Skip to main content

हळूहळू साऱ्यांनीच प्रेमाचं दुकान मांडून टाकलं

लेखक खिलजि यांनी बुधवार, 18/04/2018 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
तिच्या आवडीनिवडीसाठीच मी मैत्रीलाच गहाण ठेवलं ते बोलावयाचे नेहेमी मजला यायला सांगायचे नाक्यावर एकही धड वाटत नव्हता तिला एकेकाचं हळूहळू शिरकाण करून टाकलं शिकाऱ्यावानी माग काढत होती माझा नजरेत असावं म्हणून समोरच मचाण बांधून टाकलं त्यांना खबर पोहोचताच याची सुटकेसाठी त्यांनी जीवाचं रान करून टाकलं लग्नाआधीच तिच्याविरुद्ध माझं कान भरून टाकलं चंडी रूप धारण करून मग तिनं सर्वांचंच पायताण करून टाकलं प्रत्येक चीअर्सबरोबर एकेक थेम्ब सर्वानी ओवाळून टाकला अश्या मित्रापेक्षा सर्वाना वेटरच बरा वाटला नशेत साऱ्यांनी फोन करून शिव्यांचं दान वाटलं उमजता मज मेख सारी सालं प्रेमाचं

उपकार इंग्रजांचे

लेखक आशु जोग यांनी बुधवार, 18/04/2018 10:11 या दिवशी प्रकाशित केले.
इंग्रजांनी या देशाला गुलाम केले. ही गोष्ट खरी असली तरीसुद्धा इंग्रजांनी काही चांगल्या, वरदान म्हणाव्यात अशा गोष्टी भारताला दिल्या. त्यातली एक म्हणजे इंग्रजी भाषा. इंग्रजी भाषेमुळे आपल्याला जगाचे दरवाजे खुले झाले. इंग्रज या देशातून जाऊन आता 70 वर्षे झाली पण त्यांची इंग्रजी भाषा आणि तिची उपयुक्तता मात्र आम्ही विसरलेलो नाही.

मित्र नव्हे, परिचित !

लेखक हेमंतकुमार यांनी बुधवार, 18/04/2018 08:51 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या वैद्यकीय कारकिर्दीच्या सुरवातीच्या टप्प्यातील हा प्रसंग आहे. एम.डी. ही पदवी प्राप्त करून मी एका हॉस्पिटलमध्ये सल्लागार म्हणून रुजू झालो. ते हॉस्पिटल नव्यानेच सुरू झाले होते. त्यामुळे माझ्यासह इतर सहकारीही पायाभूत उभारणीची कामे मन लावून करीत होते. हळूहळू हॉस्पिटलचा विस्तार होत गेला. मग तेथील डॉक्टरांची संख्याही वाढवण्यात आली. अशाच एका नवीन भरतीच्या वेळी माझ्या विभागात डॉ. सतीश हा माझा कनिष्ठ सहकारी म्हणून रुजू झाला. महिनाभरातच मी त्याच्याविषयी एक अंदाज बांधू शकलो. तो जरी फारसा हुशार नसला तरी तो नेमून दिलेली कामे व्यवस्थित करीत असे. रोज जेवणाच्या सुटीत आम्ही दोघे एकत्र डबा खाऊ लागलो.

क्रिकेट फिल्डींगचा सम्राट हरपला - कॉलीन ब्लँड

लेखक स्पार्टाकस यांनी बुधवार, 18/04/2018 08:01 या दिवशी प्रकाशित केले.
१९६५ सालचा जुलै महिना.... पीटर व्हॅन डर मर्व्हचा दक्षिण आफ्रीकन संघ इंग्लंडच्या दौर्‍यावर होता. लॉर्ड्सच्या पहिल्या टेस्टमध्ये टॉस जिंकून बॅटींग करणार्‍या दक्षिण आफ्रीकेची इनिंग्ज २८० रन्सवर आटपली होती. जेफ्री बॉयकॉट आणि रॉन बार्बर यांनी ८२ रन्सची ओपनिंग पार्टनरशीप केल्यावर ते दोघं आणि जॉन एड्रीच आऊट झाल्यामुळे इंग्लंडची ८८ / ३ अशी अवस्था झाली. केन बॅरींग्टनने कॉलीन कौड्रीबरोबर ५६ रन्सची जोडल्या, पण रिचर्ड डम्ब्रीलने कौड्रीचा ऑफस्टंप उखडल्यावर त्याने कॅप्टन माईक स्मिथबरोबर ९६ रन्सची पार्टनरशीप करत इंग्लंडला सुस्थितीत आणलं.

साठा उत्तरांची कहाणी

लेखक अनन्त्_यात्री यांनी मंगळवार, 17/04/2018 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
एक टिनपाट महानगर होतं तिथं एक आय्-डी होता हा आय्-डी कसा होता? विद्वज्जड, विचारवंत, साक्षेपी, प्रत्युत्पन्नमति इ.इ. त्याचा दिवस कसा जायचा? सक्काळी सक्काळी कायप्पावर इधरका माल उधर सर्कवायचा लंच टायमात एका संस्थळावर काही अभ्यासपूर्ण टंकायचा काॅफी ब्रेकात दुसर्‍या संस्थळी थोडा साक्षेपी पिंकायचा परतीच्या घामट ट्रॅफिक जॅमात पाठथोपट्या प्रतिसादकांस धन्यवादायचा अन् पायखेच्या प्रतिसादकांना हेडाॅन भिडायचा. एकदा काय झालं? जरी सबकुछ होतं झिंगालाला तरी वैचारिक वैफल्य आलं बिचार्‍याला. या वैफल्यानं काय झालं? त्यास आंजावैराग्य आलं आंजावैराग्याची लक्षणे कोणती? तो टंकेना की पिंकेना समस्त स्क्रीनांकडे तो पाठ फ

आम्ही दोघीच्या निमित्ताने

लेखक पारा यांनी मंगळवार, 17/04/2018 18:20 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्ण बघताना कंटाळा आला नाही म्हणजे चित्रपट आवडला असं समजायचं का? की चित्रपटाच्या व्यक्तिरेखांच्या आयुष्यात जे घडतं त्याने तुम्हाला फरक पडला तर त्या चित्रपटाचा प्रभाव पडला असं म्हणता येईल? आम्ही दोघी तसं काहीच करत नाही. कुठल्याच व्यक्तिरेखेशी मी समरस होऊ शकलो नाही. प्रिया बापट आणि तिच्या बाबांमधला असंवाद मला कुठेच स्पर्श करून गेला नाही. त्या दोन्ही व्यक्तिरेखा कोरड्या आणि प्लास्टिकच्या वाटल्या मला. नाही म्हणायला मुक्ता बर्वेचा संयत अभिनय थोडा कुठे मनाला भिडतो, पण तिचा रोल तसा फार नाहीच. गावाकडच्या एका मुलीचं बेअरिंग ती पहिल्या सीनला जे पकडते ते अगदी शेवटपर्यंत.

हरवलेला डबा

लेखक मूखदूर्बळ यांनी मंगळवार, 17/04/2018 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
हरवलेला डबा फार नाही ३० वर्षा पूर्वीची गोष्ट असेल. मला माझ्या वस्तू हरवायची खुप सवय होती. आणि तेंव्हा माझ्या कड़े हरवणया सारख्या वस्तूही खुप होत्या. कधी पेन्सीळ, कधी कंपास तर कधी फक्त वही. पण त्यातल्या त्यात माझी आवडीची हरवायची वस्तू होती ती म्हणजे माझा खाऊचा डब्बा. हा मी एक दिवसा आड़ हरवायचोच. सुरुवातीला वेन्धळ ट पणा ने डबा हरवणारा मी नंतर नंतर सवयीने डबा हरवायला लागलो. माझ्या सोयीसकर डबा हरवणयालाही एक कारण होत.

द टाईमब्रिज अर्थात कालसेतू –३

लेखक सस्नेह यांनी मंगळवार, 17/04/2018 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वसूत्र : …. तीन दिवसांनी आग विझली तेव्हा धीरावतीचे भाऊ आत शिरले आणि त्यांनी वाडा पिंजून काढला. पण काळ्याठिक्कर पडलेल्या भिंतीमध्ये क्रियाकर्म करण्यासाठी एकही हाड सापडले नाही की धीरावतीच्या अंगावरच्या दोनशे तोळे सोन्याच्या दागिन्यांपैकी गुंजसुद्धा मिळाली नाही. मधल्या बंदिस्त देवघराचे दार अर्धवट जळलेल्या अवस्थेत उघडे होते. थोरल्याने तिथून आत नजर टाकली तेव्हा त्याला जे दृश्य दिसले ते पाहून त्याची वाचाच बंद झाली ! … भाग ३ ...देवखोलीत खाली जमीनच नव्हती ! खोलवर नजर जाईल तिथपर्यंत साकळलेला अंधार ! खाली नजर टाकली तरी भोवऱ्यात फसावे तशी भावना होत होती. खोलवर मध्येच प्रकाशाचा ठिपका दिसे.

सगळीकडे सारखेच

लेखक चांदणे संदीप यांनी मंगळवार, 17/04/2018 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी सकाळी क्रिकेट खेळायला मैदानावर जमल्यावरच्या गप्पा ते यूपी बिहारवाले लै भुरटे विश्वास न ठेवण्याच्या लायकीचे दिल्ली हरयाणावाले तर आगाव एकजात सगळे माजोरडे साले गुजराती मारवाडी तर काय लुटायलाच बसलेत सारे चांगले वाटतात बाहेरून पण हे मल्लू मद्राशी पक्के आतल्या गाठीचे आसामी बंगाली पण त्यातलेच गोड बोलून गंडा बांधणारे दुपारी जेवल्यानंतर टपरीवर जमलो चहा बिडीकाडी करत बोलू लागलो धुळे जळगाव खानदेशवाले अमुक हे नागपूर विदर्भवाले तमुक सांगली सोलापूरवाले साले दुष्काळी आडमुठे अर्धवट नाशिक नगरी सातारा कोल्हापूरवाले पण त्यातलेच आणि कोकणी एक नंबर चिक्कू बीड उस्मानाबादी तर मजाच गड