर by सूड
१+
मस्त
आवडले ...