Skip to main content

काय हाही भास आहे ?

लेखक नाहिद नालबंद यांनी शनिवार, 26/05/2018 17:22 या दिवशी प्रकाशित केले.
मस्त हा मधुमास आहे! काय हाही भास आहे ? पँन अन आधार जोडा काय कटकट त्रास आहे छान! सुंदर! लोक म्हणती मत तुझे मज खास आहे धीर थोडा धर जरा तू अंत आरंभास आहे लालसा, अविचार, फितुरी आपुला इतिहास आहे चांगली असतेच कविता पण गझल फर्मास आहे एकदा मिळतो म्हणे, पण जन्म मनुचा त्रास आहे
काव्यरस

माझे नेहरवायण १

लेखक माहितगार यांनी शनिवार, 26/05/2018 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
* लेखाची लांबी अधिक असल्याने, ठळक मुद्द्यांच्या द्रूत वाचनासाठी अधोरेखीत करण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात प्रतिसाद देण्यापुर्वी पूर्ण लेख वाचणे अभिप्रेत असावे. __/\__ विविध कारणांनी विविध ठिकाणी आस्था असतात , तशी अगदी शालेय वयात असताना वाचलेल्या नेहरू लिखित डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथा बद्दल आस्था आहे. तसे नेहरू लिखित दि डिस्कव्हरी ऑफ इंडिया अद्यापही कॉपीराईटेड असावे पण कुठूनसे बऱ्याच वर्षांनंतर डिस्कव्हरी ऑफ इंडियाची पीडीएफ हाती आली.

आप (Discussion on characteristics, properties and classification of liquids)

लेखक अनिकेत कवठेकर यांनी शनिवार, 26/05/2018 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
(प्रशस्तपादभाष्याच्या ४थ्या धड्यातील आप किंवा द्रवरूप पदार्थांच गुणधर्म, प्रकार, वागण्याच्या तऱ्हा व उपयोग या संबंधीची माहिती या धड‌यात आहे. हे श्लोक ३ऱ्या - ४थ्या शतकातले असून तेव्हाची भारतीयांमध्ये वापरात असलेली जल किंवा आपद्रव्यांच्या अभ्यासाची पद्धत दर्शवतात. काही गोष्टी किंवा संकल्पना पटणारही नाहीत पण त्यासाठी पूर्णच अभ्यासाची पद्धत नाकारू नये. जे जे प्रत्ययास येईल तेवढेच मानावे.

रसायनांचा पूर आणि हॉर्मोन्सचा बिघडलेला सूर

लेखक हेमंतकुमार यांनी शुक्रवार, 25/05/2018 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
सध्याच्या युगात विविध रसायने ही आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेली आहेत. त्यातील काही नैसर्गिक आहेत तर काही मानवनिर्मित. आज माणसाने विविध कारणांसाठी बनवलेल्या रसायनांची संख्या एक लाखाच्या आसपास आहे! ती बनवण्यामागे विविध उद्देश होते खरे पण, त्यांच्या बेलगाम वापरामुळे तीच आता आपल्यावर बूमरॅंग झाली आहेत. त्याचे अनेक दुष्परिणाम आपण सध्या भोगत आहोत.

तिथे ओठंगून उभी...

लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 25/05/2018 20:23 या दिवशी प्रकाशित केले.
रानपाखरांची घरे अंगीखांदी जे माळते असे झाड फुलताना पान पान किल्बिलते क्षितीजाशी विझताना चांदणे जे उसासते त्याचे पहाटे पहाटे जीवघेणे गीत होते रानावनातून नदी जेव्हा खळाळत जाते ऐलपैलतीरी तिचे पाण-पैंजण वाजते फुफाटल्या मातीवर मृग शिंपण घालते तेव्हा अत्तराची कुपी आसमंती ओसंडते नाद-शब्द-ताल-गंध जिथे काळजा भिडते तिथे ओठंगून उभी.. ...एक कविता असते
काव्यरस

एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग २: परभणी- जिंतूर- नेमगिरी

लेखक मार्गी यांनी शुक्रवार, 25/05/2018 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
२: परभणी- जिंतूर- नेमगिरी एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग १: प्रस्तावना ११ मे ला पहाटे साडेपाचला परभणीतून निघालो. अनेक जण निरोप देण्यासाठी आले, त्यामुळे उत्साह आणखी वाढला. अनेक जणांनी मॅसेजवरही शुभेच्छा दिल्या. काही अंतरापर्यंत माझे प्रिय सायकल मित्र आणि माझे रनिंगचे गुरू बनसकर सरसुद्धा सोबत आले. मी चालवतोय ती एटलस सायकल त्यांचीच तर आहे! पाय दुखत असूनही ते काही अंतर सोबतीला आले. थोडा वेळ त्यांची सोबत मिळाली व मग पुढे निघालो. योग प्रसार हेतु सायकलिंगच्या ग्रूपवर माझं लाईव्ह लोकेशन टाकलं आहे.

अनवट किल्ले ३३ : मालेगावचा भुईकोट ( Malegaon Fort )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 25/05/2018 17:24 या दिवशी प्रकाशित केले.
मालेगाव हे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध तालुक्याचे गाव असून ते नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. नाशिकच्या ईशान्य दिशेला नाशिक शहरापासुन १०८ कि.मी. अंतरावर ,मालेगाव असून मुंबई -आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ हा मालेगावातून जातो. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहर अनेक गोष्टींमुळे नेहमीच चर्चेत असते.धार्मिक दंगलीमुळे काहीसे बदनाम झालेल्या या गावच्या कोरड्या हवामानामुळे ईथे मोठ्या प्रमाणात यंत्रमागाचा व्यवसाय चालतो. दाट लोकवस्तीच्या खानदेशातील या महत्वाच्या प्राचीन शहरात गिरणा (गिरीपर्णा) आणि मोसम (मोक्षिणी) नद्यांच्या संगमावर मालेगावचा (माहुलीग्राम) देखणा भुईकोट किल्ला आहे.

का करत नाही कुणी उलट सारे

लेखक खिलजि यांनी शुक्रवार, 25/05/2018 17:13 या दिवशी प्रकाशित केले.
का करत नाही कुणी उलट सारे ज्याला त्याला सुख प्यारे हा द्यूत मांडला कुणी ? इथे पटलावरचे प्यादे सारे मंडल डोळ्यांनी दिसते खरे दिसतात नभी चंद्र तारे आवाका दोन नेत्रांचा असा किती ? त्यात सामावले सुखदुःख आणि अश्रू सारे दोन पायावरती उभे धड पुरे असती एका मनाचे खेळ सारे मन शोधूनही सापडत नाही विज्ञानास तरी त्याचे अस्तित्व खरे बघता सरळ कुणी , वाकडी भासे दुनिया वाकडे वागता कुणी सलाम ठोके दुनिया वक्र दृष्टी ग्रहांची ज्या कुंडलीत त्याच ग्रहांची शांती होते इतर ग्रहांचे फळ मिळूनही सारे काही दुर्लक्षित होते बळी द्या त्या कोंबड्या बकऱ्या द्याल का कधी बळी वनराजाचा ?
काव्यरस

राजयोग - ४

लेखक रातराणी यांनी शुक्रवार, 25/05/2018 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
राजयोग - १ राजयोग - २ राजयोग - ३ भुवनेश्वरी देवीच्या मंदिराचा सेवक जयसिंह क्षत्रिय कुळातील होता. त्याचे वडील सुचेतसिंह त्रिपुराच्या राजमहालातले जुने सेवक होते. सुचेतसिंहांचा मृत्यू झाला तेव्हा जयसिंह लहान होता. वडिलांच्या पश्चात अनाथ झालेल्या या मुलाला राजाने मंदिरात काम करण्यास नियुक्त केले. मंदिराचे पुजारी रघुपती यांनीच त्याचे पालनपोषण आणि शिक्षण पार पाडले होते.

स्वैपाकघरातून पत्रे २

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 25/05/2018 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय अन्नपूर्णा, जसे शहरात अपार्टमेंट, तसे किचनमध्ये आम्ही. एकावरएक चार, पाच, सहा किंवा आणखी कितीही मजली. तुझ्या choice प्रमाणे. घरातील माणसांच्या संख्येवर लोक माझी खरेदी करतात. तुझ्या घरात आमचे सहा मजले आहेत. पण तू त्यातलेही एक दोन काढून ठेवतेस. म्हणतेस, ‘घरात इतकी कमी माणसे, कशाला सगळे मजले चढवत बसा?’ मग आमच्यातला वरचा मजला काढून ठेवतेस किंवा रिकामा तरी ठेवतेस. मग उरलेल्या सगळ्यांना कुकरमध्ये बसवतेस. आम्ही सहसा बाहेर येतो, ते सुट्टीच्या दिवशी. तो दिवस आमच्या outing चा.