मेघ बरसला
मेघ बरसला
विरही अश्रूंचा
खारा खारा.
मेघ बरसला
प्रथम आषाढी
प्रिय वार्तेचा.
मेघ बरसला
माळात रानात
काळा काळा.
मेघ बरसला
भिजली धरणी
हिरवी हिरवी.
काव्यरस
आपण फाळणीच्या कथा मंटोच्या कथांमधून वाचल्या. मी त्या कथांचे भाषांतर येथे केले आहे. इतिहासात ज्या काही महत्त्वाच्या घटना घडल्या, चांगल्या किंवा भीषण, त्याच्या पार्श्वभूमीवरील कथा या नेहमीच ह्रदयद्रावक असतात. उदा. पानिपतच्या पार्श्वभूमीवरील माझी ‘‘नथ’’ ही कथा.