Skip to main content

साथ

लेखक Secret Stranger यांनी शुक्रवार, 20/07/2018 13:23 या दिवशी प्रकाशित केले.
हरपले हे देहभान ना उरले दिशांचे ज्ञान, ना कसले अनुमान हेच का प्रीतीचे प्रमाण..? धुंद रूपाची तुझ्या जणू भूलच ही पडली, तुजवाचून सारी सुखे का दिसती शुन्यासमान..? सुंदरशा या कातरवेळी मन सैरभैर का होई, का होई तुझा भास कसली ही अशी तहान..? प्रश्न असा हा पडता उत्तर आले त्वरीत मला, तूच हवी या ह्रदयाला देशील का ग साथ मला...??
लेखनविषय:

वाचने 743
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया