Skip to main content

माध्यमांतर– "एपिक" धर्मक्षेत्र: कर्ण एपिसोड!

लेखक निमिष सोनार यांनी शुक्रवार, 20/07/2018 19:40 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना: एपिक या टीव्ही चॅनलवर धर्मक्षेत्र नावाचा एक कार्यक्रम लागतो. त्यात महाभारतातील सर्व पात्र मृत्यू पावल्यानंतर पाप पुण्याचा हिशोब करण्यासाठी चित्रगुप्तच्या दरबारात येतात आणि एकेका एपिसोडमध्ये एकेका व्यक्तीवर इतर संबंधित व्यक्तींनी लावलेले आरोप चित्रगुप्त वाचून दाखवतात आणि ती व्यक्ती मग त्या आरोपांचे आपल्या कुवतीनुसार खंडन करते आणि मग शेवटी चित्रगुप्त आपला निवाडा देतात. मी येथे टीव्ही ते छापील (लिखित) माध्यम असा बदल म्हणजेच "माध्यमांतर" केले आहे तसेच मूळ एपिसोडची भाषा हिंदी असून त्याचा स्वैर मराठी अनुवाद केला आहे!!

साथ

लेखक Secret Stranger यांनी शुक्रवार, 20/07/2018 13:23 या दिवशी प्रकाशित केले.
हरपले हे देहभान ना उरले दिशांचे ज्ञान, ना कसले अनुमान हेच का प्रीतीचे प्रमाण..? धुंद रूपाची तुझ्या जणू भूलच ही पडली, तुजवाचून सारी सुखे का दिसती शुन्यासमान..? सुंदरशा या कातरवेळी मन सैरभैर का होई, का होई तुझा भास कसली ही अशी तहान..? प्रश्न असा हा पडता उत्तर आले त्वरीत मला, तूच हवी या ह्रदयाला देशील का ग साथ मला...??

पावसाळी भटकंती : वारुगड (Varugad)

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 20/07/2018 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
ताथवड्यावर भटकण्याचा "संतोष" घेउन मी "वारु"वर स्वार व्हायला निघालो. फलटण शहरातून विचारणा करत गिरवी रस्त्याला लागलो. फलटणवरून वारुगडाला जाण्यासाठी तीन मार्ग आहेत. Varugad 1 १ ) फलटणवरून गिरवीमार्गे पायथ्याचे जाधववाडी गाव गाठायचे. हे अंतर साधारण १४ कि.मी. आहे. फलटण ते गिरवी अशी एस टी सेवा उपलब्ध आहे. गिरवीतून ५ किमी अंतरावर असणारा जाधववाडी गाठावा. येथून वारुगड माचीवर जाण्यास २ तास लागतात. माचीतून बालेकिल्ल्यावर जाण्यास २० मिनिटे लागतात.

यातच सारं काही

लेखक यश पालकर यांनी शुक्रवार, 20/07/2018 05:06 या दिवशी प्रकाशित केले.
नजर नव्हती मिळवायची कुणाच्याच नजरेसोबत तीच नजर तुझ्याच शोधात होती यातच सारं काही आलं माझ्या मनातला कोलाहल न सांगता न बोलता तुझ्या मनापर्यंत पोहचला यातच सारं काही आलं मी कोंडून घेतले स्वतःला तेव्हा वाऱ्याची ती झुळूक तुझा स्पर्श देऊन गेली यातच सारं काही आलं मी चुकीचा वागलो तू मात्र कधीच विचारलं नाहीस "का रे असा वागतोस " यातच सारं काही आलं

ईजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – ७

लेखक टर्मीनेटर यांनी शुक्रवार, 20/07/2018 03:10 या दिवशी प्रकाशित केले.
/* W3.CSS 4.13 June 2019 by Jan Egil and Borge Refsnes */ html{box-sizing:border-box}*,*:before,*:after{box-sizing:inherit} /* Extract from normalize.css by Nicolas Gallagher and Jonathan Neal git.io/normalize */ html{-ms-text-size-adjust:100%;-webkit-text-size-adjust:100%}body{margin:0} article,aside,details,figcaption,figure,footer,header,main,menu,nav,section{display:block}summary{display:

फलटण-राजगड-तोरणा-मढेघाट ट्रिप

लेखक डोके.डी.डी. यांनी गुरुवार, 19/07/2018 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
राजगड-तोरणा-मढेघाट ट्रिप येत्या 3 व 4 तारखेला दुचाकीवरून सदर ट्रिप करायची आहे . मागील महिन्यातच मी राजगड बघितला आहे आणि आता मित्रांसोबत वरील ट्रिपला जायचे आहे. तरी ट्रिप चा क्रम कसा असावा आणि एक दिवस राहायची सोय कोठे होईल. चांगले हॉटेल कोठे मिळेल. 3 ता.ला सकाळी लवकर निघून 4 ला रात्री परत यायचे असे नियोजन आहे.

ब-१ जीवनसत्व : ऊर्जानिर्मितीचे गतिवर्धक

लेखक हेमंतकुमार यांनी गुरुवार, 19/07/2018 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
जीवनसत्वांच्या ‘ब’ गटात एकूण ८ घटक आहेत. ती सर्व पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे आहेत. साधारणपणे ती विशिष्ट आहारस्त्रोतांमध्ये एकत्रित आढळतात. त्यापैकी ६ पेशींतील ऊर्जानिर्मितीमध्ये योगदान देतात तर उरलेली २ DNAच्या उत्पादनात मदत करतात. ब-१ हे पहिल्या गटात मोडते. त्याचा परिचय करून देण्यासाठी हा लेख. ब-१ चे अधिकृत नाव Thiamin असून त्यामध्ये गंधक हे मूलद्रव्य असते. आहारातील स्त्रोत: अख्खी (unrefined) धान्ये, मासे, मांस, अंडे, आणि सोयाबीन यांत ते विपुल प्रमाणात असते.

सह्याद्रीतील शब्दचित्रे - भाग १

लेखक स्वच्छंदी_मनोज यांनी बुधवार, 18/07/2018 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
विषय कुठून निघाला ते आता नक्की आठवत नाही पण एका whatsapp ग्रुपवर जावळी, महाबळेश्वर, जावळीचे मोरे अशी काहीशी चर्चा चालली होती आणि मला माझ्या केलेल्या जावळी, महाबळेश्वर भटकंती आठवल्या. त्याच वेळी तिथल्या गावात भेटलेली माणसे आठवली. मग असे वाटले की गेली अनेक वर्षे केलेल्या आणि वेळोवेळी ट्रेक दरम्यान भेटलेल्या व्यक्तींवर लिहावे. अश्या विचारातून तयार झालेली ही काही शब्द्चित्रे. यात व्यक्तींबद्दल लिहीलेले येईलच पण त्याच बरोबर माझ्या ट्रेकचेही काही संदर्भ येतील.
Taxonomy upgrade extras

पावसाळ्यातील मासे

लेखक sandeepa यांनी बुधवार, 18/07/2018 17:24 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या जोरात पावसाळा चालू आहे. नदीचे मासे आणि त्यांच्या पाककृती बद्दल माहिती हवी आहे कृपया खवय्यांनी मार्गदर्शन करावे....