खनिजांचा खजिना : लेखमाला प्रारंभ
नुकतीच माझी गेले दोन महिने चाललेली जीवनसत्वांची लेखमाला संपली ( https://www.misalpav.com/node/42796). वाचकांना ती उपयुक्त वाटल्याचे व आवडल्याचे प्रतिसादांतून दिसले. त्यातून मिळालेल्या प्रोत्साहनातून आता नव्या लेखमालेस हात घालत आहे. ती आहे जीवनसत्वांचे भाऊबंद असणाऱ्या खनिजांची.
खनिजे ही मानवी आरोग्यासाठी आवश्यक अशी पोषणद्रव्ये आहेत. निसर्गात ती विविध खाणींमध्ये असतात. निसर्गदत्त अनेक खानिजांपैकी सुमारे १६ मानवी शरीरास आवश्यक आहेत.
मिसळपाव
उडती छबकडी हा भारांचा विज्ञान(वेड)कथा संग्रह! ह्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहिल्याप्रमाणे ह्या नुसत्याच विज्ञानकथा नसून वेडकथा देखील आहेत. एक एक कल्पना नुसती धुमाकूळ घालणारी आहे आणि विज्ञानाला धरून देखील आहे. त्या काळी प्रचलित असलेल्या विज्ञान संकल्पना हाती धरून एक सुंदर पार्श्वभूमी निर्माण करण्यात भारांचा हातखंडा होता.