मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पावसाळ्यातील मासे

sandeepa · · पाककृती
सध्या जोरात पावसाळा चालू आहे. नदीचे मासे आणि त्यांच्या पाककृती बद्दल माहिती हवी आहे कृपया खवय्यांनी मार्गदर्शन करावे....

वाचने 12469 वाचनखूण प्रतिक्रिया 13

सर्वप्रथम नदीतील मासे कोणकोणते त्यांची नावं एकदा समजून घेऊ. १) राहु - रोहू ( चवीला चवदार) २) वामट (लांब सापासारखा दिसणारा) एकच काटा आणि सिंपली ग्रेट, जितका शिजवाल तितका चांगला लागतो. बाकी नंतर सांगतो. -दिलीप बिरुटे

In reply to by नूतन सावंत

गवि 19/07/2018 - 10:29
मासे समुद्रात सापडणाऱ्या माशांप्रमाणेच बनवायचे.
मिठाचा काही फरक पडत नाही का? उगीचच अशी समजूत आहे की खाऱ्या पाण्यातल्या माषयांमध्ये काही प्रमाणात मीठ असेल की काय.

पक्षी 20/07/2018 - 13:53
धागा उघडल्यावर अंमळ निराशा झाली. शीर्षकावरून वाटले की पावसाळ्यातील माश्यांची पाकृ असतील. मदत हव्या असलेल्या धाग्याच्या शीर्षकाअगोदर "मदत हवी: ...." असे लिहावे. किंवा मिपावर नवीन विभाग सुरु करावा "मदत" नावाचा आणि मदत हवे असलेले धाग्या ह्या विभागातून सुरु करावे. अगोदरचे सर्व मदत हवे असलेले धागे ह्या नवीन विभागात हलवावे. जेणेकरून, नवीन कोणाला मदत किंवा माहिती हवी असेल तर तो किंवा ती ह्या विभागात संबांधित धागा सापडतो का ते शोधून बघेल आणि नंतरच नवीन धागा काढेल.